Aai Loan Yojana Online Apply 2026: महिलांसाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज संपूर्ण माहिती: आई कर्ज योजनेत महिलांसाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे. या ब्लॉगपोस्टमध्ये आपण ही योजना काय आहे, फायदे काय आहेत, उद्दिष्ट काय आहे, कोणते कागदपत्र लागतात, अर्ज कसा करायचा, ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
उद्देश
महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन प्रकल्पांना जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कम वरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणुसार पर्यटन संचालनालयाकडून केला जाईल.
आर्थिक सहाय्य
महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरिता बँकेने रु. १५ लक्ष पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केल्यास महिलेनें वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास हप्ता भरल्यानंतर त्यातील व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत) कर्ज परतफेड किंवा ७ वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रु. ४.५० लक्षाच्या मर्यादेपर्यंत जे आधी घडेल तो पर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरूपात अदा करेल.
Aai Loan Scheme Highlights
| घटक | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | आई (व्याज परतावा धोरण) |
| पात्र लाभार्थी | व्यावसायिक महिला |
| योजनेचे स्वरूप | महिलांनी उद्योगासाठी ₹15 लाखांपर्यंत कर्ज घेतल्यास त्या कर्जावरील व्याज शासनाकडून परत दिले जाते |
| योजना राबवणारा विभाग | पर्यटन विभाग |
| जास्तीत जास्त व्याज परतावा | ₹4.50 लाख |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो |
व्यवसायाचे प्रकार आणि क्षेत्र
१ पर्यटन व्यवसाय क्षेत्र
१. पर्यटन व्यवसाय क्षेत्र पूर्ण महाराष्ट्रातील असावे.
२ व्यवसायाचा प्रकार
अ)
कॅरव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन (जमीन,हवा,जल) पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी अँड बी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, हॉस्टेल, हॉलिडे होम्स, पर्यटन व्हिला, वुडन कॉटेजेस, पॉण्ड्स इ.
ब)
रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्ट फुड, महिला चालित कॉमन किचन, कॅफे
क)
टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर मार्गदर्शक, क्रूज, टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी, आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर,
ड)
आदिवासी / निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, मेडिकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेद, योगा केंद्र इ.
इ)
इतर पर्यटन व्यवसाय
महिला बचत गट कर्ज योजना 2026 | Mahila Samridhi Yojana 2026
Aai Loan Yojana Online Apply लाभार्थी अर्हता व शर्ती
I. महाराष्ट्राची रहिवासी असावी व महिला अर्जदार असावी.
II. लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
III. पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा असावा व त्यांनी चालविलेला असला पाहिजे
IV. पर्यटन संचालनालयात ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी या महिला असणे आवश्यक आहे.
इतर अटी व शर्ती
- अस्तित्वातील वृद्धी किंवा क्षमता वाढविणे.
- क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये सहभागी होणे आवश्यक असेल.
➤ महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज करावा किंवा पर्यटन संचालनालयाची अधिकृत वेब पोर्टल अंतिम झाल्यावर ऑनलाइन अर्ज करणे बंधन कारक असेल असा प्रस्ताव सादर केल्यानंतर दिलेल्या अटी व शर्तींनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास महिला अर्जदारास ऑफ लाईन किंवा संगणकीत स्वरूपात हेतू पत्र (Letter Of Intent) मंजुरीपत्र दिले जाईल. महिला अर्जदाराने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे.
परताव्याच्या अटी
▪ जर महिलांनी मध्येच नियमित कर्ज परत फेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
▪ पर्यटन व्यवसाय सुरू असल्याचे दोन फोटो सादर करण्यात यावे किंवा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात यावे.
पर्यटन संचालनालयामार्फत कर्जाच्या व्याज रकमेच्या परतावा
❖ महिला उद्योजकांनी पर्यटन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरल्यानंतर हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत) आधार लिंक खात्यात दरमहा पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत जमा करण्यात येईल. व्याजाच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही चार्जेस / फीस आकारली जाणार नाही.
Aai Loan संबंधी अट
या योजने अंतर्गत महिला लाभार्थीने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या (CBS) प्रणालीयुक्त व RBI च्या नियमां अंतर्गत कार्यरत असणाऱ्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.
प्राधान्य
पर्यटन स्थळांच्या परिसरातील महिला पर्यटन उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल.
पोस्ट ऑफिस योजना 2026 मराठी: अर्ज, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती
दस्तऐवज आणि मार्गदर्शक सूचना
‘आई’ पर्यटन धोरणांतर्गत व्याज अनुदान मिळविण्यासाठी अर्ज दाखल करण्याबाबतच्या सूचना आणि त्याबाबतचे पुरावे सादर करावेत.
अर्जाबाबत सूचना
विहित नमुन्यातील अर्ज फक्त जेव्हा अर्जदाराने नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्याचा किंवा पर्यटन क्षेत्रात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला असेल तेव्हाच भरावा.
अर्ज करण्याचा पत्ता
अर्ज करावा/ पत्ता द्यावा: उपसंचालक पर्यटन, पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय – नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर.
Aai Loan Yojana Documents | आवश्यक कागदपत्रे
कृपया खालील कागदपत्रे स्वतः साक्षांकित करून संलग्न करा
a. www.gras.mahakosh.gov.in या लिंकवर रु. ५० ऑनलाइन प्रक्रिया शुल्क भरा. कोकण विभागासाठी पर्यटन संचालनालय, इतर पावती आणि कोषागार जिल्ह्यासाठी ठाणे जिल्हा निवडा, पुणे विभागासाठी पुणे जिल्हा, नाशिक विभागासाठी नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजी नगर विभागासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्हा, अमरावती विभागासाठी अमरावती जिल्हा व नागपूर विभागासाठी नागपूर जिल्हा निवडा.
b. खालीलपैकी एक ओळखपत्र अर्जदारांच्या ओळखीचा पुरावा आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र
c. खालीलपैकी एक ओळखपत्र पर्यटन केंद्र/व्यवसाय/उद्योग यांच्या पत्त्याचा पुरावा
i. उद्योग नोंदणी किंवा वीज बिल किंवा लँडलाईन टेलिफोन बिल किंवा दुकान आणि स्थापना परवाने.
d. सदर व्यवसाय महिलेच्या मालकी हक्काचा असल्याचे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर रीतसर नोटराईज दस्तऐवज असावा. तसेच पर्यटन प्रकल्प व्यवस्थापकीय आणि इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. (अनिवार्य)
e. पर्यटन केंद्र/व्यवसाय/उद्योगांची मालकी दस्तऐवज: महिला अर्जदाराच्या नावावरील ७/१२ उतारा/ प्रॉपर्टी कार्ड/ ८-अ नमुना किंवा नोंदणीकृत भाडे करार. (अनिवार्य)
f. वैयक्तिक आधार कार्ड (अनिवार्य)
g. पॅन कार्ड प्रत (अनिवार्य)
h. अन्न व औषध प्रशासन परवाना: (खाद्य व्यवसायासाठी अनिवार्य)
i. उद्योग आधार: (पर्यायी)
j. जीएसटी क्रमांक (पर्यायी)
k. रद्द केलेला चेक (पर्यायी)
l. महाराष्ट्र दुकानें आणि आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र (पर्यायी)
m. पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेली कोणतीही नोंदणी/परवाना/कागदपत्रे. उदा. निधी पोर्टलवरील www.nidhi.tourism.gov.in या संकेतस्थळावरील नोंदणी किंवा पर्यटन संचालनालयाकडे केलेली नोंदणी / पर्यटन विकास महामंडळ कडे केलेला नोंदणी प.
n. प्रकल्प संकल्पना संक्षिप्त माहिती ५०० शब्दांपेक्षा (एक पान) जास्त नसावी. अहवाल (अनिवार्य)
अतिरिक्त अट
क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये सहभागी होणे बंधनकारक असेल.
व्याज परतावा संबंधित अट
या योजनेअंतर्गत निकळ व्याजाचा परतावा चालू दिलेल्या कालावधीपर्यंत अनुज्ञेय असेल.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
