Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2025

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Online गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना 2025

Posted on December 24, by Mahasarkari Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये मत्स पालन योजनेचे उद्दिष्ट्य , लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकष, अर्ज कुठे करायचा, मयोजनेची कार्यपद्धती, आर्थिक अनुदान, खर्चाचा मापदंड इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून भविष्यातील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदलाविषयी कृती आराखडा मध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून मोठ्या दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्यांवर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहेत. परिणामी शेती मधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच त्यांना नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच शार्प असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

राज्यातील कोरडवाहू शेती क्षेत्रात मध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहीर, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते. सिंचन बरोबरच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करण्यासाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थ सहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये सामाविष्ट केलेला आहे.

nanaji deshmukh krushi sanjivani yojana image
Contents hide
1 पोखरा योजनेत योजनेतील गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या योजनेचे उद्दिष्ट –
1.1 मत्स पालन योजनेतील लाभार्थी पात्रता –
1.2 गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेअंतर्गत अनुदान/ अर्थसहाय्य –
2 गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेची कार्यपद्धती –
2.1 मत्स्यबीज खरेदीबाबत –
2.2 अनुदान कसे मिळणार आणि त्यासाठी काय करावे लागणार?
2.3 गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेसाठी लाभ घेण्यासाठी किती टक्के अर्थसहाय्य असणार आहे ?
2.4 आवश्यक कागदपत्रे –
2.5 अर्ज कुठे करावा –
2.6 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.
2.6.1 (पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना फॉर्म pdf महाराष्ट्र
2.7 Related

पोखरा योजनेत योजनेतील गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या योजनेचे उद्दिष्ट –

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना पूर्णतः सक्षम बनवणे.
  • संरक्षित सिंचन व बरोबरच जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यशेती द्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेमागचा चे उद्दिष्ट आहे.
  • उपलब्ध नैसर्गिक साधनांचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी कार्यक्षमपणे वापर करून मत्स्यशेती विकसित करणे आणि शेतकऱ्यांचे रोजगार वाढविणे.

मत्स पालन योजनेतील लाभार्थी पात्रता –

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेला गाव पातळीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले, अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती/जमाती , महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • सिंचनासाठी सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
  • मत्स्य शेती अंतर्गत घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार नाही.
  • शेतकऱ्याकडे पाण्याचा साठा हा कमीत कमी ८ ते १० महिने असणे आवश्यक असणार आहे.
  • मत्स्य पालन तलाव करण्यासाठी  हे शक्यतो आयताकृती असावेत. ज्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी फिरवणे सोयीचे जाते.
  • तलावाची खोली किमान १.२ मीटर ते २ मीटर असणे आवश्यक आहे.

गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेअंतर्गत अनुदान/ अर्थसहाय्य –

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या उपघटकांचा साठी प्रतिहेक्टर अपेक्षित खर्चाचा तपशील हा खालील तक्त्यात देण्यात आला आहे. सदर तपशील आवरून शेततळ्याच्या आकारानुसार येणाऱ्या एकूण खर्चाचा रकमेच्या ५० टक्के अर्थसाहाय्य शेतकऱ्याला देय राहील.

godya panyatil mats palan yojana pocra

गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेची कार्यपद्धती –

  • शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्याने अपलोड केलेले कागदपत्रांची छाननी करून अर्जाची अत्यल्प व अल्पभूधारक अशा प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग महिला, शेतकरी व इतर सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने वर्गवारी केली जाते.
  • सर्व ऑनलाईन अर्ज ग्राम कृषी संजीवनी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केले जातात. तेथून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर असा ठराव संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतो.
  • शेतकऱ्यांसाठी योजनेच्या अटी व शर्ती तसेच घटकांबाबत चे आर्थिक व तांत्रिक निकष समजून सांगितले जातात.
  • पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती बाबत अवगत केले जाते.

मत्स्यबीज खरेदीबाबत –

  • लाभार्थीने पूर्वसंमती मिळाल्यानंतर या घटकाची अंमलबजावणी करावी. मत्स्यबीज खरेदी लाभार्थ्याने मत्स्य विकास विभागाच्या शासकीय मत्स्यबीज केंद्राकडून करणे आवश्यक असणार आहे. बीज शिल्लक नसल्यास, इतर खाजगी मत्स्यबीज केंद्राकडून त्यांचे जबाबदारीवर खरेदी करावे. परंतु लाभार्थ्याला शासकीय दरानुसार मत्स्यबीज खरेदीसाठी अनुदान देय असणार आहे.

अनुदान कसे मिळणार आणि त्यासाठी काय करावे लागणार?

लाभार्थीने ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. सोबत मत्स्यबीज खाद्य व खते इत्यादी निविष्ठांची खरेदी देयकांच्या मूळ प्रति ऑनलाइन अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येईल. मत्सपालना बाबत लाभार्थ्यासाठी प्रशिक्षण शासकीय खर्चाने करण्यात येईल.

गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेसाठी लाभ घेण्यासाठी किती टक्के अर्थसहाय्य असणार आहे ?

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प गावातील अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
  • दोन ते पाच हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५% अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • ७/१२ प्रमाणपत्र
  • ८-अ प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा –

इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

  • पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना
  • पोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे १०० टक्के अनुदान योजना माहिती
  • पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती
  • पोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना
  • नवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकराअंतर्गत)
  • (पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
  • (पोखरा अंतर्गत) ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज
  • (पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना फॉर्म pdf महाराष्ट्र

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
  • Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
  • Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
  • वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
  • Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
  • छत्तीसगढ़ राशन कार्ड नवीनीकरण कैसे करें 2025
  • PM Suryodaya Yojana 2025: Online आवेदन, लाभ, पात्रता पूरी जानकारी
  • Mukhya Mantri Lok Sevak Arogya Yojana Assam Online Registration 2025 पूरी जानकारी
  • Online 2025-25 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2025
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2025
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2025
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2025
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2025 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme