मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण Mukhyamantri Saur Krushi Yojana महाराष्ट्र संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे हि योजना, या योजनेचे उद्दिष्ट्य काय, कोण अर्ज करू शकतो, लाभ कोणते, आवश्यक कागदपत्रे, अँप्लिकेशन फी किती,ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक्स, संपर्क, अर्ज कुठे करायचा त्याच्या मार्गदर्शक सूचना कोणत्या. या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2023 | Mukhyamantri Saur Krushi Yojana Maharashtra
महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 लाख कृ षी वीज ग्राहक आहेत. देशातील शेतीच्या ववद् युत पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सवाात मोठा आहे. राज्यामध्ये ऊजेच्या एकू ण वापरापैकी कृ षी क्षेत्रासाठी सुमारे 22% ऊजेचा वापर होत असून प्रामुख्यानेसदर वीजेचा वापर कृ षी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या शेतकऱयांना चक्रीय पध्दतीने वदवसा व रात्री वीजपुरवठा के ला जातो. अशाप्रकारे वीजपुरवठा होत असल् याने शेतकऱयांची खूप गैरसोय होते, रात्रीच्या वेळी शेतात वसंचन करताना वन्य प्राणी, साप चावणे, इत्यादी धोक्यांचा सामना करावा लागतो, या समस्या सोडववण्यासाठी वदवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱयांकडून सातत्याने होत असते.
शेतकऱ्यांना सुवर्णसंधी !! शेतकऱ्यांना मिळणार पडीक जमिनीवर सव्वा लाख रु भाडे Saur Krushi Vahini Yojana
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना MSKVY 2.0 योजना काय आहे?
कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दिनांक १४.०६.२०१७ आणि १७.०३. २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY)’ सुरु केली होती. कृषी वाहिनी सौर-उर्जीकरणाचे प्रचंड फायदे लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने विविध हितधारकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ह्या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी सदर योजनेची पुनर्रचना ही ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY 2.0)’ म्हणून केली. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ च्या अंतर्गत वर्ष २०२५ पर्यंत ३०% कृषी वाहिन्यांचे सौर-उर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट हे ‘मिशन २०२५’ म्हणून निश्चित केले आहे. ह्या योजनेमध्ये ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प जास्त कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५- १० किमी परिघात स्थापित केले जातील. ह्या योजनेमध्ये एकूण ७,००० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीय सौर प्रकल्प स्थापित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.
विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प हे महावितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांशी थेट जोडले जाणार असल्यामुळे पारेषण प्रणालीची गरज भासणार नाही आणि वितरण हानीमध्ये सुद्धा बचत होईल. उपकेंद्राजवळील सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नापीक जमिनी ह्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भाडेतत्वावर देऊन चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी सुद्धा मिळणार आहे.
online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शासन GR :-
सौर कृषी वाहिनी योजनेसाठी Online Application Fee
अर्जदाराने अर्जासोबत प्रक्रिया शुल्क रु १,०००/- + १८% ( वस्तू व सेवा कर ) अर्जाच्या पुढील कार्यवाहीसाठी भरावे
जागेची पात्रता
- जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.
- महावितरण च्या ३३/११ K .V उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल ( ५ कि .मी च्या आतील).
अर्जदारास सूचना
- प्रत्येक अर्जदाराने प्रथम नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य युजर-आयडी / पासवर्डने लॉग इन करावे लागेल.
- अर्जदाराने एका जागेसाठी एकच अर्ज करावा लागेल.
कोण अर्ज करू शकते ?
- अर्जदार हे स्वतः शेतकरी ,शेतकऱ्याचा गट
- कॉपरेटिव्ह सोसायटी ,वॉटर युसर असोसिएशन
- साखर कारखाने , जल उपसा केंद्र ,
- ग्रामपंचायत ,उद्योग आणि इतर संस्था यापैकी कोणीही असू शकतात .
सौर कृषी वाहिनी योजनेसाठी Online Form Application Important Links :
अर्ज दाखल करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेसाठी Online Aplication Link
अर्जदारांनी अर्जासंबंधी माहिती पुस्तिक Link
अर्जदारांकरिता मार्गदर्शक सुचना Link
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना वैशिष्ट्य
1.भागधारकांसाठी प्रमुख प्रोत्साहने
- लवकर कार्यान्वित होणार्या प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार (PPA) कालावधी हा पूर्वमान्य (deemed extension) असेल
- हरित उपकर निधीमधून रु. २५ लाख प्रति सबस्टेशन इतके एकरकमी अनुदान
- खाजगी जमीन मालक आणि शेतकर्यांसाठी रु. १,२५,००० प्रति हेक्टरी प्रमाणे जमीन भाडेपट्टी, वार्षिक ३% दरवाढीसह
- स्थानिक ग्रामपंचायतीसाठी रु. ५ लाख प्रति वर्ष प्रमाणे तीन वर्षांसाठी प्रोत्साहनपर अनुदान
- ११ केव्ही आणि ३३ केव्ही वर जोडलेल्या सौर प्रकल्पांना अनुक्रमे २५ पैसे प्रति युनिट आणि १५ पैसे प्रति युनिट प्रमाणे तीन वर्षांसाठी अनुदान
- हंगामी वीज निर्मितीच्या निर्देशकांनुसार deemed generation साठी 100% प्रचलित दर लागू
- एका पेक्षा जास्त प्रकल्पांसाठी सामायिक Evacuation वाहिनीची तरतूद
- महसुली जमिनीसाठी स्वतंत्र कंपनी (SPV)
- खाजगी आणि महसुली जमिनीचे एकत्रीकरण
- बॅक-टू-बॅक लीज-सबलीज; PPA-PSA व्यवस्था
- कार्यक्रमासाठी समर्पित नोडल एजन्सी
3. योजना जोखीम मुक्त करण्यासाठी उपाय
- डेटा-रूम, GIS स्तरावर जमिनीचा तपशील
- एक खिडकी मंजुरी यंत्रणा
- कृषी वापरावर आधारित प्रकल्प क्षमता निर्धारित; CFA चा लाभ घेण्यासाठी ह्या योजनेतील वीज प्रकल्प KUSUM – C योजनेशी संलग्नित
- देयक सुरक्षा निधी (Revolving Fund), लेटर ऑफ क्रेडिट (LC)
अर्ज सुरू कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र Online Registration माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना MSKVY 2.0 साठी पात्रता
- शेतकरी
- जमीन मालक
- सहकारी संस्था
- कॉर्पोरेट (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही)
- सार्वजनिक उपक्रम (राज्य आणि केंद्रीय स्तर दोन्ही) सहभागासाठी पात्र असतील.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना MSKVY 2.0 चे फायदे काय आहेत?
१. शेतकरी
- विश्वसनीय दिवसा वीज पुरवठा
- शेतकऱ्यांच्या नापीक जमीनीचा वापर केला जाऊ शकतो
२. महावितरण
- कृषी वाहिन्यांच्या सौर उर्जीकरणामुळे वीज खरेदी खर्चात बचत
- स्थानिक वीज निर्मितीमुळे वीज हानी कमी होईल
- नवीनीकरणीय वीज खरेदीच्या बंधनाची पूर्तता करणे शक्य
- उच्चतम वीज मागणी कमी होऊन वीज मागणीचे चांगले व्यवस्थापन शक्य
३. महाराष्ट्र शासन
- स्पर्धात्मक दरांमुळे थेट अनुदानात कपात
- GST मुळे मिळणारे फायदे
- रोजगार निर्मिती
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- लागवडीयोग्य जमिनीची कागदपत्रे
- 7/12
- सौर संयंत्रासाठी जागा
- शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- ई – मेल आयडी
- मोबाईल नंबर
अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?
- सौर प्रकल्प विकासक सरकारी/सार्वजनिक/ खाजगी जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी किमान ०.५ मेगावॉट ते जास्तीत जास्त २५ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचे बांधकाम, संचालन आणि देखभाल पूढील २५ वर्षे करेल.
- प्रकल्प स्थापनेसाठी दिल्या गेलेल्या खाजगी जमिनीसाठी १,२५,००० रुपये प्रति हेक्टर प्रति वर्ष किंवा रेडी रेकनर दराच्या ६% यापैकी जे जास्त असेल इतके भाडे ३% च्या वार्षिक वाढीच्या तरतुदीसह मिळेल .
- ११ केव्ही आणि ३३ केव्ही वर जोडलेल्या सौर प्रकल्पांना अनुक्रमे २५ पैसे प्रति युनिट आणि १५ पैसे प्रति युनिट प्रमाणे तीन वर्षांसाठी अनुदान अश्या प्रकल्पांना मिळेल ज्या प्रकल्पांनी डिसेंबर २०२४ पूर्वी वीज खरेदी करार (PPAs) कार्यान्वित केले असतील आणि ते PPA मध्ये निर्धारित केलेल्या तारखेच्या आत कार्यान्वित सुद्धा झाले असतील.
- या कार्यक्रमांतर्गत ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर प्रकल्प बसवले आहेत त्यांना सामाजिक लाभ स्वरूपात रु. ५ लाख प्रति वर्ष इतके अनुदान दिले जाईल. हे अनुदान प्रकल्प सुरू झाल्यापासून ३ वर्षांसाठी दिले जाईल.
- सावधान! बनावट एसएमएस कडे दुर्लक्ष करा.
- अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या एसएमएस/कॉल/व्हाट्सअँप संदेशांना प्रतिसाद देऊ नका.
- महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही
- महावितरण केवळ VM-MSEDCL / VK-MSEDCL / AM-MSEDCL / JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवत नाही.
- (SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात जिथून संदेश पाठवला जात आहे आणि तो MSEDCL वर समाप्त होतो.)
- ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका.
- ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल “https://cybercrime.gov.in” वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.
Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Online Application
- सर्वप्रथम तुम्हाला सौर कृषी वाहिनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- होम पेजवर तुम्हाला सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुम्हाला नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- आता तुम्हाला या पेजवर New User Register Here या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- तुम्ही क्लिक करताच, तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल.
- आता तुम्हाला या फॉर्ममध्ये मागितलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
- सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला मागितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- शेवटी तुम्हाला Submit या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संपर्क
पत्ता:
हॉंगकॉंग बँक बिल्डिंग, तिसरा आणि चौथा मजला, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ महाराष्ट्र.
ई-मेल :
solarmskvy2@mahadiscom.in
अधिक माहिती / प्रश्नांसाठी, ग्राहक अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतात १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५.
Source- https://www.mahadiscom.in/
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी 30,000/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी 20,000/-Bandhkam Kamgar Yojana 2024 महाराष्ट्र फायदे