Gay Gotha Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, माननीय शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सरकारने शरद पवार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा मंत्रिमडळात निर्णय झाला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी या योजनेचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना काम मिळत नाही त्यांना स्थलांतर करून शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते, हीच गोष्ट लक्षात घेऊन स्थलांतर रोखण्यासाठी आणि योग्य ती रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय असणार आहे. मनरेगाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजगारदेखील या योजनेशी जोडले जाणार आहे.
चला तर मग मित्रांनो, पाहुयात काय आहे हि योजना, कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे, तसेच आवश्यक पात्रता कोणती असणार आहे, कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे –
- कुक्कुटपालन/पोल्ट्री शेड बांधणे.
- शेळीसाठी शेड बांधणे
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
- गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे.
- या घटकांसाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे.
Gay Gotha Yojana लाभ मिळणाऱ्या घटकांची माहिती –
गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे –
गाई व म्हशींसाठी निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते. त्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसते, याच कारणामुळे शेतकऱ्याला जनावरे ओबडधोबड ठिकाणी बांधावे लागतात. अश्या ठिकाणी गुरे बांधल्यामुळे आरोग्याची काळज़ी नीट होत नाही. त्यामुळे जनावरांना विविध आजार होतात.
यासोबतच शेतकऱ्याला गुरांचे शेण यांची साठवणूक हि नीट करता येत नाही. यामुळेच या योजनेअंतर्गत गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान देऊन महाराष्ट्र शासनाने अर्थसाहाय्य केले आहे. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च होईल. २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर त्यापेक्षा अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान शासन देणार आहे.
५०% अनुदान १० शेळ्या,२ बोकड, शेड गट वाटप योजना शासन निर्णय pdf
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग –
नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च होईल. तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. कंपोस्ट बघत हे शेतीचे आरोग्य सुधरवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते. शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यावर शेताच्या पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. यासाठी शेतात नाडेप बांधण्यासाठी ही योजना आहे. नाडेप मध्ये कचरा, शेणखत, सेंद्रिय पदार्थ आणि माती यांचे एकावर एक ठार रचले जातात. आणि 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीच त्याचे रूपांतर भुसभुशीत कंपोस्ट मध्ये होते. यामुळे जमिनीचा कास सुधारण्यास मदत होऊन उत्पन्न वाढावे हे या योजनेमागचा मुख्य उद्देश्य असणार आहे.
कुक्कुटपालन/पोल्ट्री शेड बांधणे –
प्रत्येक शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च येईल. १०० कोंबड्या यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला कोंबड्यांची संख्या १५०च्या वर नेल्यास मोठ्या निवारा शेडसाठी दुप्पट निधी सरकार उपलब्ध करून येईल. कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांना जोड धंदा म्हणून करता येईल आणि अंड्याच्या मार्फत त्याला आर्थिक चणचण भासणार नाही. म्ह्णून या योजनेअंतर्गत शासनाने पंक्षांच्या निवाऱ्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य केले आहे.
शेळीपालन शेड बांधणे –
एका शेळीपालन शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये येईल. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजुर करून देण्यात येणार आहे येईल. शेळ्यांसाठी शेड बांधून दिल्यास शेळ्यांचे आरोग्य हि चांगले राहण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांच्या मलमूत्रापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खताची देखील निर्मिती होणार आहे. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत अनुदान देऊन अर्थसहाय्य केले आहे.
Gay Gotha Yojana लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता –
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत
- लाभार्थी कोणत्याही संघटनेचा भाग असू नये कारण हि योजना राज्यातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी आहे.
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आवश्यक आहे.
Gay Gotha Yojana PDF
गाय गोठा अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- जन्माचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- मतदान कार्ड
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला (पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला)
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा असावा.
- या अगोदर कुठल्याही जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र.
- ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेचे सहहिषदार असल्यास त्यांचे संमती पत्र/ना हरकत प्रमाणपत्र.
- भूधारक प्रमाणपत्र
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- पशुधन पर्यवेक्षक ग्रामसेवक व सरपंच यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र किंवा जॉब कार्ड असणे आवश्यक.
- जनावरांसाठी गोठा बांधण्याची अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.
गाई गोठा अनुदान योजना 2024 साठी अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या नागरिकांनी सर्वप्रथन Gay Gotha Yojana Anudan Form डाउनलोड करून घ्यावा. ज्याची लिंक खालील बटणामध्ये दिली गेलेली आहे.
- आत्ता त्या अर्जात विचारलेली गेलेली सर्व माहिती अचूक भरून अर्जासोबत वरील आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत.
- हा अर्ज आत्ता तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचा आहे आणि जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.
- अश्याप्रकारे तुमची गाय गोठा अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहे.
- जर तुम्हाला काही प्रश्न आणि शंका कुशंका असतील तर तुम्ही या योजनेचा PDF पाहू शकता जो वर दिलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही खाली दिलेल्या टोलफ्री नंबर वर देखील संपर्क करू शकता.
Reference – https://mahaegs.maharashtra.gov.in/
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form