आदिवासी लोन योजना महाराष्ट्र 2024: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित आदिवासी (Loan) कर्ज योजना (Shabari Loan Scheme) संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे योजना, त्याचे उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, आवश्यक कागदपत्रे, आदिवासी विकास योजना PDF इत्यादी शबरी कर्ज योजना संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना शासनाचे आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई येथे दिनांक 9 डिसेंबर 1998 रोजी महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
आदिवासी विकास महामंडळाचा उद्देश
अनुसूचित जमातीच्या व्यक्तींच्या आर्थिक विकासासाठी आणि कल्याणासाठी स्वतःच्या जबाब देऊ जबाबदारीवर किंवा सरकार संविधानिक संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था, व्यक्ती यांच्या सहयोगाने किंवा अशा संघटना यांच्यामार्फत कृषी, उद्योग लहू, उद्योग, वाहतूक, वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या इतर धंदा व्यवसाय, व्यापार किंवा कार्यालय यांच्या माध्यमातून योजना आखण्यासाठी या मंडळाची स्थापना झालेली आहे. या योजना प्रचलित करणे, मदत करणे, सल्ला देणे, वित्तीय सहाय्य करणे, संरक्षण देणे आणि विविध उपक्रम हाती घेणे हे या महामंडळाचे उद्देश आहे.
आर्थिक स्थिती आणि उत्पादन निर्मिती व्यवस्थापन आणि विपणन यांच्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यात अनुसूचित जातीच्या व्यक्तीला समर्थ बनवण्यासाठी काम धंदा, व्यवसाय, व्यापार आणि कार्य चालू करण्यासाठी भांडवली कर्ज मिळवण्याची साधने सामग्री आणि तांत्रिक व्यवस्थापकीय सहाय्य देण्याची तरतूद या महामंडळामार्फत केलेली आहे.
याव्यतिरिक्त आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य ते आवश्यक वाटणारी इतर कार्य करणे हे देखील या मंडळाचे उद्दिष्ट आहे.
खावटी अनुदान योजना महाराष्ट्र (रजिस्ट्रेशन, पात्रता, GR, लाभ,अर्ज) संपूर्ण माहिती
आदिवासी लाभार्थ्याची कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी शाखा कार्यालय समिती कोणत्या?
वरील शाखा कार्यालय स्तरावर मूल्यमापन समिती गठित करण्यात आलेली असून, सदरची समिती शाखा कार्यालय पातळीवर प्राप्त झालेल्या प्रकरणांची तपासणी तसेच लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष मुलाखत घेऊन मूल्यमापन समिती शिफारस केल्यानुसार मुख्य कार्यालय स्तरावर लाभार्थीची कर्ज प्रकरणी मंजूर केली जातील.
आदिवासी विकास विभाग योजना List
शबरी आदिवासी कर्ज (Loan) योजना महाराष्ट्र राज्यातील एकूण कार्यालय
- मुख्य व नोंदणीकृत कार्यालय, नाशिक
- शाखा कार्यालय व त्यांच्या अधिनस्त जिल्हे
आदिवासी कर्ज (Loan) योजना महाराष्ट्र पात्रता
- तहसील किंवा उपविभागीय कार्यालय प्रांत यांचा जातीचा दाखला (आदिवासी असल्याचा)
- तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखला
- प्रकल्प कार्यालयातील सुशिक्षित बेरोजगार दाखला
- शाळेचा दाखला
- कोणतेही दोन जामीनदार
- इतर बँकांकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतला नसल्याचा ना हरकत दाखला
- स्वतःची घरपट्टी भाड्याची जागा असल्यास करारनामा
- व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका ना हरकत दाखला किंवा दुकाने अधिनियमाखाली परवाना
- व्यवसायाचा अनुभव प्रशिक्षण दाखला
- व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्याचे कोटेशन
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- रेशन कार्ड ची झेरॉक्स
- स्वतःचा हिस्सा म्हणून भरावयाची दहा टक्के सहभाग रक्कम स्वतःच्या बँक खात्यात शिल्लक असल्याचा दाखला
- वाहनासाठी वाहन चालविण्याचा परवाना बॅच व परमिट किंवा प्रवासी वाहतूक परवाना
शबरी आदिवासी विकास घरकुल योजना महाराष्ट्र अर्ज माहिती
आदिवासी कर्ज योजना अटी
- आदिवासी असल्याचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा ग्रामीण भागासाठी 98 हजार आहे तर शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाख वीस हजार एवढी आहे.
- लाभार्थ्याची वयोमर्यादा सर्व योजनांसाठी 18 ते 45 वर्ष यादरम्यान असावी.
- जामीनदारासाठी नोकरी करण्याचे कार्यालय प्रमुखाच्या सहीचे कर्ज वसुली हमीपत्र
- अद्यायावत पगार दाखला किंवा शेतकरी असल्याचा सातबारा उतारा
बचत गट किंवा सहकारी संस्थांसाठी आवश्यक कागदपत्रे
- बचत गट किंवा सहकारी संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्र
- बचत गट किंवा सहकारी संस्थांचे सर्व सभासदांची यादी त्यांचे रेशन कार्ड व जातीचे दाखले
- बचत गट किंवा सहकारी संस्थेचे कमीत कमी सहा महिन्याचे बँक खाते स्टेटमेंट
- ग्रामपंचायत किंवा नगरपालिका ना हरकत दाखला
- जामीन राहण्यासाठी अध्यक्ष व सचिव यांचे सातबारा उतारे
- जो व्यवसाय करावयाचा आहे त्याचे सर्व साहित्याची कोटेशन
- सहकारी संस्थेचे तीन वर्षाची लेखापरीक्षण अहवाल
नोट:
कोणत्याही योजनेसाठी अनुदान नाही.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना माहिती
आदिवासी शबरी महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार निर्मिती कर्ज योजनांची माहिती
या योजनेअंतर्गत प्रवासी वाहने, ट्रॅक्टर टॉली, हेवी ट्रक, जनरल स्टोअर्स, मालवाहू रिक्षा, किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय, ढाबा, ऑटो, वर्कशॉप, मिनी ट्रक लहान व मोठा, सिमेंट मिक्सर मशीन इत्यादींचा समावेश याच्यामध्ये होतो. वैयक्तिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय, घरगुती खानावळ, एसटीडी बुत, पीठ गिरणी, वडापाव, भाजीपाला व फळे, चहा, थंड पेय इत्यादींचा समावेश होतो. याचा लाभ वैयक्तिक लाभार्थी घेऊ शकतात.
राष्ट्रीयकृत बँक सहकार्याने कर्ज योजना
या कर्ज योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजार आणि रुपये 50 हजार पेक्षा जास्त अशा दोन टप्प्यांमध्ये वर्गवारी केलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या निवडीनुसार व बँकेच्या सहमतीने कर्ज योजना देण्यात येते.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर जाऊन आदिवासी विकास योजना PDF शकता.
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?