Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
ग्रामीण पशुधन योजना Online Apply 2026 MahaDBT 2.0 वर 21 पशुधन योजनांसाठी अर्ज कसा करायचा? पाहा Step by Step प्रक्रिया

ग्रामीण पशुधन योजना Online Apply 2026 MahaDBT 2.0 वर 21 पशुधन योजनांसाठी अर्ज कसा करायचा? पहा Step by Step प्रक्रिया

Posted on November 25,November 25, by Mahasarkari Yojana

पशुधन योजना Online Apply 2026 MahaDBT 2.0: MahaDBT 2.0 पोर्टलवर ग्रामीण पशुधन आणि पशुसंवर्धन योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? महा आयडी नोंदणीपासून Login, Profile, योजना निवड आणि अर्ज सादर करण्याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घ्या.

नमस्कार शेतकरी मित्रांनो,महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध पशुधन योजना राबवल्या जातात. 26 नोव्हेंबरपासून MahaDBT 2.0 पोर्टलवर सुरू होणाऱ्या 21 पशुधन योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, हे आपण आज या लेखात पाहणार आहोत.

या योजनांमध्ये दुधाळ गाय-म्हैस, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन अशा विविध घटकांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

त्यामुळे आज आपण महा आयडी तयार करण्यापासून ते योजनेचा अर्ज अंतिम सादर करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत.

Contents hide
1 पशुधन योजना Online Apply 2026 MahaDBT 2.0 ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी तयार ठेवा
2 MahaDBT 2.0 वर पशुधन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
2.1 Step 1: MahaDBT 2.0 पोर्टल उघडा
2.2 Step 2: महा आयडी तयार करा
2.3 Step 3: MahaDBT 2.0 वर Login करा
2.4 Step 4: पशुसंवर्धन योजना निवडा
2.5 Step 5: आपले Profile पूर्ण करा
2.6 Step 6: पात्र योजना निवडा
2.7 Step 7: योजनेचा घटक निवडा
2.8 Step 8: भाडेतत्त्वावरील जमिनीची माहिती भरा
2.9 Step 9: योजनेचे घटक निवडा
2.10 Step 10: अर्ज अंतिम सादर करा
3 अर्जाची स्थिती कशी तपासायची?
4 अर्ज केल्यानंतर पुढे काय होणार?
5 ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास येथे संपर्क करा
6 ग्रामीण पशुधन योजना Online Apply PDF येथे मिळेल
6.1 Related

पशुधन योजना Online Apply 2026 MahaDBT 2.0 ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी तयार ठेवा

अर्ज सुरू करण्यापूर्वी खालील माहिती जवळ ठेवा.

  • आधार क्रमांक: आधार किंवा Virtual ID आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक.
  • रेशन कार्ड: शिधापत्रिका क्रमांक.
  • Farmer ID: जमीन आवश्यक असलेल्या योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक.
  • मोबाईल: OTP पडताळणीसाठी आधारशी जोडलेला मोबाईल.

टीप: जमीन आणि Farmer ID नसल्यास भूमिहीन किंवा वनहक्कधारक यापैकी योग्य पर्याय निवडून अर्ज करता येतो.

पशुधन योजना 2026 कागदपत्रे: कोणत्या 21 योजनांसाठी कोणती कागदपत्रे लागणार? | Pashudhan Yojana Document List

MahaDBT 2.0 वर पशुधन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा.

Step 1: MahaDBT 2.0 पोर्टल उघडा

सर्वप्रथम मोबाईल किंवा संगणकावर MahaDBT 2.0 चे अधिकृत पोर्टल उघडा.

अधिकृत वेबसाईट: https://mahadbt2.maharashtra.gov.in

पोर्टल उघडल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या Register या पर्यायावर क्लिक करा.

Step 2: महा आयडी तयार करा

  1. आधार क्रमांक किंवा Virtual ID टाका.
  2. eKYC संमती वाचून दिलेल्या चौकटीत टिक करा.
  3. OTP पाठवा या बटणावर क्लिक करा.
  4. मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.
  5. आधारवरील माहिती तपासा आणि आवश्यक संमती देऊन महा आयडी तयार करा.

टीप: आधार उपलब्ध नसल्यास रेशन कार्ड वापरून नोंदणी करण्याचा पर्याय निवडता येतो.

महत्त्वाचे: महा आयडी तयार झाल्यानंतर साधारण २४ तासांनी Login करता येते. OTP कोणालाही सांगू नका.

Step 3: MahaDBT 2.0 वर Login करा

महा आयडी तयार झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करा.

  1. MahaDBT 2.0 पोर्टलच्या मुख्य पानावर जा.
  2. Login वर क्लिक करा.
  3. Citizen Login हा पर्याय निवडा.
  4. महा आयडी टॅब निवडून आपला महा आयडी टाका.
  5. Login बटण दाबा.
  6. मोबाईलवर आलेला OTP टाकून Login पूर्ण करा.

MahaID Card कसे काढावे? महाआयडी (MahaID) म्हणजे काय? फायदे, पात्रता आणि ऑनलाइन काढण्याची संपूर्ण प्रक्रिया (2026)

Step 4: पशुसंवर्धन योजना निवडा

Login झाल्यानंतर योजनेसाठी अर्ज करा या पानावर जा.

त्यानंतर Scheme Type या पर्यायामध्ये Animal Husbandry Scheme For Farmer हा पर्याय निवडा.

यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या पात्र योजनांची माहिती पाहता येईल.

Step 5: आपले Profile पूर्ण करा

योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपले Profile पूर्ण करणे आवश्यक आहे.

अर्जदाराचा तपशील:

  • नाव, जन्मतारीख आणि लिंग ही माहिती आधारवरून आपोआप दिसेल.
  • सामाजिक वर्ग निवडा.
  • दिव्यांग असल्यास योग्य पर्याय निवडा.
  • सुशिक्षित बेरोजगार असल्यास योग्य पर्याय निवडा.
  • शिधापत्रिका क्रमांक भरा.

लाल रंगाची (*) खूण असलेले सर्व रकाने भरणे आवश्यक आहे.

जमिनीचा तपशील:

जमिनीचा तपशील भरताना Farmer ID, गाव, सर्वे क्रमांक आणि क्षेत्र यासारखी माहिती उपलब्ध असल्यास आपोआप दिसेल.

माहिती तपासून योग्य असल्यास जमिनीच्या तपशीलाची पुष्टी करा या बटणावर क्लिक करा.

जमीन आवश्यक असलेल्या योजनांसाठी Farmer ID आवश्यक आहे. जमीन नसल्यास भूमिहीन किंवा वनहक्कधारक यापैकी योग्य पर्याय निवडा.

घोषणा आणि जतन:

शेवटी दिलेल्या तीन घोषणा काळजीपूर्वक वाचा. माहिती खरी असल्यासच चौकटीत टिक करून जतन करा या बटणावर क्लिक करा.

यामुळे आपले Profile पूर्ण होईल.

Step 6: पात्र योजना निवडा

Profile पूर्ण झाल्यानंतर पात्र योजना या पर्यायावर क्लिक करा.

येथे आपल्या Profile नुसार पात्र असलेल्या योजना दिसतील.

हवी असलेली योजना शोधण्यासाठी Search बॉक्समध्ये योजनेचे नाव किंवा संबंधित शब्द टाका. उदाहरणार्थ, Dairy असे टाकून शोध घेता येईल.

आपल्याला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्या योजनेसमोरील अर्ज करा या बटणावर क्लिक करा.

Step 7: योजनेचा घटक निवडा

उदाहरण म्हणून आपण ५ दुधाळ गाय / म्हैस संगोपन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास या योजनेची प्रक्रिया पाहू.

  1. योजनेसमोरील अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
  2. खरेदी करायचे जनावर निवडा – गाय किंवा म्हैस.
  3. जातीचा प्रकार निवडा – संकरित किंवा देशी.
  4. प्रकल्प अंमलबजावणीचे ठिकाण तपासा.

एकच जमीन असल्यास Profile मधील जमीन आपोआप निवडली जाऊ शकते.

Step 8: भाडेतत्त्वावरील जमिनीची माहिती भरा

काही योजनांसाठी ठरावीक जमीन आवश्यक असते. आपल्या मालकीची जमीन आवश्यक क्षेत्रापेक्षा कमी असल्यास भाडेतत्त्वावरील जमिनीची माहिती विचारली जाऊ शकते.

  • भाडेतत्त्वावर जमीन घेणार असल्यास होय निवडा.
  • जमीन भाडेतत्त्वावर घेणार नसल्यास नाही निवडा.
  • होय निवडल्यास आवश्यक क्षेत्राची माहिती भरा.

टीप: भाडेतत्त्वावरील जमीन प्रत्यक्ष उपलब्ध असेल तरच होय हा पर्याय निवडा.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना Online Apply

Step 9: योजनेचे घटक निवडा

आता योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या Components म्हणजेच घटकांची यादी दिसेल.

आपल्याला आवश्यक असलेले घटक निवडा. निवडलेल्या घटकांची एकूण किंमत आणि मिळणारे अनुदान पोर्टलवर दिसेल.

काही घटक आधीच निवडलेले असू शकतात.

Step 10: अर्ज अंतिम सादर करा

सर्व माहिती भरल्यानंतर अर्जातील घोषणा काळजीपूर्वक वाचा.

  1. दिलेल्या तीन घोषणांना टिक करा.
  2. अर्जातील माहिती तपासण्यासाठी पूर्वावलोकन / प्रिंट या पर्यायाचा वापर करा.
  3. अर्ज नंतर पूर्ण करायचा असल्यास मसुदा म्हणून जतन करा हा पर्याय वापरा.
  4. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज दाखल करा या बटणावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपला पशुसंवर्धन योजनेचा ऑनलाइन अर्ज सादर होईल.

Pashudhan Yojana 2026 List: 21 पशुधन उद्योजकता योजनांची यादी, पात्रता व अनुदान तक्ता

अर्जाची स्थिती कशी तपासायची?

अर्ज सादर केल्यानंतर पोर्टलवरील माझे अर्ज या विभागात जा.

येथे आपले सादर केलेले अर्ज आणि मसुदा अर्ज पाहता येतील.

अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा. तसेच मोबाईलवर येणारे SMS देखील लक्षात ठेवा.

अर्ज केल्यानंतर पुढे काय होणार?

अर्ज सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया होऊ शकते.

प्रक्रियाकाय करावे?मुदत
प्राथमिक निवडFCFS पद्धतीने निवड; SMS ची प्रतीक्षा करा–
कागदपत्रे अपलोडनिवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा१० दिवस
त्रुटी पूर्तताअर्जातील त्रुटी दुरुस्त करून पुन्हा सादर करा५ दिवस
पूर्व-संमती आदेशआदेश मिळाल्यानंतरच खरेदी किंवा काम सुरू करा–
बंधपत्रऑनलाइन बंधपत्रास सहमती द्या–
दावा अपलोडदेयके, पावत्या आणि जिओ-टॅग फोटो अपलोड करायोजनानिहाय
तपासणी व मंजुरीसंबंधित अधिकारी तपासणी करतील–
अनुदान जमापात्र अनुदान आधार संलग्न बँक खात्यात DBT द्वारे जमा होईल–

महत्त्वाचे: कागदपत्रे अपलोड करण्याची किंवा त्रुटी दुरुस्तीची मुदत चुकवू नका. मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास निवड किंवा अर्ज रद्द होऊ शकतो.

ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास येथे संपर्क करा

  • पशुसंवर्धन विभाग टोल फ्री क्रमांक: 1962
  • WhatsApp चॅटबॉट: 9063142299
  • महाआयटी तांत्रिक मदत: 022-49150800

तसेच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा तालुका व जिल्हास्तरीय पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधू शकता.

ग्रामीण पशुधन योजना Online Apply PDF येथे मिळेल

या लेखातील ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया PDF स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

[ऑनलाइन अर्ज करण्याची Screenshot सह संपूर्ण PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा – PDF LINK]

शेतकरी मित्रांनो, MahaDBT 2.0 पोर्टलवर पशुसंवर्धन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता आपण समजून घेतली आहे. सर्वप्रथम महा आयडी तयार करा, त्यानंतर Login करून Profile पूर्ण करा. आपल्या पात्रतेनुसार योजना निवडा आणि सर्व माहिती तपासून अर्ज सादर करा.

ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसाठीही उपयोगी ठरू शकते. त्यामुळे हा लेख त्यांच्यासोबत नक्की शेअर करा.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • ग्रामीण पशुधन योजना Online Apply 2026 MahaDBT 2.0 वर 21 पशुधन योजनांसाठी अर्ज कसा करायचा? पहा Step by Step प्रक्रिया

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jamin Update
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना Online Apply
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme