विश्वकर्मा योजना सिलाई मशीन योजना: नमस्कार मित्रांनो, विश्वकर्मा योजने अंतर्गत जे काही शिलाई मशीन वाटप केलं जातं किंवा ज्या महिलांनी शिलाई मशीनसाठी अर्ज केलेले आहेत, त्यांची पुढील प्रक्रिया काय आहे, हा अनेकांच्या मनातील प्रश्न आहे. अर्ज तर केला आहे, परंतु नेमका आता पुढे लाभ कसा मिळणार आणि काय प्रक्रिया असेल, याबाबत बऱ्याच जणांच्या मनात शंका आहेत.
PM Vishwakarma Free Silai Machine Yojana Online Apply
अर्ज कसा करायचा, हे नवीन सांगण्याची आवश्यकता नाही कारण हा अर्ज तुम्ही स्वतः करू शकत नाही. त्यासाठी सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, आधार कार्ड अपडेट असणे अत्यावश्यक आहे.
विश्वकर्मा योजना सिलाई मशीन अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया
अर्ज दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद मार्फत त्याचा व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होते. हे झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र तुमचा अर्ज तपासते. त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनची ट्रेनिंग दिली जाते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला १५,००० रुपयांचा लाभ साहित्य खरेदीसाठी मिळतो.
PM Vishwakarma Silai Machine Yojana १५,००० रुपये कधी मिळतील?
ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला हा लाभ दिला जातो. काही ठिकाणी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते, तर काही ठिकाणी साहित्य खरेदीसाठी इन्व्हॉईस दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रक्रिया वेगळी असू शकते.
विश्वकर्मा योजना सिलाई मशीन कर्ज प्रक्रिया
विश्वकर्मा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं, ज्याचा वार्षिक व्याजदर ५% असतो. पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये कर्ज मिळतं, आणि ते परत केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये कर्ज मिळू शकतं.
अधिक माहिती
अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, आणि कर्ज यासंबंधित आणखी शंका असल्यास, तुम्ही आपल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधू शकता.
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2024 महाराष्ट्र माहिती