Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. सरकारने या योजनेअंतर्गत ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत अनुदान जमा केलं आहे. परंतु, अजूनही काही शेतकरी आहेत ज्यांना अनुदान मिळालेलं नाही. जर तुम्हाला अनुदान मिळालं नसेल, तर काय करावं याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
आतापर्यंत सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेतून ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२३९८ कोटी रुपये जमा केलेले आहेत. या योजनेत हेक्टरी ₹५००० प्रमाणे अनुदान देण्यात येतं, जे दोन हेक्टर पर्यंत मर्यादित आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते योजनेचे ऑनलाईन वितरण सुरु झाले आहे. २०२३ च्या खरीप हंगामात एकूण ४१९४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे, ज्यामध्ये सोयाबीन साठी ₹२६४६ कोटी आणि कापूस साठी ₹१५४८ कोटी निधी दिला आहे.
जर तुम्हाला अद्याप अनुदान मिळालेले नसेल, तर केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का ते नक्की तपासा. केवायसी केलेल्या शेतकऱ्यांचे बँक खातं आधार संलग्न असणे आवश्यक आहे, आणि डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे पैसे जमा केले जातील.
आत्तापर्यंत ९६ लाख खातेदारांपैकी ६८ लाख खातेदारांनी आपली आधार संलग्नता दिलेली आहे. मात्र, उर्वरित २१ लाख शेतकऱ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी करण्यासाठी तुम्ही SC Agridbt Maha IT याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करू शकता तिथून लवकर KEYC प्रक्रिया पूर्ण करा.
शेतकरी मित्रांनो, हे अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया लवकर पूर्ण करा, म्हणजे तुम्हालाही लवकरच लाभ मिळू शकेल. हा महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
- ट्रॅक्टर अनुदान आलं!! Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2025 GR
- ऊस उत्पादक शेतकरी असाल, तर नक्की पहा!! महत्वाचा नवीन शासन निर्णय GR
- Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
- Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती
- How to Pay Traffic Challan Online in Maharashtra