१६३ कोटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या निधी मंजूर २२ जुलै २०२१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शासन निर्णय दिनांक २२ जुलै २०२१ ची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राज्यातील अनुसूचित जाती जमाती तसेच नवबौद्ध शेतकर्यांसाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दीड लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर, इनवेल बोअरिंग, वीजजोडणी, जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, शेततळ्याचे प्लास्टि अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच इत्यादी कृषी बाबींसाठी अनुदान देण्यात येते.