Deshi Bail Jodi Subsidy Yojana Apply Online: राज्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत येणारी जिल्हा वार्षिक योजना – पशुपालक / शेतकऱ्यांना देशी बैल जोडी खरेदीसाठी अनुदान योजना 2026 50% ते 75% सबसिडी ही ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी खूप महत्वाची योजना आहे.
या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की
- तुम्हाला बैल जोडीसाठी किती अनुदान मिळणार,
- कोण अर्ज करू शकतो,
- लाभार्थी निवड कशी होते,
- बैल जोडीची एकूण किंमत किती आहे,
- पात्रता आणि निकष काय आहेत,
- कोणती कागदपत्रे लागतात,
- अनुदान कसे मिळते (DBT Process),
- आणि अटी व शर्ती काय आहेत.
— ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना बैल जोडी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते. त्यामुळे शेतीची कामे सुलभ होतात आणि उत्पन्न वाढण्यास मदत होते.
योजनेचे लाभ (Subsidy Details)
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देशी बैल जोडी खरेदी केल्यानंतर अनुदान दिले जाते.
- सर्वसाधारण प्रवर्ग:
👉 ५०% अनुदान – ₹८४,०७५/- - अनुसूचित जाती / जमाती:
👉 ७५% अनुदान – ₹१,२६,०४०/-
Poultry Farming Business Subsidy Apply Online: ₹22.5 लाख अनुदान कुक्कुटपालन पशुधन उद्योजकता योजना
लाभार्थी कोण असू शकतात?
या योजनेचा लाभ खालील व्यक्तींना मिळू शकतो:
- सर्व प्रवर्गातील अल्प / अत्यल्प भूधारक शेतकरी
- वनहक्क धारक
- नोंदणीकृत उसतोड कामगार
लाभार्थी निवड निकष (Priority List)
लाभार्थी निवड खालील प्राधान्यक्रमानुसार केली जाते:
- भूमिहीन
- अत्यल्प भूधारक
- अल्प भूधारक
- वनहक्क धारक
- महिला बचत गटातील लाभार्थी (वरील गटांमधील)
👉 यामध्ये:
- ५% आरक्षण दिव्यांगांसाठी
- ५०% आरक्षण महिलांसाठी
Dairy Farming Business Subsidy Apply Online: ₹8.5 लाख अनुदान दुधाळ गाय / म्हैस पालन पशुधन योजना
पात्रता (Eligibility)
१) स्वतःच्या नावावर ७/१२ उतारा असलेला अल्प / अत्यल्प भूधारक शेतकरी
👉 (वनहक्क धारकांसाठी ही अट लागू नाही)
२) भूमिहीन असल्यास:
👉 उसतोड महामंडळाकडे नोंदणीकृत उसतोड कामगार असणे आवश्यक
देशी बैल जोडीची किंमत
योजनेअंतर्गत ठरवलेली एकूण किंमत खालीलप्रमाणे आहे:
- पशुधन खरेदी: ₹१,५०,०००/-
- विमा (१०.२०% + १८% GST): ₹१८,०५६/-
- एकूण खर्च: ₹१,६८,०५६/-
अनुदानाचे स्वरूप
- सर्वसाधारण लाभार्थी (Open)– ५०%
- अनुसूचित जाती / जमाती (SC/ST)– ७५%
आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- ७/१२ उतारा (स्वतःच्या नावावर)
- वनहक्क धारकांसाठी:
- ७/१२ वर “इतर अधिकार” नोंद
- किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे अनुसूचित “ज” प्रमाणपत्र
- उसतोड कामगार असल्यास नोंदणी प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास UDID प्रमाणपत्र
- बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
अटी व शर्ती (महत्वाचे नियम)
१) निवड झाल्यानंतर:
👉 १ महिन्याच्या आत समितीच्या उपस्थितीत बैल जोडी खरेदी करणे आवश्यक
२) खरेदी कुठे करायची?
👉 बाजारातून / कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत खरेदी करणे बंधनकारक
👉 वेळेत खरेदी न केल्यास:
- नाव प्रतीक्षा यादीच्या शेवटी टाकले जाईल
- पुढील लाभार्थ्याला संधी दिली जाईल.
Mini Tractor 90% Subsidy Apply संपूर्ण माहिती
३) अतिरिक्त खर्च:
- बैल जोडीची किंमत जास्त असल्यास फरक रक्कम स्वतः भरावी लागेल
- वाहतूक खर्च देखील लाभार्थ्यानेच करायचा आहे
४) विमा अट:
- बैल जोडीचा ३ वर्षांसाठी विमा काढणे आवश्यक
- विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्या संयुक्त नावाने असेल
५) बैल मृत झाल्यास:
- अधिकाऱ्यांच्या संमतीने विमा रक्कमेतून नवीन बैल दिला जाईल
६) खरेदी अहवाल:
- खरेदी पावती
- छायाचित्र
- बँक तपशील
- विमा कागदपत्रे
👉 हे सर्व तालुका अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा स्तरावर सादर केले जाईल
७) अनुदान कसे मिळेल?
👉 DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा
८) नोंदणी:
👉 खरेदी केलेल्या बैलांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक
९) बंधपत्र:
👉 योजनेच्या अटी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्याकडून बंधपत्र घेतले जाईल
देशी बैल जोडी अनुदान योजना GR PDF
Deshi Bail Jodi Subsidy Yojana Apply Online अर्ज कसा करावा? Subsidy Scheme Maharashtra – Apply Online
१) सदर योजनासाठी लाभार्थी निवडताना जिल्हानिहाय सर्वसाधारण/अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
२) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत.
३) प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, अशा लाभार्थ्यांना प्रतीक्षाधीन ठेवले जाणार आहे.
५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविले जाणार आहेत. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
६) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन क्लस्टर निश्चित केले जाणार आहे.
देशी बैल जोडी अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण:
- मोठ्या प्रमाणात (५०% ते ७५%) अनुदान मिळते
- शेतीसाठी मजबूत पशुधन मिळते
- आर्थिक भार कमी होतो
जर तुम्ही अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी असाल किंवा पशुपालन करत असाल, तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
