नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण सरसकट पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत राज्य हिस्सा नुकसान भरपाई संबंधीचा हा महत्त्वपूर्ण असा GR जो की 5 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेला होता, त्यासंबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
खरीप सरसकट पीक विमा नुकसान भरपाई योजना
राज्यामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 साठी नऊ विमा कंपन्यांमार्फत शासन निर्णय राबविण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2023 करता राज्य हिस्सा हप्ता रक्कम ही 2818.72 कोटी एवढी रक्कम विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनी या राज्यात भीमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत विमा कंपन्यांना देयका करता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे. या विनंतीनुसार विमा कंपन्यांना खरीप हंगाम 2023 मधील उर्वरित पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान हे 303 कोटी 70 लाख 20 हजार 848 एवढी रक्कम वितरित करण्या ची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील शासन निर्णय घेतलेला आहे.
PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
सरसकट पीक विमा योजना खरीप हंगाम शासन निर्णय GR
भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेल्या मागणी आणि कृषी आयुक्त ची शिफारस यांचा विचार करून सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपन्या मार्फत उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी 303 कोटी 70 लाख वीस हजार 848 एवढी रक्कम वितरित करण्या शासनाने या शासन निर्णय जीआर नुसार मान्यता देण्यात आलेली आहे.
ही सदरची रक्कम खरीप हंगाम 2023 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे ही रक्कम फक्त खरीप हंगाम 2023 साठी वितरित करण्यात आलेली आहे.