Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Sheli/Mendhi Palan Yojana: शेळी/मेंढी गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

Posted on March 18,March 22, by Mahasarkari Yojana

Sheli/Mendhi Palan Yojana: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजकता योजना जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत येणारी शेळी/मेंढी गट वाटप योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे.

Contents hide
1 Goat Farming Business Plan Maharashtra – अनुदान, खर्च, नफा आणि अर्ज प्रक्रिया
1.1 Sheli/Mendhi Palan Yojana लाभाचे स्वरूप:
1.2 Goat Farming Subsidy Maharashtra लाभार्थी:
1.3 Sheli/Mendhi Palan Yojana लाभार्थी निवड:
1.4 पात्रता | Eligibility Criteria for Goat Farming Scheme:
1.5 गटाची किंमत:
1.5.1 अ) पशुधन खरेदी
1.5.2 ब) विमा (insurance)– १२.९५%क) विक्री कर – १८%
1.5.3 ड) ५+१ शेळी/मेंढी गटाची एकूण किंमत (Goat Farming 5+1 Unit Cost)– रु. ६८,४२८/-
1.6 Sheli/Mendhi Palan Yojana अनुदानाचे स्वरूप | Subsidy & Financial Benefits:
1.7 आवश्यक कागदपत्रे | Required Documents for Online Apply:
1.8 अटी व शर्ती (Terms & Conditions of Scheme):
1.9 Sheli/Mendhi Palan Yojana अर्ज कसा करावा | Goat Farming Subsidy Scheme Maharashtra – Apply Online
1.10 Related

Goat Farming Business Plan Maharashtra – अनुदान, खर्च, नफा आणि अर्ज प्रक्रिया

या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला किती शेळी-मेंढीचे गट दिले जाणार आहेत, अर्ज कोण करू शकतो, त्याची निवड प्रक्रिया कशी असते, गटाची एकूण किंमत किती आहे, अनुदान किती मिळतं, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा, GR PDF आणि अटी व शर्ती काय आहेत — ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत. 👍

Sheli/Mendhi Palan Yojana लाभाचे स्वरूप:

५+१ शेळी/मेंढी गट + विमा
किंवा

१०+१ शेळी/मेंढी गट + विमा

महिला कर्ज योजना 2026: Stand-Up India Loan Scheme व्याज दर, पात्रता

Goat Farming Subsidy Maharashtra लाभार्थी:

सर्व प्रवर्गातील भूमिहीन, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, महिला बचत गट

Sheli/Mendhi Palan Yojana लाभार्थी निवड:

सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्यक्रमाने निवड करण्यात येईल.

अ) भूमिहीन (फक्त ५+१ शेळी/मेंढी गटासाठी)
ब) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)
क) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)
ड) नवबौद्ध घटक
इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)

Aajeevika Micro-Finance Loan Scheme | उद्योजक कर्ज योजना संपूर्ण माहिती

वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच ५+१ शेळी/मेंढी गटासाठी महिलांना ५० टक्के आणि १०+१ शेळी/मेंढी गटासाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.

पात्रता | Eligibility Criteria for Goat Farming Scheme:

  • फक्त ५+१ शेळी/मेंढी गटासाठी जमिनीची अट लागू नाही.
  • किमान १ एकर स्वतःची किंवा किमान ७ वर्षे नोंदणीकृत भाडेपट्ट्याची जमीन, मात्र नवबौद्ध घटकांना अट लागू राहणार नाही.
  • पशुपालन व्यवसायाचे शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)

किंवा
२ वर्षांचा शेळी/मेंढी पालन व्यवसायाचा अनुभव

Gaay Mhais Yojana: दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

गटाची किंमत:

महाराष्ट्रात goat farming 5+1 आणि 10+1 unit cost, insurance, GST आणि subsidy मिळून एकूण investment किती लागते याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे

१) ५+१ शेळी/मेंढी

अ) पशुधन खरेदी

प्रति शेळी/मेंढी – रु. १२,०००/-

प्रति मेंढा – रु. १५,०००/-

ब) विमा (insurance)– १२.९५%
क) विक्री कर – १८%

ड) ५+१ शेळी/मेंढी गटाची एकूण किंमत (Goat Farming 5+1 Unit Cost)– रु. ६८,४२८/-

२) १०+१ शेळी/मेंढी गटाची एकूण किंमत (Goat Farming Project Cost Maharashtra)– रु. १,५५,३३९/-

Sheli/Mendhi Palan Yojana अनुदानाचे स्वरूप | Subsidy & Financial Benefits:

सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी – ७५ टक्के

आवश्यक कागदपत्रे | Required Documents for Online Apply:

स्वतःच्या नावाचे ७/१२ उतारा किंवा किमान ७ वर्षांचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा

नवबौद्ध जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेलं अनुसूची “जे” प्रमाणपत्र

पशुपालन व्यवसायाचे शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र
(अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबत हमी पत्र)
किंवा
स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र

दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र

बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र

Kukkut Palan Yojana: अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

अटी व शर्ती (Terms & Conditions of Scheme):

शेळी/मेंढी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीत करण्यात यावी.

खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित झालेल्या शेळ्या-मेंढ्यांकडून करण्यात यावी.

महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या-मेंढ्या उपलब्ध नसल्यास, महामंडळाकडून ना-उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन खरेदी खाजगी/राष्ट्रीय पशुधन अभियान/स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेळ्या-मेंढ्यांच्या ब्रीडिंग फार्ममधून किंवा खुल्या बाजारातून लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार करण्यात यावी.

खरेदीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड व मेंढे स्थानिक वातावरणात तग धरतील याची दक्षता घेण्यात यावी.

या प्रकल्पांतर्गत खरेदी करावयाच्या शेळ्या/मेंढ्या तसेच बोकड/मेंढे यांचे वय १ ते २ वर्षे वयोगटातील असाव्यात.

पात्र लाभार्थीची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी गठीत समितीसोबत खरेदी करावी.

लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे निर्धारित केलेल्या कालावधीत जनावरांची खरेदी न केल्यास, अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.

खरेदी केलेल्या पशुधनाची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच, पशुधनाच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करावयाचा आहे.

वाटप करण्यात येणाऱ्या पशुधनाचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षांसाठी विमा उतरविण्यात यावा.

योजनेअंतर्गत वाटप केलेले पशुधन मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतील लाभार्थ्याने दुसरे पशुधन खरेदी करून पूर्तता करावी.

तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्यांच्या खरेदी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, विमा) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना सादर करावा.

योजनेअंतर्गत वाटप केलेल्या पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेमार्फत करणे बंधनकारक राहील.

या संपूर्ण खरेदी प्रक्रियेचे समावेश लाभार्थ्याकडून करून घ्यावयाच्या बंधपत्रामध्ये करण्यात यावा.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना GR PDF

Sheli/Mendhi Palan Yojana अर्ज कसा करावा | Goat Farming Subsidy Scheme Maharashtra – Apply Online

१) सदर योजनासाठी लाभार्थी निवडताना जिल्हानिहाय सर्वसाधारण/अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

२) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत.

३) प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, अशा लाभार्थ्यांना प्रतीक्षाधीन ठेवले जाणार आहे.

५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविले जाणार आहेत. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

६) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन क्लस्टर निश्चित केले जाणार आहे.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • Assam Rifles Recruitment 2026 Online Apply Date, Age, Syllabus Details

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jamin Update
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme