नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण कोबीचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती पाहणार आहोत.यामध्ये ड्रिपद्वारे कोबीचे खत व्यवस्थापन आणि फवारणी द्वारे आपण कोबीचे व्यवस्थापनाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी कोणते औषध/खत कोबी साठी योग्य ठरणार आहे, कोणते औषध/ खत कधी द्यावे आणि त्याच्या वेळा कोणत्या असणार आहेत हे पाहणार आहोत.यानुसार जर तुम्ही कोबी पिकासाठी नियोजन केले, तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे आणि उत्पादनात नक्कीच तुम्हाला वाढ दिसून येणार आहे . हे वेळापत्रक टेस्टेड आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ड्रिप द्वारे कोबीचे खत व्यवस्थापन कसे करायचे आणि ड्रिपद्वारे कोणत्या दिवशी कोणते औषध फवारायचे आणि त्याच्या किती फवारण्या करायचा. तसेच खत व्यवस्थापन कसे करायचे.
कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.
कोबी खत व्यवस्थापन वेळापत्रक –
- १. कोबी पिकाच्या लागवडीनंतरच्या पाचव्या दिवशी ड्रीपच्या साहाय्याने ह्युमिस्टार WG (४०० ग्रॅम ), इनटेक (५०० मिली),किश रूट हेल्थ (१४ ग्रॅम) प्रती एकर या प्रमाणात लागवडीनंतर खत ड्रीपने द्यावे.
- २. कोबी लागवडीनंतरच्या आठव्या दिवशी बासाफर प्लस (५०० ग्रॅम) या प्रमाणात प्रति एकर खत ड्रीपने द्यावे.
- ३.तिसरी फवारणी ही १० व्या दिवशी करावी. या फवारणी मध्ये नोव्हाटेक N-२१ (२.५० किलो) आणि सिलॉन (५०० मिली) एवढ्या प्रमाणात ड्रीपच्या साहाय्याने खत कोबी पिकासाठी ड्रीपने पुरवावे.
- ४.कोबी पिकाची चवथी फवारणी २० व्या दिवशी करायची आहे. त्यासाठी न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६ (२.५ किलो) ,बासफोलियर केल्प SL (५०० मिली) या प्रमाणात प्रती एकर ड्रीप च्या साहाय्याने कोबीला खत द्यावे.
- ५. त्यानंतर पाचव्या फवारणीसाठी हायड्रोस्पीड CaB(२.५० किलो), सिलॉन(५०० मिली) या प्रमाणात प्रती एकर ड्रीपच्या सहाय्याने लागवडीनंतर २५ व्या दिवशी कोबीला खत द्यावे.
- ६. कोबीच्या लागवडीनंतर ३० व्या दिवशी नोव्हाटेक १४:४८ (२.५ किलो) या प्रमाणात प्रती एकर ड्रीपने खत द्यावे.
- ७. त्यानंतर कोबीची सातवी फवारणी ४० व्या दिवशी करावी.त्या फवारणीसाठी न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७:०० (२.५० किलो), ह्युमिस्टार WG (४०० ग्रॅम), इनटेक (५००मिली) या प्रमाणात प्रती एकर कोबीला देण्यात यावे.
- ८. त्यानंतची आठवी फवारणी ही कोबी लागवडीनंतरच्या ५० व्या दिवशी करावी. त्यासाठी नोव्हाटेक १४:४८ (२.५० किलो) हे प्रति एकर या प्रमाणात ड्रीप च्या साहाय्याने पिकाला द्यावे.
- ९. त्यानंतर जी फवारणी कराची त्यासाठी नोव्हाटेक १४:८:३० (२.५ किलो) प्रती एकर या प्रमाणात कोबी लागवडीच्या ६० व्या दिवशी ड्रिप ने द्यावे.
- १०. शेवटचे खत हे कोबी लागवडीच्या ७० व्या दिवशी द्यावे. त्यामध्ये न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०:७:४६ (२.५ किलो) प्रति एकर या प्रमाणात ड्रीप ने द्यावे.
हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती
उन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन
कोबी फवारणी वेळापत्रक –
- १. कोबीची लागवड केल्यानंतर पहिली फवारणी ही १५ व्या दिवशी करण्यात यावी. त्यासाठी फोल्युर S (२ मिली),न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७.० (२.५ ग्रॅम ) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी.
- २. त्यानंतर कोबीची दुसरी फवारणी ही लागवडीनंतर २५ व्या दिवशी करावी. त्यासाठी फोल्युर S (२ मिली),न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७.० प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- ३. तिसरी फवारणी ही लागवडीनंतरच्या ३५ व्या दिवशी करण्यात यावी आणि त्यासाठी बासफोलीअर कव्हर (२ मिली) आणि बासफोलीअर बोरो (०.५० मिली) या प्रमाणात प्रति लिटर पाण्यात मिसळून ही फवारणी करण्यात यावी.
- ४. कोबी पिकाची चौथी फवारणी लागवडीनंतर च्या ४५ व्या दिवशी करावी आणि त्यासाठी बासफोलीअर कव्हर (२ मिली) आणि बासफोलीअर बोरो (०.५० मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून ही फवारणी करावी.
- ५. त्यानंतर पाचव्या फवारणीसाठी ऑमिफॉल (२.५ मिली), सिलॉन (२ मिली) हे प्रति लिटर पाण्यात मिसळून ५५ व्या दिवशी फवारणीद्वारे कोबीला द्यावे.
- ६. त्यानंतर ची फवारणी ही ६० व्या दिवशी करावी. ही सहावी फवारणी ही पाचव्या फवारणीप्रमाणे करावी.
- ७. कोबी लागवडीनंतरच्या ७० व्या दिवशी कोबीची शेवटची फवारणी म्हणजेच ही सातवी फवारणी असणार आहे, त्यासाठी न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६ (२.५ किलो),बासफोलीअर बोरो (०.५० मिली) हे प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मित्रांनो लक्षात घ्या या फवारणी आणि खत व्यवस्थापन, फळ आणि फवारणी व्यवस्थापन हे आपापल्या जमिनीचे माती परीक्षण करून त्याचा दर्जा तपासून पहा आणि नंतरच जमिनीच्या दर्जाप्रमाणे अशाप्रकारे फवारणी आणि खत व्यवस्थापन कोबी साठी करा,नक्कीच तुम्हाला चांगले उत्पादन मिळेल.