कर्जमाफी KYC Error: शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीसाठी बायोमेट्रिक KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र सध्या हजारो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींच्या घरातील कर्जदार शेतकरी मयत असल्यामुळे बायोमेट्रिक कोणाचे होणार? वारसाची नोंद कशी करायची? कोणती कागदपत्रे लागतील? असे प्रश्न आहेत. तर अनेक शेतकऱ्यांची KYC होत नाही, बोटांचे ठसे जुळत नाहीत, Farmer ID दिसत नाही, No Record Found Error येतो, खाते चुकीचे दिसते किंवा नाव यादीत असूनही आधार प्रमाणीकरण होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत.
जर तुमच्याही घरात अशीच परिस्थिती असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी काय करावे, वारस अर्ज PDF, घोषणापत्र PDF, संमतीपत्र PDF, KYC होत नसल्याचा अर्ज PDF आणि संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
कर्जमाफीसाठी बायोमेट्रिक KYC सुरू – आता काय करायचे?
राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची बायोमेट्रिक KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि KYC पूर्ण होईल, त्यांनाच पुढील टप्प्यात कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.
मात्र जर कर्जदार शेतकरी मयत असेल, तर त्याच्या वारसाची नोंद आधी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्या वारसाचे बायोमेट्रिक KYC केले जाईल.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी शासनाचा मोठा निर्णय
पूर्वी वारसाची नोंद करण्यासाठी मुख्यालयाची मंजुरी घ्यावी लागत होती. त्यामुळे प्रक्रिया खूप विलंबाने पूर्ण होत होती.
मात्र २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. आता बँकेच्या शाखा स्तरावरील अधिकाऱ्यांनाच वारसाचे नाव समाविष्ट करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही प्रक्रिया थेट संबंधित बँकेच्या शाखेत पूर्ण होऊ शकते.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी काय करावे?
जर घरातील कर्जदार शेतकरी मयत असेल, तर सर्वप्रथम संबंधित बँक किंवा सोसायटीमध्ये जाऊन वारसाची नोंद करण्यासाठी अर्ज करावा.
बँक कागदपत्रांची पडताळणी करून वारसाचे नाव पोर्टलवर समाविष्ट करेल. त्यानंतर त्याच वारसाचे बायोमेट्रिक KYC केले जाईल.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी आता काय करायचं? कर्जमाफी बायोमेट्रिक KYC कशी करायची?
वारसाची नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. वारसाचा अर्ज
बँकेने दिलेल्या नमुन्यातील अर्ज भरावा.
2. संस्थेचा ठराव
संबंधित सहकारी संस्थेचा किंवा सोसायटीचा ठराव.
3. मृत्यू दाखला
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा.
4. वारस / कुटुंब प्रमाणपत्र
ग्रामसेवक, सरपंच, तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले.
5. आधार कार्ड
ज्या वारसाचे नाव समाविष्ट करायचे आहे त्याचे.
6. बँक पासबुक
वारसाच्या बँक खात्याची प्रत.
एकापेक्षा जास्त वारस असतील तर काय?
जर एकापेक्षा जास्त वारस असतील, तर सर्व वारसांनी मिळून एका व्यक्तीला संमती द्यावी लागेल.
यासाठी ₹100 किंवा ₹500 च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले संमतीपत्र (Affidavit) द्यावे लागेल.
त्यानंतर फक्त त्या एका वारसाचे नाव योजनेत समाविष्ट केले जाईल.
एकच वारस असल्यास काय करावे?
जर एकच कायदेशीर वारस असेल, तर संमतीपत्राची गरज नाही.
मात्र आवश्यक घोषणापत्र आणि वारस प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
बायोमेट्रिक KYC कोणाचे होणार?
ज्या वारसाचे नाव बँकेने अधिकृतपणे योजनेत समाविष्ट केले असेल, त्याच वारसाचे बायोमेट्रिक KYC केले जाईल.
कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार?
सर्व कागदपत्रे, आधार जोडणी आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र वारसाच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल.
संयुक्त कर्ज खाते असल्यास बँक तिच्या नियमांनुसार हिस्सा निश्चित करेल.
शेतकरी कर्जमुक्ती योजना GR 2026: कोणाला मिळणार 2 लाखांपर्यंत कर्जमाफी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
KYC होत नसेल तर काय करावे?
जर खालील समस्या येत असतील…
- बोटांचे ठसे जुळत नाहीत
- Farmer ID दिसत नाही
- No Record Found Error
- Saving Account चुकीचे आहे
- कर्जाची रक्कम चुकीची आहे
- नाव यादीत आलेले नाही
- कर्जदार मयत आहे
- आधार प्रमाणीकरण होत नाही
तर संबंधित सहाय्यक निबंधक, उपनिबंधक किंवा तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार अर्ज सादर करावा.
PDF Download
मयत शेतकरी वारस अर्ज PDF Download
घोषणापत्र PDF Download
वारस संमतीपत्र PDF Download
KYC होत नसल्याचा अर्ज PDF Download
जर तुमच्या घरातील कर्जदार शेतकरी मयत असेल किंवा KYC होत नसेल, तर अजिबात वेळ न दवडता संबंधित बँक, सोसायटी किंवा निबंधक कार्यालयाशी संपर्क साधा. आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे वेळेत जमा केल्यास पुढील बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन पात्रतेनुसार कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
