नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या लेखांमध्ये मतदान ओळखपत्र आणि आधार नंबर लिंक कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मतदान कार्ड ला आधार नंबर लिंक करण्यासाठी कोणत्या App ची गरज आहे, त्यासाठी आवश्यक त्या स्टेप्स कोणत्या, त्याची प्रोसेस काय ही सर्व माहिती तुम्हाला या लेखांमध्ये आज मिळणार आहे.
मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक कसे करायचे?
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मतदान ओळखपत्र आणि आधार नंबर लिंक करण्यासाठी प्ले स्टोर मधून Voter Helpline ॲप घ्यावे लागेल.
- त्या ॲप ची लिंक खाली दिलेली आहे.
- https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=mr&gl=US
- हे app तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर सर्वप्रथम Voter Registration वरील बटन दाबावे लागेल.
- नंतर फॉर्म 6 b बटन दाबावे.
- त्यानंतर Lets Strat या बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर आपला मोबाईल नंबर त्यामध्ये भरावा लागेल आणि ओटीपी टाकावा लागेल.
- ओटीपी भरून झाल्यानंतर Verify या बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर पुढचे पेज ओपन होईल त्यानंतर Next बटन दाबावे.
- आपला मतदान ओळखपत्र क्रमांक टाका आणि नंतर Maharashtra हे राज्य Place मध्ये निवडावे आणि Fetch या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर Proceed हे बटन दाबावे.
- आपलं मतदान ओळखपत्र क्रमांक माहिती आणि आधार डिटेल्स मध्ये आपला बारा अंकी आधार क्रमांक भरावा लागेल.
- आपला मतदान ओळखपत्र क्रमांक माहिती दिसेल आणि आधार डिटेल्स मध्ये आपला 12 अंकी क्रमांक आधार क्रमांक टाकावा लागेल.
- त्यानंतर मोबाईल नंबर भरावा लागेल.
- आपल्या गावाचे नाव भरून बटनावर Done वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दिसेल आणि खाली स्क्रोल करून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता आपल्याला Sucess म्हणून एक मेसेज येईल. त्यावर असे समजावे की आपले मतदान ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक झालेला आहे.
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2024 महाराष्ट्र माहिती