मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 ची सविस्तर माहित पाहणार आहोत . त्यामध्ये आपण योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षात एक लाख पंप बसविण्याचे लक्ष्य आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2024
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 ची उद्दिष्ट्ये –
राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये ते खूप खर्च करतात . त्याचे इंधन खूप महाग आहेत. ही गोष्ट लक्षात घेता , राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 च्या अंतर्गत सुरू केली असून, राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार आहेत.
सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या 95 टक्के अनुदान देते. लाभार्थीद्वारे केवळ 5 टक्के रक्कम खर्च केली जाईल. महाराष्ट्र सौर पंप योजना 2024 च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही. हे सौर पंप मिळूनही पर्यावरण प्रदूषण होणार नाही. नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चहि वाचेल. या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने हि योजना राबवण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र सौर पंप योजना 2024 मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे. जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल. सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून हि योजना अमलात आणली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 लाभ –
- या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
- सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार २५ हजार सौर जलपंपांचे वितरण करणार असून, दुसर्या टप्प्यात ५० हजार सौर पंपांचे वितरण करणार आहे.आणि तिसर्या टप्प्यात राज्य सरकार २५ हजार सौर पंपचे राज्यातील शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.
- ५ एकरपेक्षा कमी शेतजमिनी असलेल्या सर्व शेतकर्यांना ३ एचपी आणि त्या पेक्ष्या जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी सौर पंप या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
- ज्या शेतकऱ्यांकडे यापूर्वी वीज जोडणी आहे, त्यांना या योजनेंतर्गत सौर पंपचा लाभ दिला जाणार नाही.
अटल सौर कृषि पंप योजना पात्रता –
१. लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असला पाहिजे.
२. पाण्याचे स्रोत असलेले शेतकरी या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत. तथापि, पारंपारिक वीज जोडणी असणाऱ्या शेतक्यांना या योजनेतून सौरपंपाचा लाभ मिळणार नाही.
३. आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी जे पारंपारिक उर्जा म्हणजेच महावितरण कंपनीचे विद्युतीकरण करीत नाहीत . अशा प्रदेशातील शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
४. जल स्रोतामध्ये नदी, विहीर, स्वत:ची आणि सार्वजनिक शेती तलाव इ. जल स्रोत म्हणून ग्राह्य धरले जातील.
५. ज्या खेड्यांमध्ये अद्याप वनविभागातील एनओसीमुळे शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत. अश्या भागातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2024 आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शेतातील कागदपत्रे
- पत्ता पुरावा
- मोबाइल नंबर
- बँक खाते पासबुक
अटल सौर कृषी पंप योजना 2024 मध्ये अर्ज कोठे करावा?
या योजनेंतर्गत आपल्या सोलर पंपद्वारे सिंचनासाठी सौर पंप लाभ घेण्यास पात्र आणि इच्छुक लाभार्त्यांनी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.सध्या अर्ज सुरु आहेत .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समोर क्लिक करा. apply online
लाभार्थी निवड निकष –
लाभार्थी निवड निकष (३ आणि ५ एचपी सौर पंपसाठी):
- लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन असू नये.
- पाण्याचे निश्चित स्रोत असलेले शेतजमीन.
- यापूर्वी कोणत्याही योजनेतून विद्युतीकरण झालेले नसलेले शेतकरी.
- ५ एकरांपर्यंत शेतजमीन असणारी ३ एचपी पंप पात्र आहे आणि ५ एकरांपेक्षा जास्त शेती जमीन ५ एचपी आणि ७.५ एचपी पंपसाठी पात्र आहे.
- देय प्रलंबित ग्राहक, कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला.
- दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य.
- वनविभागातील एनओसीमुळे अद्याप वीज नसलेल्या खेड्यांमधील शेतकरी.
- “धडक सिंचन युवा” लाभार्थी शेतकरी.
७.५ एचपी पंपसाठी लाभार्थी निवडीचे निकषः
- पाण्याचे स्रोत विहिर किंवा कुपनलिका असणे आवश्यक आहे.
- पाण्याच्या स्त्रोताची खोली ६० मीटरपेक्षा जास्त नसावी.
- जीएसडीएने परिभाषित केलेल्या अति शोषित, शोषित आणि अंशतः शोषित गावांच्या अंतर्गत येणा विहिरी व ट्यूबवेलवर सौर पंप देण्यात येणार नाही.
- ६०% पेक्षा कमी विकास / उतारा घेण्याचे टप्पे असणाऱ्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये येणा लाभार्थ्यांना सौर पंप देण्यात येईल.
- रॉक एरियाखाली येणाऱ्या बोअरवेलवर सौर पंप देण्यात येणार नाही.
PM कुसुम सोलर पंप योजना 2024 महाराष्ट्र संपूर्ण माहिती
प्रवर्गनिहाय लाभार्थी योगदान –
१. सामान्य प्रवर्गातील लाभार्थी योगदान १० टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. १६५६०/- ,५ एचपी साठी रु.२४७१०-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. ३३४५५/- एवढे असणार आहे .
२. अनुसूचित जाती (SC ) प्रवर्गासाठी लाभार्थी योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/ – ,५ एचपी साठी रु.१२३५५-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे .
३. ST प्रवर्गासाठी लाभार्थी योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/ – ,५ एचपी साठी रु. १२३५५-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे.
Reference- https://www.mahadiscom.in/
किसान कार्ड योजनेचा लाभ कसा घेयचा? आणि काय आहे ये किसान क्रेडिट कार्ड ?
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Online गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना 2024
- माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र 2024 लाभ, पात्रता,कागदपत्रे,अर्ज
- [Updated]मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना:अर्ज, कागदपत्रे, पात्रता, PDF संपूर्ण माहिती
- मागेल त्याला शेततळे योजना 2024 संपूर्ण माहिती
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र : Registration Form PDF संपूर्ण माहिती