मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 2026: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 2026
ज्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाईल. याशिवाय राज्यात मागेल त्याला सौरउर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 8.50 लाख शेतकरी लाभ घेऊ शकणार आहेत. सोबतच नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.
Mukhyamantri Baliraja Vij Savlat Yojana 2026 Highlights
| लाभार्थी: | 7.5 एचपी मोटर असलेल्या लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना. |
| फायदा: | 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवली जाईल. |
| सौरऊर्जा पंप: | साडे 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप दिले जातील. |
| ई-पंचनामा प्रणाली: | नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी करण्यासाठी राज्यात ई-पंचनामा प्रणाली लागू होणार आहे. |
योजनेचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना वीज खर्चाच्या भारापासून मुक्त करणे आणि सौरऊर्जा पंपांच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जेचा वापर वाढवणे आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि शाश्वत कृषी उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लाभ
- मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवण्यासाठी राज्य सरकारने सादर केलेली आहे.
- या योजनेंतर्गत, 7.5 अश्वशक्ती (एचपी) क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज दिली जाईल.
- मागेल त्याला सौरउर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केली.
- साडे 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना महाराष्ट्र 2026 Online Apply
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची अधिकृत वेबसाइट अद्याप सुरू झालेली नाही. सरकार लवकरच वेबसाइट आणि अर्जाचा तपशील जाहीर करेल. Update साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2026 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2026
मागेल त्याला सौरउर्जा पंप
सरकारने ‘मागेल त्याला सौरउर्जा पंप‘ देण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यात साडे 8 लाख शेतकऱ्यांना या पंपांचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप पुरवले जातील, जे वीज खर्च कमी करतील आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर वाढवतील.
महिलांसाठी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरु: ८० कोटी मंजूर!! एवढे मिळणार अनुदान!!
निष्कर्ष
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि शेती उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल.
ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माहितीसाठी अपडेट रहा.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती