कांदा चाळ अनुदान योजना : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा चाळ अनुदान योजनेविषयी माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात, त्यांची आवश्यक पात्रता काय, अनुदान किती मिळते, लाभार्थी निवडीचे निकष कोणते, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहेत. तरी हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.
Kanda Chal Anudan Yojana
महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानि रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर नसतो आणि त्याचे नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची प्रत राखली जाते आणि तो कांदा दीर्घकाळ टिकवला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळेच कांदाचाळ उभारणी कडे शेतकऱ्याचा कल हा वाढत झालेला दिसून येतो.
कांदा चाळ अनुदान किती?
कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना PDF- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
अनुदानाचे उद्दिष्ट काय?
- कांदा चाळ उभारल्याने शेतकर्याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल.
- हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे.
- कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणे
कांदा चाळ अनुदान योजना पात्रता
- या अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्याच्या अर्जदार शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.
- ७/१२ उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.
कांदा चाळ अनुदान लाभ कोण घेऊ शकतो?
- वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
- शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट
- शेतकरी महिला गट
- शेतकऱ्यांची उत्पादक संघ
- नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
- शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
- सहकारी पणन संघ
आवश्यक कागदपत्रे –
- सातबारा उतारा
- आधार कार्डची छायांकित प्रत
- आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
- संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
- विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र २)
अर्ज कुठे करायचा
- या अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in/) या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे.
- रजिस्ट्रेशन करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत.
- पूर्व संमती पत्र आलेल्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र ४ बंध-पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये सादर करावे लागेल. पूर्वसंमती पत्रासोबत आराखड्यात दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे बंधनकारक असणार आहे.
- तुमचा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागेल.
- कांदाचाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरुपात कळवावे लागेल.
आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला कांदा चाळ अनुदान योजने विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा आणि तुमच्या शंकांचे निरसन करावे.
- महाराष्ट्र शासन कृषी योजना 2024-25 | कृषी विभाग योजना 2024
- महिला कर्ज योजना 2024: Stand-Up India Loan Scheme व्याज दर, पात्रता
- Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Link: कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती
- Skill India Mission in Hindi | Skill India Mission 2024
- कांदा चाळ अनुदान योजना 2024: अर्ज, पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती