शेतकऱ्यांचे पिके विविध नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यांमुळे नुकसान होतात. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरु केली आहे. ही योजना आता खरीप 2025 साठी नव्या स्वरूपात अंमलात येणार आहे.
Contents
hide
✅ योजनेची वैशिष्ट्ये
- खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देणारी ही योजना आहे.
- शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याचे उद्दिष्ट आहे.
सहभागी होऊ शकणारी अधिसूचित पिके
खालील पिकांसाठी शेतकरी योजना सहभागी होऊ शकतात (फक्त अधिसूचित क्षेत्रातच):
- धान (भात)
- खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका
- तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे
- कापूस, कांदा
महत्त्वाच्या बाबी
- शेवटची तारीख: 31 जुलै 2025
- सहभागासाठी AgriStack नोंदणी क्रमांक व ई-पीक पाहणी अनिवार्य आहे.
- कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी दोघेही योजना घेऊ शकतात.
- ई-पीक पाहणी आणि प्रत्यक्ष विमा घेतलेले पीक यात फरक असल्यास विमा अर्ज रद्द होईल.
- सीएससी विभागामार्फत अर्ज सादर करताना फक्त विमा हप्ता द्यावा, इतर कोणतेही शुल्क लागू नये.
- फसवणूक केल्यास पुढील ५ वर्ष कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
- मंजूर भरपाई शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होईल.
- जोखीम स्तर: सर्व पिकांसाठी ७०%
- उंबरठा उत्पादन: मागील ७ वर्षातील पाच वर्षांचा सरासरी उत्पादनाचा आधारे ठरवले जाते.
विमा संरक्षणाचा कालावधी
- पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी.
- कीड, रोग, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या घटकांमुळे नुकसान झाल्यास भरपाई.
- महसूल मंडळ स्तरावर पीक कापणी प्रयोगाद्वारे सरासरी उत्पादन कमी आल्यास सर्व विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
योजना राबविणाऱ्या विमा कंपन्या व जिल्हे
अ.क्र. | विमा कंपनीचे नाव | संबंधित जिल्हे |
---|---|---|
1 | भारतीय कृषी विमा कंपनी | अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, परभणी, वर्धा, नागपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, जालना, गोंदिया, कोल्हापूर, संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली |
2 | ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी | लातूर, धाराशिव, बीड |
पिकनिहाय विमा रक्कम व शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (रु./हे.)
टीप: यामध्ये जिल्हानिहाय फरक असू शकतो.
अ.क्र. | पीक | विमा रक्कम (रु./हे.) | शेतकऱ्यांचा हप्ता (रु./हे.) |
---|---|---|---|
1 | भात | 49,000 ते 61,000 | 122.50 ते 1220 |
2 | नाचणी | 15,000 ते 40,000 | 37.50 ते 100 |
3 | उडीद | 22,000 ते 26,600 | 55.00 ते 500 |
4 | ज्वारी | 25,500 ते 33,000 | 63.75 ते 660 |
5 | बाजरी | 26,000 ते 32,000 | 75.00 ते 640 |
6 | भुईमूग | 38,098 ते 45,000 | 95.25 ते 900 |
7 | सोयाबीन | 30,000 ते 58,000 | 75.00 ते 1160 |
8 | कारळे | 20,000 | 50 |
9 | मूग | 22,000 ते 28,000 | 55 ते 560 |
10 | कापूस | 35,000 ते 60,000 | 87.50 ते 1800 |
11 | मका | 36,000 | 90 ते 720 |
12 | कांदा | 68,000 | 170 ते 3400 |
13 | तीळ | 27,000 | 67.50 |
14 | तूर | 37,218 ते 47,000 | 93.75 ते 940 |
नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाते?
नुकसान भरपाईचे गणित पुढीलप्रमाणे:
- महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग केला जातो.
- भात, कापूस, सोयाबीन – ५०% डेटा रिमोट सेन्सिंग व ५०% कापणी प्रयोगावर आधारित.
- इतर सर्व पिके – फक्त कापणी प्रयोगाच्या आधारावर.
सूत्र:
नुकसान भरपाई = [(उंबरठा उत्पादन – सरासरी उत्पादन) / उंबरठा उत्पादन] × विमा संरक्षित रक्कम
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावे?
- कर्ज घेतलेला शेतकरी: जर योजना नको असेल, तर ३१ जुलैपूर्वी बँकेला लेखी अर्ज करावा.
- बिगर कर्जदार शेतकरी:
आवश्यक कागदपत्रे:- AgriStack नोंदणी क्रमांक
- ७/१२ उतारा
- बँक पासबुक
- आधार कार्ड
- पेरणीचे स्वयंघोषणापत्र
- ऑनलाइन अर्जासाठी पोर्टल:
www.pmfby.gov.in - विमा घेतल्यानंतर ई-पीक पाहणी अनिवार्य आहे.
मदतीसाठी संपर्क:
- PMFBY हेल्पलाइन क्रमांक: 14447
- स्थानिक कृषी विभाग कार्यालय
- संबंधित विमा कंपनीचे कार्यालय
📝 शेतकरी मित्रांनो, पावसाळी हवामानात होणाऱ्या अनिश्चिततेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. वेळेत अर्ज करा आणि तुमचे नुकसान टाळा.