महाराष्ट्र सरकारने “माझी लाडकी बहिन योजना” हि नवीन योजना सुरू केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतील. 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रूपांपर्यंत असणे गरजेचे आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माझी लाडकी बहिन योजना 2024 साठी कोण अर्ज करू शकतो?
- महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार असावा.
- वय 21 ते 60 च्या दरम्यान असावे.
- बँक खाते असावे.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- इतर सरकारी योजनांमधून 1,500 रुपये पेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळत नसावा.
- ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन नसावे.
अर्ज कुठे करावा?
- वरील पात्रता अटीत बसणाऱ्या पात्र महिला त्यांच्या जवळच्या महा ई-सेवा केंद्रांवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- या योजनेचे अर्ज पोर्टल,मोबाइल अॅप,सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
- ज्यां महिलांना अर्ज करता येत नाही ते अंगणवाडी केंद्रात जावून देखील अर्ज करू शकणार आहेत.
- पात्र महिला अर्ज सादर करण्यासाठी जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालय, ग्रामपंचायत किंवा प्रभाग कार्यालयातही भेट देऊ शकणार आहेत.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- फोटो आवश्य
- अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
माझी लाडकी बहीण योजना Online Apply : पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया
अर्जाची पडताळणी प्रक्रिया
- अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांकडून केली जाईल.
- ग्रामसेवकही अर्जांची पडताळणी करू शकतात.
- पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली जाईल.
- त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना 1500/- रुपयांचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
अर्जाच्या महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू करण्याची तारीख: | 1 जुलै 2024 |
अर्जाची शेवटची तारीख: | 15 जुलै 2024 |
तात्पुरती यादीची घोषणा: | 16 ते 20 जुलै 2024 |
आक्षेप आणि तक्रारी: | 21 ते 30 जुलै 2024 |
अंतिम लाभार्थी यादीची घोषणा: | 1 ऑगस्ट 2024 |
लाभ वितरणाची सुरुवात: | 14 ऑगस्ट 2024 |
FAQs
अर्ज प्रक्रिया कधी सुरू होते?
अर्जाची प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू होईल.
योजनेसाठी कोण पात्र आहे?
21 ते 60 वर्षे वयोगटातील, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महाराष्ट्रातील रहिवासी महिला पात्र आहेत.
आर्थिक मदत किती आहे?
पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतील.
मी कुठे अर्ज करू शकतो?
तुम्ही अंगणवाडी केंद्रे, बालविकास प्रकल्प कार्यालये, ग्रामपंचायती, प्रभाग कार्यालये, सेतू सेवा केंद्रे किंवा महा ई-सेवा केंद्रांवर ऑनलाइन अर्ज करू शकता.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, बँकेच्या पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
अंतिम लाभार्थी यादी कधी जाहीर केली जाईल?
अंतिम लाभार्थी यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केली जाईल.
फायदे कधी सुरू होतील?
14 ऑगस्ट 2024 पासून लाभ सुरू होतील.
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती