Kamgar Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण महाराष्ट्र राज्यांमध्ये बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी कशी करायची त्यासाठी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेसाठी ची नोंदणी प्रक्रिया काय असणार आहे, ऑनलाइन नोंदणी कशी करायची, जर ऑफलाइन करायची असेल तर त्यासाठीचा फॉर्म डाउनलोड करायची लिंक, आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बांधकाम कामगार नोंदणी
2001 च्या सांख्यिकी माहितीनुसार महाराष्ट्रातील कामगारांची एकूण संख्या 14.09 लाख एवढी आहे 2011 च्या माहितीनुसार जनसंख्येच्या वाढीच्या क्रमांकावर 15.95% वाढ त्याठिकाणी दिसून येत आहे. बांधकाम कामगारांची संख्या अपेक्षित पणे 17.50 लाख होणार आहे. या वाढीने असे दिसते की, बांधकाम कामगार योजनेची कामगारांना अतिशय गरज आहे. ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजना समाविष्ट करून त्यांचा लाभ कामगारांना दिला जातो असतो.
खुशखबर Bhandhkam Kamgar Yojana 2024 भांडे वाटप पहा संपूर्ण माहिती
कामगार योजनेसाठी कोण नोंदणी करू शकतो?
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षा दरम्यान असणे गरजेचे आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त 90 दिवस काम करणारा कामगार या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. ज्यामध्ये इमारत सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत कोणतेही काम करणारा कामगार योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे.
Kamgar Yojana आवश्यक कागदपत्रे कोणती?
- वय प्रमाणपत्र
- 90 दिवसाचे काम करण्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- ओळख प्रमाणपत्र
- तीन पासपोर्ट साईज चे फोटो
बांधकाम कामगार योजना नोंदणी
या योजनेअंतर्गत कामगार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
Bandhkam Kamgar Yojana 2024 अर्ज माहिती | बांधकाम कामगार योजना फायदे
Kamgar Yojana ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- तुम्हाला या योजनेच्या नोंदणीचा फॉर्म पीडीएफ खाली लिंक मध्ये दिला जाईल तिथून तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे.
- त्यामध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर भरायची आहे.
- त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला श्रम आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचा आहे.
- सोबत आवश्यक ती कागदपत्र तुम्हाला जोडावी लागणार आहे जी की आपण वरती पाहिलेली आहेत.
Kamgar Yojana ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच mahabocw.in वर जायचं आहे.
- त्या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचा आहे.
- रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान निवडायचे आहे.
- आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत.
- आता तुम्हाला मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी भरायचा आहे आणि वेरिफाय करून तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होणार आहे. रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी पुन्हा लॉगिन करून तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरायचा आहे.
- आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायची आहे.
- या योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फ्री ही फक्त एक रुपया असणार आहे जी की तुम्ही फोन पे किंवा गुगल पे करू शकणार आहात.
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वर जाऊन या योजनेचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढून तो व्यवस्थित रित्या भरायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्र त्या फॉर्मला जोडून हा फॉर्म तुमच्या जवळच्या श्रम आयुक्त कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
कामगार योजना Form PDF इम्पॉर्टन्ट लिंक्स
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म Registration Link | View |
Bandhkam Kamgar Registration Form PDF Download Link | Form PDF |
Renewal Form PDF Download Link | Renewal Form |
90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र PDF Download (कामगार नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी वापरावे.) | |
90 दिवस कामाचे प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी डाउनलोड | |
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म डाउनलोड | Form PDF |
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणा फॉर्म | FORM |