OBC Loan Scheme Online Apply 2026: इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत 13 उपमहामंडळांचे जिल्हास्तरावरील कामकाज आता धाराशिव येथे सुरू करण्यात आले आहे.
यामुळे पात्र लाभार्थ्यांना विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करून शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांनी दिली आहे.
OBC Loan Scheme Online Apply 2026: शासनाने सुरू केलेली 13 महामंडळे
OBC समाजातील विविध घटकांच्या आर्थिक विकासासाठी खालील महामंडळे कार्यरत आहेत.
- जग्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी)
- संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज)
- संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (न्हावी समाज)
- लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज)
- सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी)
- स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज)
- संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज)
- संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज)
- सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ (गुजर समाज)
- संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज)
- संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज)
- संत श्री. रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज)
- आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज)
अळिंबी (मशरूम) उत्पादन योजना 2026: mahaDBT वर अर्ज सुरू! 20 लाखांपर्यंत अनुदान
या महामंडळांमार्फत कोणत्या योजना राबवल्या जात आहेत?
या महामंडळांमार्फत एकूण 6 योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत.
1. थेट कर्ज योजना
- 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
2. 20 टक्के बीज भांडवल योजना
3. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
4. गट कर्ज व्याज परतावा योजना
5. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
6. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
अर्ज कसा करायचा?
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या अधिकृत वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.
संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
योजनांबाबत अधिक माहितीसाठी खालील कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
कार्यालय:
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ, धाराशिव.
दूरध्वनी क्रमांक: 02472-223863
निष्कर्ष
OBC समाजातील पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाच्या 13 महामंडळांमार्फत विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पात्र नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
