किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हि माहिती खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे संपूर्ण लेख वाचा. सरकार राज्यातील पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभ घेत असाल, तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा माहित नसेल, तर त्याची संपूर्णं माहिती आपण पाहणार आहोत. तुम्ही किसान कार्ड च्या मदतीने बियाणे , खते आणि पाण्यासाठी स्वस्त व्याजदराने बँकांकडून कर्ज काढू शकता. तसेच शेतकऱ्यांना किसान सम्मान निधी योजनेचा हि लाभ त्याद्वारे घेता येईल.
काय आहे हे किसान क्रेडिट कार्ड ?
शेतकरी क्रेडिट कार्ड बँकांमार्फत शेतकऱ्यांना दिले जाणारे एक कार्ड आहे . कीटकनाशके,खत, बियाणे, इत्यादी शेतीविषयक गोष्टींसाठी शेतकर्यांकडे पैसे नसतात त्यामुळे ते सावकारांकडून कर्ज काढतात. त्या कर्जाचा व्याजदर खूप जास्त असतो . त्यामुळे कर्ज उपलब्ध करून देणे हे या किसान कार्ड अंतर्गत शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. आणि दुसरा उद्देश, सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज नाही. कारण ते मनमानी व्याज वसूल करतात. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेले कर्ज २-४ टक्क्यांनी स्वस्त शेतकऱ्यांसाठी दिले जाते. परंतु यासाठीची अट अशी आहे की, ते कर्ज शेतकऱ्याला वेळेवर परत करावे लागते. जर तुम्ही शेतकरी आणि तुम्ही अद्याप किसान कार्ड काढले नसेल , तर लवकरच हे कार्ड काढून घ्या. कारण किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना शेतीशी संबंधित कामांसाठी कर्ज दिले जाते.या कर्जाचा व्याजदर हि कमीच असतो. म्हणून हे कर्ज घेणे खूप स्वस्त आहे. किसान क्रेडिट कार्ड पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेले आहे. किसान कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्यपालनास २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
किसान क्रेडिट कार्ड चा लाभ कोण घेऊ शकते?(pm kisan loan yojana online apply elegibility)
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे कमीत कमी वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ७५ वर्षे असणे गरजेचं आहे.
- जर तुम्ही शेती, मत्स्यपालन व पशुसंवर्धनाशी जोडलेली कोणतेही व्यवसाय करत असाल ,तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड मिळण्यास पात्र आहात.
- शेतकरी स्वत: च्या जमिनीवर शेती करीत असला, तरी तो त्याचा फायदा घेऊ शकतो.
- जर शेतकर्याचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्या शेतकऱ्याचा फॉर्म भरल्यानंतर तो त्यास पात्र आहे की नाही हे बँक कर्मचाऱ्याला कळेल, आणि तो त्या अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला सांगेन . कि तो पात्र आहे का नाही.
किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कुठे करायचा? (pm kisan loan yojana online apply)
या योजनेसाठी पात्र आणि इच्छुक शेतकरी अर्ज करण्यासाठी https://pmkisan.gov.in या केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड च्या अधिकृत संकेतस्थाळावर जाऊन अर्ज करू शकतात.
किसान क्रेडिट कार्ड फॉर्म हा शेतकऱ्याला त्याच्या जमीनीच्या कागदपत्रांसह आणि पिकाच्या तपशीलाने भरावा लागेल. आपण इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही ही माहिती देखील द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही तो अर्ज वाचून नीट भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड येईल.
किसान क्रेडिट अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील ?
- आधार कार्ड
- एक पासपोर्ट आकाराचा फोटो
- पॅन कार्ड
- शेतजमिनीचा उतारा
- ज्या शेतकर्याला क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे त्यांनी या कागदपत्रांसह प्रतिज्ञापत्र बँकेत जमा करणे देखील आवश्यक असेल, ज्यामध्ये असे नमूद असते कि यापूर्वी मी इतर कोणत्याही बँकेकडून अद्याप कर्ज घेतलेले नाही.
- वरील कागदपत्रे बँकेत घेऊन जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता. त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला ते मिळेल.
पशु किसान क्रेडिट कार्ड अप्लाई
किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर-
जर काही मदत हवी असेल, किंवा बँक लोन देत नसेल, तर किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर – ०१२०-६०२५१०९ / १५५२६१. यावर संपर्क करू शकता.
अद्याप या योजनेची माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही. जर तुम्ही हि पात्र असून अद्याप लाभ घेतला नसेल, तर लवकरच जवळच्या बँक शाखेत वरील कागदपत्रासह जाऊन अर्ज करू शकता. आणि आपल्या शेती साठी कर्ज घेऊ शकता. तसेच किसान सम्मान योजनेचा हि लाभ या किसान क्रेडिट कार्ड द्वारे घेऊ शकता. कारण किसान क्रेडिट कार्ड आणि किसान सम्मान योजना एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. जर आणखी काही माहिती हवी असेल, तर कंमेंटद्वारे कळवू शकता. आम्ही नक्कीच ती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना