सुकन्या समृद्धि योजना 2021 (PMSSY)मराठी माहिती benefits,bank list, eligibility

सुकन्या समृद्धी योजना २०२१ ची सविस्तर माहिती पाहणार आहोत. देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी भारत सरकार अनेक योजना चालवित आहे. त्यामधील अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना. सुकन्या समृद्धि योजना म्हणजे काय? या योजनेची उद्दिष्ट्ये, लाभ, पात्रता, अटी, वैशिष्ट्ये, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ.सर्व प्रश्नाची उत्तरे आज या लेखात आपण पाहणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

काय आहे सुकन्या समृद्धि योजना 2021?
सुकन्या समृध्दी योजना २२ जानेवारी २०१५ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेंतर्गत मुलीचे बचत खाते मुलीच्या पालकांनी कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा टपाल कार्यालयात उघडले जाईल. हे सर्व पालक ज्यांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत. ते या योजनेत बचत खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी किमान रक्कम २५०/- रुपये आहे आणि कमाल रक्कम १,५०,०००/- रुपये आहे. यापूर्वी सुकन्या समृद्धि योजना २०२१ अंतर्गत ९.१ टक्के व्याजदर होता तो आता कमी करून ८.६ टक्के करण्यात आला आहे.

Translate »