Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Sheli/Mendhi Palan Business Subsidy Apply Online

Sheli/Mendhi Palan Business Subsidy Apply Online: ₹8.5 लाख अनुदान शेळी/मेंढी पालन पशुधन उद्योजकता योजना

Posted on March 24,March 24, by Mahasarkari Yojana

Sheli/Mendhi Palan Business Subsidy Apply Online: राज्यस्तरीय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजकता योजना अंतर्गत येणारी शेळी/मेंढी पालन पशुधन उद्योजकता योजना 2026. ही ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे.

या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की

  • तुम्हाला किती शेळी/मेंढी गट दिले जाणार आहेत,
  • अर्ज कोण करू शकतो,
  • त्याची निवड प्रक्रिया कशी असते,
  • गटाची एकूण किंमत किती आहे,
  • अनुदान किती मिळतं ,
  • कोणती कागदपत्रे लागतात,
  • अर्ज कुठे करायचा (Online Apply Process),
  • GR PDF आणि अटी व शर्ती काय आहेत.

— ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत.

Contents hide
1 किती शेळी/मेंढी गट दिले जाणार?
2 अर्ज कोण करू शकतो? (Sheli Mendhi Business Subsidy Apply Online Eligiblity)
2.1 लाभार्थी निकष
3 पात्रता (Eligibility)
3.1 प्रकल्पाची किंमत (Sheli Mendhi Business Subsidy Project Cost)
3.2 अनुदानाचे स्वरूप (Sheli Mendhi Business Subsidy)
3.3 कोणती कागदपत्रे लागतात? | Sheli Mendhi Business Subsidy Online Apply Documents
3.4 अटी व शर्ती
3.4.1 Mudra Loan Scheme in Marathi: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती | Apply Online Mudra Bank Loan
3.5 Official Government GR PDF
3.6 Online अर्ज आणि लाभार्थी निवड (Sheli Mendhi Business Subsidy Online Apply Process)–
3.7 Related

किती शेळी/मेंढी गट दिले जाणार?

५०+५ शेळी / मेंढी गट व ३ वर्षाचा विमा, गोठा व साधन सामग्री

अर्ज कोण करू शकतो? (Sheli Mendhi Business Subsidy Apply Online Eligiblity)

सर्व प्रवर्गातील अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, महिला बचत गट

लाभार्थी निकष

सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.

  • अ) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)
  • ब) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)
  • क) वनहक्क धारक
  • ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ, ब, क मधील)

वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के व महिलांना ३० टक्के आरक्षण लागू राहील.

पात्रता (Eligibility)

  • १) १ एकर स्वतःची किंवा किमान ५ वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक, मात्र वनहक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही.
  • २) पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय /निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)

किंवा

२ वर्षाचा शेळी/मेंढी व्यवसायाचा अनुभव

प्रकल्पाची किंमत (Sheli Mendhi Business Subsidy Project Cost)

५०+५ शेळी /मेंढी

  • १) पशुधन खरेदी – प्रति शेळी/मेंढी रु. १२,०००/- व बोकड/मेंढा रु. १५,०००/- प्रमाणे गटाची किंमत- रु. ६,७५,०००/-
  • २) ३ वर्षाचा विमा-१२.५७% (अधिक १८% GST)- रु. १,०९,५५४/-
  • ३) गोठा निर्मिती(Shed)– रु. २,००,०००/-
  • ४) कडबा कुट्टी यंत्र-रु. ३०,०००/-
  • ५) सोलर (3 kw)-रु. १,३२,०००/-

प्रकल्पाची एकूण किंमत – रु. ११,३८,५५४/-

अनुदानाचे स्वरूप (Sheli Mendhi Business Subsidy)

  • १) सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के (रु. ५,६९,२७७/-)
  • २) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी – ७५ टक्के (रु. ८,५३,९१५/-)
  • ३) अनुदान २ टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या ५० टक्के इतका पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने गोठा निर्मिती तसेच साधनसामग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे ५० टक्के अनुदान शेळी/मेंढी खरेदीनंतर देण्यात येईल.

कोणती कागदपत्रे लागतात? | Sheli Mendhi Business Subsidy Online Apply Documents

१) स्वतःच्या नावाचे ७/१२ उतारा किंवा किमान ५ वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा
२) वनहक्क जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची “जे” प्रमाणपत्र,
३) पशुपालन व्यवसायाचे शासकीय /निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र.)
किंवा
स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र
४) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
५) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र

अटी व शर्ती

  • १) शेळी / मेंढी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीत करण्यात यावी.
  • २) खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित झालेल्या शेळ्या-मेंढ्यांतून करण्यात यावी.
  • ३) महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या-मेंढ्या उपलब्ध नसल्यास तसे महामंडळाकडून ना-उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन शेळी / मेंढी गटाची खरेदी खाजगी /राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळ्या-मेंढ्यांच्या ब्रीडिंग फार्म, स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापित शेळी प्रकल्पांकडून किंवा खुल्या बाजारातून लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार वजनानुसार करण्यात यावी.
  • ४) सदरच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड व मेंढे स्थानिक वातावरणात तग धरतील याची दक्षता घेण्यात यावी.
  • ५) या प्रकल्पांतर्गत खरेदी करावयाच्या शेळ्या / मेंढ्या तसेच, बोकड / मेंढे यांचे वय १ ते ३ वर्ष वयोगटातील असावे.
  • ६) पात्र लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच, गठीत समिती समवेत शेळी / मेंढी गट खरेदी करावी.

Mudra Loan Scheme in Marathi: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती | Apply Online Mudra Bank Loan

  • ७) लाभार्थ्याने उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालावधीत गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच, जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन, पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यांस लाभ देण्यात येईल.
  • ८) गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच, खरेदी केलेल्या पशुधनाची किंमत योजनेंतर्गत निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच, पशुधनाच्या खरेदीनंतर पशुधन वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करावयाचा आहे.
  • ९) वाटप करण्यात येणाऱ्या पशुधनाचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षासाठी विमा उतरविण्यात यावा.
  • १०) योजनेमध्ये वाटप केलेल्या शेळ्या/मेंढ्या मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दुसऱ्या शेळ्या/मेंढ्या खरेदी करून पुरविण्यात याव्यात.
  • ११) तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच, पशुधन खरेदी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, विमा) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना सादर करावा.
  • १२) सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी DBT द्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्याच्या बँक खात्यात अदा करावा.
  • १३) योजनेअंतर्गत वाटप केलेल्या पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्थाप्रमुखांद्वारे करणे बंधनकारक राहील.
  • १४) योजनेच्या अटी/शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्यांकडून घेण्यात यावे.

Official Government GR PDF

शेळी/मेंढी पालन पशुधन उद्योजकता योजना GR PDF

Online अर्ज आणि लाभार्थी निवड (Sheli Mendhi Business Subsidy Online Apply Process)–

१) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत.
२) प्राप्त सर्व झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
३) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी, यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करावे
४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, असे लाभार्थी प्रतीक्षाधीन ठेवण्यात येतील.
५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविण्यात येतील. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Online ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज 2026

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme