Dindayal Yojana स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजना 2024 संबंधित आज आपण या लेखात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे हि योजना, या योजनेअंतर्गत लाभ, अटी, निकष, पात्रता, कागदपत्रे, Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana PDF शासन निर्णय, ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही हि महाराष्ट्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेऊ इच्छिता, तर नक्कीच हा लेख संपूर्ण वाचा.
Pandit Dindayal Swayam Yojana Information in Marathi
राज्यात विविध ठिकाणी महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीआय अल्पमुदतीचे कौशल्य वरील आधारित अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची सोय करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाने ही विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना एसटी / एससी / अल्पसंख्याक आणि राज्यातील सर्वात मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करेल. महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना’ चे लाभ दिले जात आहेत. ज्याअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची क्षमता असूनही नियमित उत्पन्नामुळे उच्च शिक्षण मिळू शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकार आर्थिक मदत देईल.
आदिवासी विकास विभागासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र राज्यात एकूण ४९५ वस्तीग्रह मंजूर असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता ६१७० इतकी आहे. त्यापैकी ४९१ शासकीय वस्तीग्रह म्हणून कार्यरत आहेत. २८३ वस्तीग्रह मुलांची व २०८ वस्तीग्रह ही मुलींची आहेत. या वसतिगृहांची विद्यार्थी क्षमता ५८,४९५ इतकी आहे.
सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply
महाराष्ट्र दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेंतर्गत कोणत्याही विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाचा लाभ महाराष्ट्र राज्यासह भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून मिळू शकतो. तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
अनुसूचित आदिवासी जमातींसाठी ही योजना विशेषत: सुरू केली गेली आहे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वर्गवारीत येत आहेत.या योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल जेणेकरून ते उच्च पाठपुरावा करू शकतील. त्यांचे दर वाढविणे. या योजनेद्वारे आदिवासी जमातींना शिक्षणाद्वारे रोजगार आणि सबलीकरण वाढविण्याबरोबरच सामाजिक-आर्थिक परिस्थितीत चांगल्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील.
महाराष्ट्र दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना उद्दिष्टय –
- महाराष्ट्र दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेचे मुख्य उद्दीष्ट अनुसूचित जाती / जमाती / अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे आहे. जेणेकरुन विद्यार्थी देखील त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील.
- उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच ग्रामीण भागातून आणि दुर्गम क्षेत्रातून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या किंवा विभागीय मुख्यालयाच्या महानगरांच्या ठिकाणी हे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना या ठिकाणी निवास भोजन तसेच इतर खर्च हे परवडत नसल्याने त्यांना अशा सुविधा मोफत पुरवण्यासाठी या योजनेअंतर्गत शासकीय वसतीग्रहामध्ये प्रवेश देण्यात येतो.
- घराच्या आर्थिक परीस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण सोडावे लागते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दिलेली आर्थिक मदत या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास पूर्ण करण्यास प्रवृत्त करणे आणि त्याचे जीवनमान उंचावणे.
शासन निर्णय पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना
अनुसूचित जमातीच्या शासकीय सतीग्रह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी नंतर उच्च शिक्षणाकरिता भोजन निवास आणि इतर खर्च म्हणजेच इतर शैक्षणिक साहित्य इत्यादीसाठी त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आर्थिक थेट रक्कम वितरण करण्याबाबत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना 2024 अंतर्गत वितरित करण्यात येते.
सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सद्यस्थितीत शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण २०,००० विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
१० कोटी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम शिष्यवृत्ती योजनेसाठी निधी वितरित
तसेच सन २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून शासकीय वस्तीग्रह मध्ये प्रवेश घेणे किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणार आहेत. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात एकूण मंजूर प्रवेशक्षमता १,०७० व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेशक्षमता २०,००० अशी एकूण ८१,०७० एवढ्या क्षमतेच्या कमीत कमी ५० टक्के मर्यादेत सन २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व गुणानुक्रमाने त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरण केलेल्या शहरांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेण्याकरिता वार्षिक खर्चासाठी आर्थिक मदत म्हणून रक्कम वितरित करण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम आणि तपशील खालील तक्त्यात दर्शवलेली आहे.
तक्त्यात दर्शवली रक्कम व्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष रुपये ५,०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रति वर्ष २,०००/- इतकी रक्कम ही शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येते.
अर्ज सुरु डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना संपूर्ण माहिती
महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी विद्यार्थ्यांची पात्रता –
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
- तो अनुसूचित जाती / जमाती / ओबीएस जमाती आणि आदिवासी जमातीचा असावा.
- बोर्डाने / विद्यापीठाने घेतलेल्या मागील परीक्षेत एकूण गुणांपैकी किमान ६०टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.
- विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जात पडताळणी पत्र सादर करणे आवश्यक असेल.
- विद्यार्थ्यानी स्वतःचा आधार क्रमांक संलग्न असलेले राष्ट्रीयकृत बँक खाते क्रमांक देणे बंधनकारक राहील.
- विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी शिष्यवृत्तीसाठी उत्पादन मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पादन मर्यादा लागू राहील.
- या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शहरांमध्ये राहणे आवश्यक राहील.
- विद्यार्थ्याने ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला आहे, त्याच शहराचा तो रहिवासी नसावा.
पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अटी –
- अर्जदार विद्यार्थी हा बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
- निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्याला त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभ मिळेल.
- केंद्र सरकारच्या पोस्ट मेट्रीक शिष्यवृत्ती करता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल, तसेच दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
- एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेसाठी लाभ अनुज्ञेय राहणार नाही. तसेच प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यास सुद्धा लाभ घेता येणार नाही.
- विद्यार्थ्याची संस्था आणि महाविद्यालयातील उपस्थिती ही ८० टक्क्यांपेक्षा अधिक असणे बंधन कारक आहे
- अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्यशासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेमध्ये मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा. तरच त्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल.
१६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना निकष –
- आदिवासी जमातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा प्रथम लाभास पात्र राहतील.
- या योजनेचा लाभ बारावीनंतरचे उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. या योजनेकरिता एका विद्यार्थ्यास फक्त सात वर्षे या योजनेच्या लाभाचा फायदा घेता येईल. सात वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही.
- जर विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमादरम्यान अनुत्तीर्ण झाला, तर या योजनेचा लाभ त्याला घेता येणार नाही.
- विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय करत असल्यास या योजनेचा लाभ देय नाही.
- विद्यार्थी आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तीग्रह मध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसल्यास सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- विद्यार्थ्याचे वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे, तरच सदर योजनेच्या लाभास विद्यार्थी पात्र राहील.
सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply
महाराष्ट्र दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आर्थिक लाभ –
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वर्षाकाठी अडीच ते सहा लाखांपर्यंत असेल आणि ज्यांनी शिक्षण कर्ज घेतले असेल त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज सरकार देईल.
- श्रेणी १ शहरे: दरमहा रू. ६,०००/-
- श्रेणी २ शहरे: दरमहा रू. ५,०००/-
- श्रेणी ३ शहरे: दरमहा रू. ४,०००/-
Online Registration प्रधानमंत्री कौशल विकास योजना pmkvy फॉर्म
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- जात पडताळणी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासीप्रमाणपत्र
- स्कूल मार्क पत्रके
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- खाते क्रमांक
- आयएफएससी कोड
- एनआयसीआर कोड
Dindayal Yojana Important Links
Official Website | Link |
Registration Link | Registration |
User Manual Guide PDF |
दीन दयाल उपाध्याय योजना Apply
- सर्वप्रथम, योजनेच्या अधिकृत स्वयम महाऑनलाईन संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यानंतर खाली Login to your Account हे पृष्ठ प्रदर्शित होईल.
- स्क्रीनच्या उजव्या बाजूला, ग्रीन कलर बॉक्स अस्तित्वात आहे जो वेबसाइटवर अपडेट दर्शवितो.विद्यार्थीच्या. तारखा, अनिवार्य गोष्टी इ.
- प्रथमच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने नवीन विद्यार्थी (New student ) म्हणून रजिस्ट्रेशन पर्याय निवडावा.
- त्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पृष्ठ उघडेल, त्यामध्ये आधार क्रमांक, नाव, मोबाइल नंबर, लिंग, जन्मदिनांक, पासवर्ड इत्यादी माहिती भरावी.
- त्यानंतर save या बटनावर क्लिक करावे. अश्याप्रकारे तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
जर अद्याप आपणास काही समस्या येत असेल, तर आपण विभागास मेल करू शकता. त्यासाठी मेल आयडी tddhostelhelp@gmail.com यावर संपर्क करा.
- Latest पीक विमा योजना GR अनुदान मंजूर! पहा कोणत्या हंगामासाठी किती कोटी अनुदान मंजूर!!
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना परीक्षा आणि प्रशिक्षण याबद्दल संपूर्ण माहिती
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024