Application of Agriculture Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेच्या २०२४-२५ मधील आंबिया बहराकरिता नोंदणी सुरू झाली आहे.
क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी
एका शेतकऱ्याला मृग व आंबिया बहार मिळून कमाल चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के इतका विमा हप्ता भरावा लागणार आहे.
नऊ फळपिकांसाठी ही योजना लागू
डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी अशा नऊ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे. शेतकऱ्यांना या योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. मात्र योजनेत सहभागी होणार किंवा नाही याचे घोषणपत्र संबंधित शेतकऱ्यांना आपापल्या बॅंक शाखांमध्ये जमा करणे आवश्यक आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास विमा हप्त्याची कपात परस्पर बॅंक करणार आहे.
भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याला सहभागासाठी एका फळपीकाखालील किमान उत्पादनक्षम क्षेत्र कोकणात १० गुंठे किंवा ०.१० हेक्टर हवे. उर्वरित विभागातील शेतकऱ्यांचे हेच किमान क्षेत्र २० गुंठे किंवा ०.२० हेक्टर राहील.
विमा भरपाई
अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट यामुळे फळबागांचे नुकसान झाल्यास या योजनेतून विमा भरपाई मिळते. शेतकऱ्यांनी सहभागासाठी ई-सेवा केंद्र, बँक किंवा वित्तीय संस्थांशी संपर्क साधावा. विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात देखील योजनेची माहिती मिळेल, असे कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी म्हटले आहे.
गारपिटीसाठी अतिरिक्त विमा हप्ता
शेतकऱ्यांना https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर योजनेची सेवा मिळू शकते. गारपिटीपासून होणाऱ्या नुकसानीबाबत विमा हवा असल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त विमा हप्ता आपापल्या बँकेत भरावा लागेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2024 महाराष्ट्र माहिती