पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) 2022 ची संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हि एक loan योजना आहे ज्यामध्ये लघु उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या लेखात आपण मुद्रा कर्ज म्हणजे काय, मुद्रा कर्ज फायदे(Benefits Mudra Loan), कर्जाच्या रकमेनुसार प्रकार कोणते, पंतप्रधान मुद्रा कर्जची वैशिष्ट्ये, कर्जचा परतफेड कालावधी किती, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता (loan scheme eligibility), मुद्रा योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Loan), मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा(How to Apply Online Mudra Loan) या प्रश्नांची उत्तरे आज या लेखात आपण पाहणार आहोत. तुम्हीही स्वतःचा नवीन उद्योग उभारू इच्छिता, परंतु आर्थिक दृष्ट्या असक्षम आहेत. तर तुम्हला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग उभारून उदयोजक बानू शकता. पंतप्रधान मुद्रा योजना किंवा पीएमएमवाय ही सूक्ष्म व लघु उद्योगांना परवडणारी पतपुरवठा करण्यासाठी भारत सरकारची प्रमुख योजना आहे.