Bhu Naksha Maharashtra Mahabhumi Online: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये आपल्या गावातील आणि शेतातील जमिनीचा नकाशा ऑनलाईन घरबसल्या आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा याची माहिती या लेखात पहाणार आहोत. शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील त्यासाठी जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल मध्ये घरबसल्या ऑनलाइन पाहू शकता आणि आणि आपल्या जमिनीच्या हद्दीची माहिती मिळवू शकता.
Bhu Naksha Maharashtra
भारत सरकारने आता ७/१२ उतारा आणि ८- अ उतारा सोबतच जमिनीचा ऑनलाइन नकाशा उपलब्ध करून दिलेला आहे. आपण घरबसल्या आपल्या शेतजमिनीचा आणि गावाचा नकाशा मोबाईल वर पाहू शकतो.
डिजिटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड, फेरफार, 7 12, 8- अ PDF ऑनलाइन डाउनलोड करा घरबसल्या
भू नकाशा ऑनलाईन कसा बघायचा?
- अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन जमिनीचा आणि गावचा नकाशा पाहू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला महा नकाशा महाभूमी या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- आता तुमच्या समोर त्या वेबसाईटचे मुखपृष्ट ओपन होईल.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
- कॅटेगिरी पर्यायांमध्ये रुरल किंवा अर्बन निवडावे लागेल. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर तुम्हाला रुरल हा ऑप्शन निवडावा लागेल आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर अर्बन पर्याय निवडावा लागेल.
- सर्व माहिती निवडल्यानंतर तुम्हाला नकाशा लोड होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
- आता नकाशा व उजव्या साईडला झूम इन किंवा आउट करून तुमचा गावचा नकाशा पाहू शकता.
- झूम इन किंवा झुम आउट करण्यासाठी तुम्हाला अधिक आणि वजा चिन्हावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या गावाचा किंवा शेतीचा नकाशा ऑनलाइन तुमच्या मोबाईल वर पाहू शकता.
- Latest पीक विमा योजना GR अनुदान मंजूर! पहा कोणत्या हंगामासाठी किती कोटी अनुदान मंजूर!!
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना परीक्षा आणि प्रशिक्षण याबद्दल संपूर्ण माहिती
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024