नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण Ladki Bahin Yojana यादी Maharashtra PDF: 2 मिनिटात लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी? तेही घरच्या घरी त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे या योजनेची लिस्ट कशी check करायची ते आपण सविस्तर या खात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Ladki Bahin Yojana यादी Maharashtra PDF
माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्य सरकारने महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ अॅप लाँच केले आहे, ज्यामध्ये महिला घरबसल्या आपल्या मोबाईल फोनद्वारे या योजनेचे अर्ज करू शकतात.
माझी लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट झालेल्या महिलांना लवकरच योजना अंतर्गत आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात होईल.
नारीशक्ती दूत एप्लीकेशन वर ऑनलाईन अर्ज आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप माहिती
Ladki Bahin Yojana अर्जाची प्रक्रिया
1 जुलै 2024 पासून माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महिलांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत अॅप वापरावे लागते. ऑफलाइन अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांना जवळच्या अंगणवाडी केंद्रे, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्राम पंचायत कार्यालये, नगरपालिका वॉर्ड कार्यालये, सेतू सुविधा केंद्रे व महा-ई-सेवा केंद्रांमध्ये अर्ज करावा लागतो.
Ladki Bahin Yojana पात्रता
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची स्थायी रहिवासी असावी.
- अर्जदार महिलेची वयोमर्यादा 21 वर्षांपेक्षा अधिक असावी.
- महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा अधिक नसावी.
- महिलेच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आयकर दाता नसावा.
- महिलेच्या नावावर बँक खाता असावा.
- महिलेच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून अन्य चारचाकी वाहन नसावे.
Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक पासबुक
- आधारसह लिंक असलेला मोबाईल नंबर
- स्थायी रहिवासी प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- अर्ज फॉर्म
Ladki Bahin Yojana यादी कशी तपासावी
ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी:
- नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करून, त्यामध्ये लॉगिन करा.
- ‘या पूर्वी केलेले अर्ज‘ पर्यायावर क्लिक करा.
- अर्जाची स्थिती तपासा.
- तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबर वर देखील तुमचा अर्ज approve झाला आहे असा text message JM-MAHAGOV कडून येईल.
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link
ऑफलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी:
- संबंधित नगरपालिका किंवा नगर निगमची अधिकृत वेबसाइट शोधा.
- वेबसाइटवर आपला वार्ड निवडा आणि डाउनलोड बटणावर क्लिक करा.
- सूची डाउनलोड करून, आपले नाव लाभार्थी यादीत तपासा.
Ladki Bahin Yojana यादी अर्ज स्थिती:
- Approved: अर्ज स्वीकारला गेला आहे आणि लवकरच लाभ मिळू शकतो.
- SMS Verification Pending: अर्जाची तपासणी बाकी आहे.
- In Review: अर्जाची तपासणी सुरू आहे.
- Pending to Submitted: अर्ज तपासणीसाठी प्रतीक्षेत आहे.
- Survey Rejected: अर्ज रद्द करण्यात आला आहे. कारण पाहून पुन्हा अर्ज करा.
- Disapprove: अर्ज पूर्णपणे नाकारला गेला आहे. पुन्हा अर्ज करा.
Ladki Bahin Yojana महत्वपूर्ण लिंक:
नारी शक्ती दूत अॅप | App Link |
Ladki Bahin Yojana Online Apply | Apply |
Ladki Bahin Yojana GR PDF | GR |
Ladki Bahin Yojana यादी | Check Here |
- सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2 ऑनलाइन अर्ज Link, फॉर्म, फायदे
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF, Online रजिस्ट्रेशन, Official Website
- ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link