Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2026 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना

Posted on January 20, by Mahasarkari Yojana

Ah Mahabms : नमस्कार मित्रांनो, आज आपण दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेसंदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची कार्यप्रद्धती, कोणत्या जिल्ह्यांसाठी हि योजना राबवली जाणार आहे, शासन निर्णय, या योजनेसाठी प्रकल्प किंमत, लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टींची माहिती या लेखात तुम्हाला आज मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

native cow image, deshi gai photo,
Contents hide
1 Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2026
2 संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस अनुदान किती? कागदपत्र कुठे अपलोड करायची? मुदत किती?
2.1 AH MAHABMS Update
2.2 Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2026
2.3 ऑनलाइन अर्ज
2.4 सुचना
3 नाविन्यपूर्ण योजना 2026 अर्ज कसा व कुठे करावा?
3.1 नाविन्यपूर्ण योजना 2026 लाभ कोण घेऊ शकते?
3.2 नाविन्यपूर्ण योजना मार्गदर्शक सूचना
3.3 अर्जदाराला लाभ देण्याच्या अटी कोणत्या?
4 नाविन्यपूर्ण योजनेची कार्यप्रक्रिया काय आहे?
5 नाविन्यपूर्ण योजना टोलफ्री नंबर काय आहे?
6 नाविन्यपूर्ण योजना महत्वाच्या लिंक्स
6.1 बंधपत्राचा नमूना डाउनलोड करा
7 ६/४/२ दुधाळ गाई /म्हशी चे वाटप
7.1 संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी
7.2 टीप :
7.2.1 सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.
8 लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम
8.1 एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
8.2 एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
9 अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
9.1 गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?
10 दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप अर्ज कुठे करावा?
10.1 शासन निर्णय दुधाळ किंवा म्हशींचे गट वाटप योजना
10.2 Related

Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2026

या योजनेअंतर्गत महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेत चा प्राधान्याने लाभ घेण्यात येणार आहे घेता येणार आहे. ही योजना राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत संकरित आणि देशी गाई यांचे वाटप करण्यात येणार आहे.

संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस अनुदान किती? कागदपत्र कुठे अपलोड करायची? मुदत किती?

AH MAHABMS Update

१. सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.
२. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दि.११/२/२०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
३. प्रणालीमार्फत SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free

Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2026

ऑनलाइन अर्ज

याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.१३.१२.२०२२ रोजी दु. ३.०० वा. पासून ते दि.११.०१.२०२३ रोजी रा. १२.०० वा. पर्यंत असणार आहे.

सुचना

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आलेली आहे

  • महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५ – २६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
  • सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२ – २३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.
  • सन २०२२ – २३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
  • कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी दि. २३/०१/२०२३ ते दि. ३०/०१/२०२३ या कालावधीमध्ये “कागदपत्रे अपलोड करा” या ठिकाणी आपली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त “QP-EVDTEC” या नावाने SMS प्राप्त होतील. इतर लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट होतील. त्यांना त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून पुढील ५ वर्षामध्ये लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
  • कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कृपया अचूक आणि योग्य कागदपत्रे अपलोड करण्याची खबरदारी घ्यावी.
  • योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.
  • योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

नाविन्यपूर्ण योजना 2026 अर्ज कसा व कुठे करावा?

  • योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल अँप उपलब्ध करण्यात आलेले आहे.
  • त्यामुळे अर्ज करण्यासाठी AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.
  • आपल्या मोबाइल मध्ये सन २०२१-२२ मध्ये AH-MAHABMS मोबाइल App डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.
  • अर्जदारांनी अर्ज करते वेळी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे बंधनकारक आहे.
  • तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील.
  • एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.

नाविन्यपूर्ण योजना 2026 लाभ कोण घेऊ शकते?

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना हि योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नाविन्यपूर्ण योजना मार्गदर्शक सूचना

  • सन २०२१-२२ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
  • सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष गृहीत म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
  • सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
  • त्यानंतर सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर गृहीत धरण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी कृपया योजनानिहाय प्रतीक्षाधीन यादी पहावी.
  • उपलब्ध अर्जांची संख्या आणि योजनानिहाय लक्षांक विचारात घेवून योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता पडताळून अर्जदारांनी अर्ज करावा.

अर्जदाराला लाभ देण्याच्या अटी कोणत्या?

सन 2026-25 मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद लाभार्त्याने घ्यावी.

नाविन्यपूर्ण योजनेची कार्यप्रक्रिया काय आहे?

  • अर्जदार नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसांची स्वतंत्र विंडो देण्यात येईल.
  • योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने Text SMS प्राप्त होतील. तसेच प्रणालीवर सूचनाही प्राप्त होतील.
  • योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

नाविन्यपूर्ण योजना टोलफ्री नंबर काय आहे?

आम्ही या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती देण्याचा संपूर्ण प्रयत्न या लेखात केलेला आहे. अद्याप तुम्हाला काय शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती मिळावू शकता. योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

  • कॉल सेंटर संपर्क – १९६२ (१०AM to ६PM).
  • टोल फ्री संपर्क -१८००२३३०४१८ (८AM to ८PM).

नाविन्यपूर्ण योजना महत्वाच्या लिंक्स

नाविन्यपूर्ण योजना वेबसाईट – https://ah.mahabms.com/

बंधपत्राचा नमूना डाउनलोड करा

  • दुधाळ गाई म्हैस वाटप बंधपत्राचा नमूना PDF डाउनलोड
  • शेळी मेंढी गट वाटप बंधपत्राचा नमूना PDF डाउनलोड
  • १००० मांसल पक्षी वाटप (कुक्कुटपालन) बंधपत्राचा नमूना PDF डाउनलोड

६/४/२ दुधाळ गाई /म्हशी चे वाटप

संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप :

सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम

  • महिला बचत गट
  • अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००
2जनावरांसाठी गोठा०
3स्वयंचलित चारा कटाई यंत्र०
4खाद्य साठविण्यासाठी शेड०
5५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१
एकूण प्रकल्प किंमत८५,०६१

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के                                    ६३,७९६
1स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के                                    २१२६५. ३३
2शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के                                    ४२,५३१
2स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के                                    ४२,५३१

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  • सातबारा (अनिवार्य)
  • ८ अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य )
  • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?

  • अर्जदाराला सर्वप्रथम महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी लागेल.
  • यानंतर दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • मिळालेल्या अर्जामधून स्क्रुटीनी किंवा प्राथमिक निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करण्यात येतील.
  • यानंतर अंतिम निवड केली जाईल.

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप अर्ज कुठे करावा?

दुधाळ गाई म्हशी वाटप अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर म्हणजेच ah.mahabms.com वर स्वीकारले जातात.

शासन निर्णय दुधाळ किंवा म्हशींचे गट वाटप योजना

  • राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ६/४/२ दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत सदर योजनेस दिनांक ३० ऑक्टोबर २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ६/४/२ संकरित गाई किंवा म्हशींचे गट वाटप करणे या नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत दिनांक १९ जानेवारी २०१९ रोजी मंजुरी देण्यात आली.
  • या शासन निर्णयानुसार राज्यात दुग्धोत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत वाटप करावयाच्या ६/४/२ संकरित गाई किंवा मशीनचे वाटप या योजनेमध्ये दुधाळ गाईंच्या यामध्ये गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी ,थारपारकर ,देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • कृषी समृद्धी योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना | पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme