Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Dairy Farming Business Subsidy Apply Online

Dairy Farming Business Subsidy Apply Online: ₹8.5 लाख अनुदान दुधाळ गाय / म्हैस पालन पशुधन योजना

Posted on March 24,April 12, by Mahasarkari Yojana

Dairy Farming Business Subsidy Apply Online: राज्यस्तरीय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजकता योजना अंतर्गत येणारी दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026. ही ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे.

या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की

  • तुम्हाला किती दुधाळ जनावर गट दिले जाणार आहेत,
  • अर्ज कोण करू शकतो,
  • त्याची निवड प्रक्रिया कशी असते,
  • गटाची एकूण किंमत किती आहे,
  • अनुदान किती मिळतं ,
  • कोणती कागदपत्रे लागतात,
  • अर्ज कुठे करायचा (Online Apply Process),
  • GR PDF आणि अटी व शर्ती काय आहेत.

— ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत.

PMEGP Loan योजना एप्लीकेशन फॉर्म 2026: कागदपत्रे, पात्रता, लाभ

Contents hide
1 लाभाचे स्वरूप
2 लाभार्थी
3 लाभार्थी निवड
3.1 पात्रता | Dairy Farming Business Subsidy Apply Online Eligibility
4 प्रकल्पाची किंमत | Dairy Farming Business Cost
5 अनुदान किती? (Dairy Farming Business Subsidy)
6 आवश्यक कागदपत्रे कोणती? (Documents)
7 Dairy Farming Business Subsidy अटी व शर्ती
7.1 Gaay Mhais Yojana: दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
7.2 Kukkut Palan Yojana: अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
7.3 Related

लाभाचे स्वरूप

लाभार्थ्यास ५ दुधाळ गायी / म्हशी व ३ वर्षाचा विमा, गोठा व साधन सामग्री

लाभार्थी

सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गट

लाभार्थी निवड

सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.

  • अ) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)
  • ब) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)
  • क) वनहक्क धारक
  • ड) महिला बचत गटातील लाभार्थी

वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.

Mudra Loan Scheme in Marathi: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती | Apply Online Mudra Bank Loan

पात्रता | Dairy Farming Business Subsidy Apply Online Eligibility

१) १ एकर स्वतःची किंवा किमान ५ वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतराची जमीन आवश्यक.

मात्र वनहक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही.
२) पशुपालन, दूध व्यवसायाचे शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास, अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)

किंवा

२ वर्षांचा दूध व्यवसायाचा अनुभव

Mini Tractor Subsidy Apply संपूर्ण माहिती

प्रकल्पाची किंमत | Dairy Farming Business Cost

(१) ५ गायी/ म्हशी रु. ५,००,०००/– (प्रति गाय/ म्हैस रु. १ लाख/-) व विमा रु. ५,६०,१८०/-

(२) गोठा निर्मिती(Shed)– रु. ३,००,०००/-

(३) साधन सामग्री-

(कडबा कुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्यपाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, कापणी यंत्र, सोलर 3KW व इतर साहित्य) रु. २,७५,०००/-
प्रकल्पाची एकूण किंमत – रु. ११,३५,१८०/-

अनुदान किती? (Dairy Farming Business Subsidy)

१) सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के (रु. ५,६७,५९०/-)
२) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी – ७५ टक्के
(रु. ८,५१,३८५/-)
३) अनुदान २ टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या ५० टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात गोठ्याची निर्मिती तसेच जनावरांची खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्यात ५० टक्के अनुदान जनावरांच्या खरेदीच्या टप्प्यानंतर देण्यात येईल.

Nabard Loan: दूध व्यवसाय योजना महाराष्ट्र 2026

आवश्यक कागदपत्रे कोणती? (Documents)

१) स्वतःच्या नावाचे ७/१२ उतारा किंवा किमान ५ वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनाम
२) भाडेपट्टा जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेलं अनुसूचित “जे” प्रमाणपत्र.
३) पशुपालन, दूध व्यवसायाचे शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबत हमी पत्र)
किंवा
स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेकडून किमान २ वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
४) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
५) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र

Dairy Farming Business Subsidy अटी व शर्ती

  • १) या योजनेंतर्गत प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एक एफ१, जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, बारगुजर, प्रति दिन ७ ते ८ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गायी/म्हशींचा वापर करण्यात येईल.
  • २) वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही राबवण्यापूर्वी १-२ महिन्यांची गाभण अवस्थेत असावीत.
  • ३) या लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी करावी.
  • ४) १ महिन्याच्या कालावधीत संबंधित संस्थेमार्फत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने जनावरांची खरेदी करावी. जर लाभार्थीने उपस्थित प्रमाणे विहित कालमर्यादेत गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव प्रतीक्षा यादीतील रँकनुसार क्रमांकावर ठेवण्यात येईल, पुढील प्रतीक्षायादीतील लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.

Gaay Mhais Yojana: दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

  • ५) गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेत निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी भर करावी लागेल. तसेच, दुधाळ जनावरांची खरेदीनंतर जनावर वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करावयाचा आहे.
  • ६) वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षासाठी विमा उतरविण्यात यावा.

Kukkut Palan Yojana: अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

  • ७) योजनेअंतर्गत वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरविण्यात यावे.
  • ८) तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा गोठा निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावर खरेदी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, विमा) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना सादर करावा.
  • ९) सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी DBT द्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्याच्या बँक खात्यात अदा करावा.
  • १०) योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्थाप्रमुखांद्वारे करणे बंधनकारक राहील.
  • ११) योजनेच्या अटी/शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्यांकडून घेण्यात यावे.

Dairy Farming Business Subsidy Official GR PDF

5 दुधाळ गाय / म्हैस पालन पशुधन योजना GR PDF

Online अर्ज कुठे कसा करायचा? आणि लाभार्थी निवड (Dairy Farming Business Subsidy Apply Online) –

  • १) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत.
  • २) प्राप्त सर्व झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • ३) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी, यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करावे
  • ४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, असे लाभार्थी प्रतीक्षाधीन ठेवण्यात येतील.
  • ५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविण्यात येतील. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • कुसुम सोलर चा फॉर्म भरलाय! पण अनुदान नक्की कुणाला मिळणार?

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jamin Update
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना Online Apply
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme