मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025: अर्थसंकल्प 2025 मधील हि महत्वपूर्ण योजना आहे ज्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रति वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार असल्याची घोषणा मा.आदितदादा पवार त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025
गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे बेजार झाले आहेत. वाढत्या महागाईसोबतच पेट्रोल-डिझेल, CNG तसेच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात देखील मोती वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे 2025 च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून फ्री सिलेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रत्येकवर्षाला तीन सिलिंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. हि योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरणार ठरेल अशी सरकारची आशा आहे.
“या योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना देण्यात येईल,” असं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोगांच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे. एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वाढवला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.
गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे, असं अजित पवार म्हणाले.
ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
यासोबतच त्यांनी महिलांच्या विकासाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध योजनांचीही माहिती दिली. ज्यामध्ये महाराष्ट्रात ६ लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या ७ लाख करण्यात येईल. तसेच त्यांच्यासाठीच्या निधीची रक्कम १५ हजारांहून ३० हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Online Apply
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 अद्याप सुरु केली गेलेली नाही. त्याचे अधिकृत संकेतस्थळ ज्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ते अद्याप उपलब्ध नाही. हि माहिती लवकरच उपलब्ध होईल, त्यावेळी याच पोस्टमध्ये ती आम्ही update करू. त्यासाठी आमच्या youtube चॅनेल आणि टेलिग्राम चॅनेल ला follow करा.
- छत्तीसगढ़ मुख्यमंत्री कन्या विवाह योजना 2025: लाभ, आवेदन पूरी जानकारी
- हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती
- महिलांसाठी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरु: ८० कोटी मंजूर!! एवढे मिळणार अनुदान!!
- मुख्यमंत्री वयोश्री योजना 2025 GR, अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे संपूर्ण माहिती
- महाराष्ट्र 7/12 कोणाच्या नावावर आहे ? 7 12 Utara in Marathi Online