नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 संबंधितच्या नुकसान भरपाई 2024 ची कार्यपद्धती कशी आहे, त्या संबंधित ची माहिती पाहणार आहोत. तर ही नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे? त्यासाठी काय करावे लागणार आहे? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
PIK Nuksan Bharpai Form 2024
PIK Nuksan Bharpai 2024
अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान
या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र अतिवृष्टी झाली किंवा भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा बीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधीन राहून नुकसान भरपाई ही निश्चित केली जाते.
काढणीपश्चात पिकाचे नुकसान
ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरून अथवा पेंड्या बांधून सुकवणे करणे आवश्यक असते. अशा कापणे किंवा काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत म्हणजेच 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
पीक नुकसानाची माहिती कशी कळवायची?
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपशाचे नुकसान झाले आहे, त्या घटनेच्या 75 तासांच्या आत विमा कंपनीला खालील टोल फ्री क्रमांक किंवा ऍप द्वारे कळवणे गरजेचे आहे.
- केंद्र शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स अॅप द्वारे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती कळवावी लागेल.
- पीक नुकसान झाल्यास तुम्ही 1800 499 5004 या टोल फ्री क्रमांक वर फोन द्वारे तुमच्या नुकसान पीक नुकसानी संबंधित ची माहिती कळवू शकता.
- त्याचप्रमाणे तुम्ही लिखित स्वरूपात नुकसान सूचना फॉर्म बँक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्याद्वारे ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, महसूल मंडळाचे नाव, बँकेचे नाव, आपत्तीचा प्रकार, बाधित पीक विमा भरल्याची पावती इत्यादी सर्व माहिती घेऊन तुम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे देखील यासंबंधीची पीक नुकसान झाल्यासंबंधीची माहिती कळवू शकता.
पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती?
शेतकरी बांधवांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी की, पीक नुकसानीची पाहणी करण्याकरता आलेल्या पीक कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कोणतेही शुल्क किंवा पैसे आकारले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अमिषाला बळी पडू नका.
जर तुम्हाला विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पैशाची मागणी झाल्याचे आढळल्यास तात्काळ 1800 419 5004 या टोल फ्री क्रमांक वर कॉल करा किंवा ई-मेल ro.mumbai@aicofindia.com अथवा कंपनीच्या विमा कंपनीच्या जिल्हा किंवा तालुकास्तरीय वरील असणाऱ्या प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या जिल्हा किंवा तालुका कार्यालयाकडे याची तात्काळ तक्रार करा.
- सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2 ऑनलाइन अर्ज Link, फॉर्म, फायदे
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF, Online रजिस्ट्रेशन, Official Website
- ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link