नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण विद्यार्थिनींसाठी राबवल्या जाणाऱ्या उडान उपक्रमाबद्दल म्हणजेच सीबीएसई उडान स्कॉलरशिप स्कीम (CBSE Udaan Scheme in Marathi) बद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये ही योजना कधी सुरू केली आहे? या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? या योजनेअंतर्गत मुलींना कोणते लाभ आणि फायदे मिळणार आहेत त्यासाठी. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं करायचं? त्याचप्रमाणे त्याच्या पीडीएफ अर्ज ऑनलाइन असेल की ऑफलाइन? अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करायचं? आवश्यक कागदपत्रे कोणती? यासंबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉक पोस्टमध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा लेख शेवट्पर्यंत नक्की वाचा.
CBSE Udaan Scheme in Marathi
मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएसई ने सुरू केलेल्या उडान प्रोग्राम सुरू केलेला आहे. आपल्या देशातील मुलीं भवितव्य घडवण्यासाठी आणि मुलींना अधिक सक्षम बनवण्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम आणि योजना हे नेहमीच राबत असतो त्यामधील सीबीएसई उडान स्कॉलरशिप योजना ही एक आहे. जी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाच्या म्हणजेच (एम एच आर डी) यांच्या सहकार्याने ही योजना 2014 पासून सुरु केलेली आहे. हा उपक्रम देशातील इंजीनियरिंग विद्यालयातील विद्यार्थीनींच्या नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी राबवण्यात आलेला आहे.
CBSE Udaan योजनेचे उद्दिष्ट काय?
या योजनेतून भारतातील मुलींना व्यावसायिक शिक्षण जसे की इंजीनीरिंगसारख्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली जाणार आहे. इंजीनियरिंग संस्थानमध्ये मुलींची कमी नोंदणी दिसून आलेली आहे आणि शालेय शिक्षण आणि इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. शालेयस्तरावर विज्ञान आणि गणिताचे शिक्षण आणि शिकवणी समृद्ध करण्याचा प्रयत् न या प्रोग्राम अंतर्गत सीबीएसईचा आहे.
मुलींना सक्षम बनवण्यासाठी त्यांना प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश करून देण्यासाठी आवश्यक ती मदत जसे की, वर्चुअल वीकेंड संपर्क वर्ग, विनामूल्य ऑनलाइन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे. आणि उच्चशिक्षणाच्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींना सहभाग देणे. हेदेखील या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे.
उडान योजनेचे अर्ज कधी सुरू होतात?
या योजनेसाठी अर्ज हे साधारण जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होतात. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी असते. त्याचप्रमाणे सीबीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील या अर्जाच्या तारखा जाहीर केलेल्या तुम्हाला दिसू शकतात. त्यासाठी तुम्हाला ती वेबसाइट नियमितपणे तपासणं गरजेचं आहे. या योजनेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. ऑफलाइन अर्ज आपण करू शकत नाही.
योजनेचे फायदे आणि लाभ कोणते? (CBSE Udaan Scheme Benefits)
- या योजनेअंतर्गत निवडल्या गेलेल्या विद्यार्थिनींसाठी व्हिडिओ ट्युटोरियल आणि स्टडी मटेरियल ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे साहित्य दिली जाणार आहे.
- 60 आरक्षित शहरांमध्ये केंद्रावर वर्चुअल संपर्क वर्ग राबवले जाणार आहेत.
- विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सेवांची केली जाणार आहे.
- निवडलेल्या विद्यार्थिनींची वेळेवर प्रगतीचे निरीक्षण आणि ट्रॅकिंग फीड बॅक दिले जाणार आहेत.
- विद्यार्थिनींना अभियांत्रिकी विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाबद्दलचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे जी ई ई अॅडवांस परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे.
आवश्यक पात्रता | CBSE Udaan Scheme Eligibility
- या योजनेसाठी अर्जदार हा सर्व मुली असणार आहेत. आणि या मुली भारताच्या नागरिक असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व असेल अशा मुली या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- अकरावीमध्ये शिकत असणार् या विद्यार्थीनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मुलांसाठी ही योजना लागू नाही.
- अर्ज करण्यासाठी इच्छुक असणार् या विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹6,00,000 पेक्षा जास्त असू नये.
- अर्ज करण्यासाठी इच्छुक मुलींनी येता अकरावीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. या विज्ञान शाखेतील विषयांची निवड केलेली असणे गरजेचे आहे.
- इच्छुक विद्यार्थिनींचीअकरावीचे शिक्षण हे कोणत्याही केंद्रीय विद्यालय किंवा नवोदय विद्यालय किंवा संबंधित राज्याच्या सरकार द्वारे मान्यताप्राप्त सरकारी शाळा किंवा सीबीएसई सल्लग्न असलेल्या खाजगी शाळांमध्ये झालेल असणं गरजेचं आहे.
- सीबीएसई उडान या योजनेसाठी अर्ज करणार् या विद्यार्थींना 10 वीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 70 टक्के गुण मिळालेले असणं गरजेचं आहे. आणि त्यांचा विज्ञान आणि गणित म्हणजेच सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा स्कोअर हा कमीत कमी 80 टक्के असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सीजीपीए किमान 8 आणि गणित आणि विज्ञान विषयांसाठी सीजीपीए स्कोर 9 असणं गरजेचं आहे. या विद्यार्थीनी सीजीपीए प्रणालीचे अनुसरण करणार्या शाळांमध्ये दहावीचा अभ्यास केलेला असणं गरजेचं आहे.
CBSE Udaan Scheme प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी आरक्षण
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी (SC) 15 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
- अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीच्या विद्यार्थिनींसाठी 7.5 टक्के आरक्षण.
- इतर प्रवर्गातील म्हणजेच ओबीसीसाठी 27 टक्के आरक्षण असणार आहे.
- सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी साठी 3 टक्के आरक्षण असणार आहे.
सीबीएसई उडान योजना कागदपत्रे
- अर्जदार हा नमूद केलेल्या शाळेचा नियमित विद्यार्थी आहे असे वचन देणे
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- आरक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पात्रता निकष पूर्ण करणारी इयत्ता दहावीची मार्कशीट / ग्रेडशीट.
- हमीपत्र (उडान ब्रोशरच्या परिशिष्टात जोडलेले) भरलेले आणि स्वाक्षरी केलेले
- अर्जदाराचे पालक/पालक
- पडताळणीसह आवश्यक कागदपत्रांसह सत्यापित केलेला अर्ज घ्या
- शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आणि अर्जदाराचे शहर समन्वयक यांचे पुष्टीकरण
- निवडलेले केंद्र.
- तुमची सर्व कागदपत्रे शहर समन्वयकाकडे सबमिट करा आणि भरलेली पावती गोळा करा
- तुमच्या अर्जाचा आणि नंतर वापरण्यासाठी ते स्वतःकडे ठेवा.
CBSE Udaan Scheme PDF
उडान योजनेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांमध्ये लागणारे हमीपत्र आणि प्रमाणपत्र फॉर्मेट तुम्हाला उडान योजनेचा पीडीएफमध्ये मिळणार आहेत.
अधिकृत वेबसाइट – https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html#
उडान योजने साठी कर्ज कसा करायचा? (CBSE Udaan Scheme Apply Online)
- इच्छुक असलेल्या विद्यार्थीनी अर्ज ऑनलाइन सबमिट करणे गरजेचे आहे. त्यासाठी सीबीएसई उडान चा अधिकृत वेबसाइटवरती नोंदणी करणं गरजेचं आहे.
- विद्यार्थीनी नोंदणी करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट वर दिला गेलेल्या सूचना आणि इतर संबंधित माहिती. पूर्णपणे वाचनं गरजेचं आहे.
- रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरणे गरजेचं आहे.
- ऑनलाइन अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट केल्यावर ऑनलाइन पोर्टल वरती एक रजिस्ट्रेशन क्रमांक तयार होतो. जो तुम्हाला स्क्रीनवर पॉपअप होताना दिसतो. त्याचप्रमाणे नोंदणीकृत ईमेल आयडीवरती तुम्हाला ईमेल देखील येतो.
- रजिस्ट्रेशन क्रमांक तयार झाल्यानंतर अर्जदार विद्यार्थिनी निर्देश स्लॉटमध्ये त्यांची जन्मतारीख आणि रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून त्यांचा फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.
- सर्वात शेवटी तुम्ही भरलेला अर्जाची आणि घोषणा फार्मची डाऊनलोड करून प्रिंटआउट घेणे गरजेचे आहे. जेणेकरून ते तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी येऊ शकते.
सीबीएसई उडान योजनेची निवडप्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थिनींचा गुणवत्तेनुसार त्यांचे मूल्यांकन केले जाते. आणि त्यांनी निवडलेल्या शहरांचा विचार करून त्यांनावर वर्चुअल प्लॅटफॉर्मवर आयोजित साप्ताहिक संपर्क वर्गासाठी त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
CBSE Udaan Scholarship 2023 | आर्थिक मदत:
- आर्थिक सहाय्यासाठी पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत:
- इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी उडान साप्ताहिक मूल्यांकनात किमान ७५% उपस्थिती.
- IIT/NIT/केंद्रीय अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश.
- इतर कोणत्याही शिष्यवृत्ती किंवा आर्थिक सहाय्याचा लाभ घेत नाही.
- प्रत्येक टर्ममध्ये समाधानकारक कामगिरी आणि पदोन्नती.
संमती:
कार्यक्रमात प्रवेश घेण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य आहे, अटी आणि शर्तींच्या स्वीकृतीची घोषणा आवश्यक आहे.
संपर्क कुठे करायचा?
आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला या योजनेसंबंधित आवश्यक ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका कुशंका असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ई मेलवर किंवा टोल फ्री क्रमांक वरती संपर्क साधून तुम्ही माहिती घेऊ शकता.
तुम्ही 011-23214737 वर कॉल करू शकता किंवा कोणत्याही प्रश्नांसाठी udaan.cbse2017@gmail.com वर लिहू शकता.
निष्कर्ष: CBSE Udaan Scheme in Marathi
उडान योजना ही अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थिनींसाठीचे अडथळे दूर करत सक्षमीकरणा साठी राबवली जात आहे. तांत्रिक शिक्षणातील लैंगिक तफावत दूर करून आणि सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करून उडान मुली आणि महिलांच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे काम करते. हा उपक्रम वैज्ञानिक प्रतिभेचे संगोपन करून आणि लैंगिक समानतेला चालना देऊन शाश्वत विकास साध्य करण्याच्या व्यापक ध्येय साध्य करताना दिसून येतो. उडानने केलेल्या प्रगती लक्षात घेता, असे कार्यक्रम अधिक सर्वसमावेशक आणि सशक्त समाज घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते.