नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा (Ladki Bahin Yojana Online Apply Link) त्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या अर्जासाठी महाराष्ट्र सरकारने Nari Shakti Doot App डिझाईन केलेला आहे. ते ॲप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ज्याची लिंक तुम्हाला खाली दिली जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲप डाऊनलोड करायचं आहे आणि ॲप डाऊनलोड केल्यानंतरची जी पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे ती संपूर्ण आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Nari Shakti Doot App Download
सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नारी दूत ॲप हे तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होऊन इन्स्टॉल झाल्यानंतरची पूर्ण प्रक्रिया खाली दिली गेलेली आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply Link नोंदणी प्रक्रिया
- सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंक वरून तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारी दूध ॲप डाऊनलोड करायचा आहे.
- तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइस वर गुगल प्ले स्टोअर वर जावं लागणार आहे. त्या ठिकाणी नारी शक्ती दूध हे ॲप शोधावा लागणार आहे.
- ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे त्याची लिंक खाली देखील दिली गेलेली आहे.
- ॲप ओपन करायचा आहे.
- तुमच्या फोनवर ॲप लॉन्च करा आत्ता होम स्क्रीनवर तुम्हाला नोंदणी करा बटनावरती क्लिक करायचा आहे.
- त्या नोंदणी फॉर्म मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड भरायचा आहे. सर्व माहिती बरोबर भरायची आहे.
- त्यानंतर ओटीपी मिळवा या बटणावर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला तिथे दिलेल्या रकान्यांमध्ये भरायचा आहे आणि व्हेरिफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे.
- ओटीपी पडताळणी नंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे आता तुम्ही नारी शक्ती ॲपवर लॉगिन करायचं आहे.
नारी शक्ती दूत लॉगिन करण्यासाठीची प्रक्रिया
- तुमच्या स्मार्टफोनवरील नारीशक्ती दूध ॲप ओपन करायचा आहे.
- त्यावर लॉगिन बटणावर क्लिक करायचा आहे.
- तुमचा मोबाईल नंबर आणि नोंदणी दरम्यान तयार केलेला पासवर्ड तिथे भरायचा आहे.
- लॉगिन बटणावर क्लिक करायचा आहे माहिती योग्य असल्यास तुम्ही ॲप मध्ये यशस्वीरित्या लॉगिन होणार आहेत.
- त्यानंतर विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरायचे आहे आणि आवश्यक कागदपत्र तिथे अपलोड करायचे आहेत.
- अपलोड करून झाल्यावर सबमीट या बटणावर क्लिक करायचं आहे.
- अशा प्रकारे तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा पूर्ण होणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Offline Apply
जर ही सर्व प्रक्रिया तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये तलाठी कार्यालयात किंवा अंगणवाडी सेविकेकडे जाऊन देखील हा अर्ज भरू शकता या अर्जाच्या पीडीएफ ची लिंक आणि माहिती खाली दिली गेलेली आहे
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link
या योजनेच्या अधिक अपडेट साठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा.
- How to Pay Traffic Challan Online in Maharashtra
- छत्तीसगढ़ मुख्यमंत्री कन्या विवाह योजना 2025: लाभ, आवेदन पूरी जानकारी
- हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती
- महिलांसाठी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरु: ८० कोटी मंजूर!! एवढे मिळणार अनुदान!!
- मुख्यमंत्री वयोश्री योजना 2025 GR, अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे संपूर्ण माहिती