नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतमाल तारण कर्ज योनजेविषयी माहिती पाहणार आहोत. जर तुम्हला हि अश्या प्रकारच्या कर्जाचा लाभ घेयचा असेल, तर नक्कीच हा लेख संपूर्ण वाचा. यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, कोणत्या शेतमालासाठी कर्ज घेता येईल,त्याची परतफेड कालावधी आणि व्याजदर किती असणार, तसेच लागू अटी व शर्ती कोणत्या असणार आहेत? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.
शेतमाल तारण कर्ज योजनेचे उद्दिष्ट्य –
सन १९९०-९१ पासून कृषि पणन मंडळाद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक गाव पातळीवर स्टेटीतून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा नसतात. त्यामुळे शेतीमालाचे काढणी नंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊनयेतात. त्याच वेळेला सर्वांचे शेतमाल एकत्र आल्याने शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. शेतकऱ्यांना शेतमाल साठवणून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास, त्या शेतमालास जास्त बाजार भाव मिळू शकतोआणि शेतकऱ्याला त्याच जस्ट फायदा होऊ शकतो. यासाठीच जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा मिळावा, या दृष्टीकोनातून विचार करून शेतकरी तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्या शेतमालाचा समावेश आहे ?
सदर योजने अंतर्गत कर्जासाठी मूग, गहू, बेदाणा,उडीद, सोयाबीन, चना, तूर, भात (धान), करडई, ज्वारी, सुर्यफूल, बाजरी, मका, काजू बी, हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असुन,सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन, ६ महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना ३% व्याज दारात सवलत देण्यात येते.
शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर-
१. शेतमाल प्रकार- सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना
कर्ज वाटपाची मर्यादा – प्रत्यक्ष बाजारभावानूसार एकूण किंमतीच्या 75% रक्कम.
मुदत- ६ महिने
व्याज दर – ६ टक्के
२.शेतमाल प्रकार – मका,ज्वारी, गहू, बाजरी
कर्ज वाटपाची मर्यादा – एकुण किंमतीच्या ५० टक्के रक्कम. (रू. पाचशे /- प्रती क्विंटल किंवा प्रत्यक्ष बाजार भाव यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम)
मुदत- ६ महिने
व्याज दर – ६ टक्के
३..शेतमाल प्रकार – काजू बी
कर्ज वाटपाची मर्यादा – एकूण किंमतीच्या ७५% रक्कम. (रु.५० प्रति किलो अथवा प्रत्यक्ष बाजार भावाची किंमत यापैकी कमी असेल,तर ती रक्कम)
मुदत – ६ महिने
व्याज दर – ६ टक्के
४. शेतमाल प्रकार – बेदाणा
कर्ज वाटपाची मर्यादा – एकुण किंमतीच्या कमाल ५०% किंवा जास्तीत जास्त रु. ५०,०००/- प्रति मेट्रिक टन यातील कमी असणारी रक्कम
मुदत – ६ महिने
व्याज दर – ६ टक्के
शेतमाल तारण कर्ज योजनेच्या लागू अटी –
- सदर कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचाच शेती माल स्विकारला जाणार आहे. फक्त शेतकऱ्यांनाच या कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांचा माल स्विकारला जात नाही.
- शेतकऱ्याने बाजार समितीकडे तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा जबाबदारी संबंधित बाजार समितीची असणार आहे. ती विनामुल्य आहे. त्यासाठी शेतकऱ्याला अतिरिक्त रक्कम अडा करायची गरज नसणार आहे.
- शेतकऱ्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्यादिवसाचे चालू बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल, ती ठरविण्यात येते.
- कर्जासाठी तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी हि त्या संबंधीत बाजार समितीची असणार आहे.
शेतकऱ्यांच्या फायद्याची शेतमाल तारण कर्ज योजना माहिती –
कर्जाची परतफेड मुदत आणि वीजदर किती ?
- तारण कर्ज योजनेच्या कर्जाची परतफेड मुदत ६ महिने म्हणजेच १८० दिवस असुन, तारण कर्जास व्याजाचा दर ६% आहे.
- बाजार समितीकडून कृषि पणन मंडळास ३% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). ठरून दिलेल्या मुदतीत कर्ज न फेडल्यास व्याज सवलत शेतकऱ्याला मिळणार नाही.
- महिने (१८० दिवस) मुदतीनंतर ६ महिन्यापर्यत८% व्याज दर व त्याचे पुढील ६ महिन्याकरिता १२% व्याजदर आकारला जातो.