भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना PDF: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग फळबाग योजना अंमलबजावणी कार्यपद्धती माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये अर्ज केल्यापासून या योजनेच्या संपूर्ण अंमलबजावणी कश्याप्रकारे होते याची माहिती पाहणार आहोत. जसे कि योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती, फळबाग लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा किती, लाभार्थी पात्रतेचे निकष, फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे आणि शासन अनुदानित कामे कोणती, फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान वितरित करण्याचे निकष, फळबाग योजना अंमलबजावणी कार्यपद्धती PDF इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हला या योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊन अनुदान मिळवायचे असेल, तर हा लेखच तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024
- महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजने अंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते.
- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे. ते शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत.
- महाराष्ट्रात ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत आणि जॉब कार्ड नसल्यामुळे, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे.
- ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग लागवडीला देखील सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
अर्ज भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड १००% अनुदान योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती –
- या योजनेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावरून वर्तमानपत्रांमध्ये दर वर्षी एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. तसेच अन्य माध्यमातून पुरेशी प्रसिद्धी देऊन, इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येतात. ही अर्ज प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलेली आहे.
- इच्छुक शेतकऱ्यांनी जाहिरात दिल्यापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करावा लागत होता. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी शेतकरी पोर्टल मार्फत स्वीकारले जातात.
- या अर्ज स्वीकारल्यानंतर या योजनेअंतर्गत तालुकानिहाय सोडत काढून प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या सोडतीची माहिती महाडीबीटी पोर्टल वर नोटिफिकेशन द्वारे दर्शविण्यात येते.
- तालुक्यात नेमून दिलेल्या आर्थिक लक्षांकापेक्षा कमी अर्ज सादर झाले असतील, तर त्या तालुक्यासाठी पुन्हा जाहिरात देऊन ८ दिवसात पुन्हा अर्ज मागवले जातात आणि या प्राप्त अर्जांमधून सोडत पद्धतीनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
- ज्या अर्जदाराची निवड झाली आहे, त्याने २ दिवसात आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करणे गरजेचे असते.
- कागदपत्रे प्राप्त झाल्यास लाभार्थ्याला पूर्वसंमती प्रदान करण्यात येते. तसेच लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून किंवा नारळ रोपे उचल करण्यास परवाना देण्यात येतो.
- लाभार्थ्याला पूर्वसंमती प्राप्त झाल्यावर ७५ दिवसांमध्ये फळबागेची लागवड करणे आवश्यक असते. असे केले नाही, तर त्या लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येते आणि प्रतीक्षा यादीत असणाऱ्या अर्जदारांची त्याच्या ठिकाणी निवड केली जाते.
Mahadbt शेतकरी योजना माहिती
फळबाग लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा किती?
- या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी कोकण विभागासाठी कमीत-कमी ०.१० हेक्टर ते जास्तीत जास्त १० हेक्टर तर उर्वरित विभागांसाठी ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर मर्यादा पर्यंत अनुदान अनुज्ञेय राहील.
- कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकतो.
- लाभार्थ्याच्या ७/१२ नोंदीनुसार त्याला संयुक्त खात्यावरील त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरिताच त्याला लाभ घेता येईल.
- जर लाभार्थ्याने यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेअंतर्गत किंवा राज्य रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असेल, तर ते लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी शेतकरी लाभ घेण्यास पात्र असेल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष –
- फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे शेत जमिनीचा ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. जर संयुक्त खाते असेल, तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.
- जर लाभार्थ्याची शेत जमीन कुळ कायद्याखाली येत असेल, ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळ कायद्याचे नाव असेल, तर ही योजना राबवण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक असेल.
- सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार करता येईल.
- निवड करताना प्राप्त अर्जांमधून अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग यांना प्राधान्य देण्यात येईल.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान अर्थसहाय्य देऊन लाभ देण्यात येणार नाही.
फळबाग लागवड योजनेसाठी आवश्यक कामे –
अ. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे –
- जमीन तयार करणे.
- सेंद्रिय खत मिश्रण आणि खड्डे भरणे.
- रासायनिक खत वापरून खड्डे भरणे. अंतरमशागत करणे.
- काटेरी झाडांचे कुंपण करायचे असल्यास ते करणे. (ऐच्छिक)
ब. शासन अनुदानित कामे –
- खड्डे खोदणे.
- कलमे लागवड करणे.
- पिक संरक्षण नांग्या भरणे.
- ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे १०० टक्के राज्य शासन अनुदानावर केली जातील.
अल्पभूधारक शेतकरी योजना
फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान वितरित करण्याचे निकष –
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास तीन वर्षात १०० टक्के अनुदान देय असेल. त्यामध्ये या तीन वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० या प्रमाणात अनुदान देय राहील. खालील तक्त्यात अनुदान विवरण देण्यात आलेले आहे
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?