मुख्यंमत्री माझी लाडकी बहीन योजना मुदतवाढ: आधी १५ जुलै पर्यंत या योनजेसाठी अर्ज करता येणार होता, त्याची मुदत आत्ता वाढवून ३१ ऑगस्ट केली गेलेली आहे. त्यामुळे कागदपत्रे, आणि अर्जाची घाईगरबड न करता तुम्ही ३१ ऑगस्ट पर्यंत आत्ता अर्ज करू शकणार आहेत. ही सर्व महिला मंडळासाठी आनंदाची बातमी आहे.
जरी अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत केला तरी लाभ हा जुलै महिन्यापासून दिला जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही अर्ज ऑगस्ट मध्ये केला तरीदेखील जुलै महिन्याच्या हप्ता मिळणार आहे. ते १५०० रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत.
माझी लाडकी बहिन योजना अर्ज सुरु!! पहा महत्वाच्या तारखा!!
मुख्यंमत्री माझी लाडकी बहीन योजना अटींमध्ये झालेले बदल
- ज्या महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल म्हणजेच डोमेसाइल नसेल त्यांनी १५ वर्ष्यापुर्वीच रेशन कार्ड कागदपत्र म्हणून स्वीकारले जाईल. त्याचप्रमाणे मतदान ओळखपत्र ,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ,जन्म दाखला या पैकी कोणतेही एक कागदपत्र लागणार आहे.
- ५ एकरपेक्षा जात शेतजमीन नसावी हि जमिनीची अट आत्ता रद्द करण्यात आलेली आहे, या योजनेसाठी आत्ता कोणतेही भूधारक असो आत्ता त्या महिला अर्ज करू शकणार आहेत.
- चार चाकी वाहन नसावे ही अट अजूनही कायम आहे.
- आधी २१ ते ६० वर्ष्यापर्यंत च्या महिला अर्ज करू शकणार होत्या ज्यामध्ये आत्ता बदल करून २१ ते ६५ वर्ष्यांपर्यंतच्या सर्व ज्यामध्ये विधवा, घटस्फोटित, परितक्त्या, निराधार महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- जर महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल, तर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल, तर अश्या बाबतीत पतीच्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखल किंवा पाटीच डोमेसाइल यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक असणार आहे.
- २.५० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्न दाखल्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखल देण्याची गरज नाही.
- २१ वर्ष्याच्या अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
- PM किसान योजनेअंतर्गत जर १५०० रूपयांपेक्षा जास्त अनुदानाचा लाभ मिळत असेल, तर या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
- पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?