Pokhara Yojana 2023 Online Application: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा अंतर्गत कोणत्या योजनेसाठी अर्ज सुरू आहेत. आणि त्यांची अर्ज करण्याची लास्ट डेट किती आहे याची माहिती आजच्या या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी हा लेख संपूर्ण वाचावा.
पोखरा योजना अर्ज सुरु | पहा कोणत्या घटकासाठी अर्ज सुरु आहेत ?? | अर्ज करण्याची अंतिम तारिख किती ??
पोखरा अंतर्गत अर्ज सुरु
मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत फळबाग आणि बांबू लागवड या घटकासाठी सध्या अर्ज सुरू आहेत.
पोखरा योजना अर्ज करण्याची लास्ट डेट किती?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत फळबाग आणि बांबू लागवड या घटकासाठी अर्ज करण्याची (Last date) अंतिम मुदत ही शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 आहे. त्यानंतर पोर्टल वरील फळबाग व बांबू लागवड घटक बंद होणार आहे.
फळबाग लागवड करण्याची Last Date
म्हणून सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात आलेले आहे की फळबाग व बांबू लागवड अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत (Last Date) 30 सप्टेंबर 2022 असून लागवड फळबाग लागवड पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022 आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप फळबाग किंवा बांबू लागवड करता अर्ज केलेले नाहीत. आणि जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी पुढील दोन दिवसात तात्काळ पोखरा योजनेमध्ये अर्ज करून घ्यावेत.
त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील गावातील तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करावी.
संपर्क कुठे करावा?
अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील समूह सहाय्यक व कृषी सहाय्यक यांना संपर्क करावा.
अर्ज कुठे करावा?
अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये अर्ज करू शकता.
पोखरा योजना Official Website – https://mahapocra.gov.in/