नमस्कार मित्रांनो. आज या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 संबंधित जे नवीन अपडेट आहे. जसे की शेतकर्यांना पिक विमा हप्ता हा आता फक्त ₹1 प्रति अर्जामध्ये दिला जाणार आहे. त्या संबंधित अधिक माहिती आज या लेखामध्ये पाहणारा आहोत. त्याचप्रमाणे या लेखामध्ये आपण या योजनेसाठी पात्र शेतकरी कोणते असणार आहेत? त्याच्यामध्ये कर्जदार शेतकरी, बिगर कर्जदार, शेतकरी आणि भाडेपट्टी कराराने करणारी शेतकरी त्यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे.
खरीप पीक विमा योजना 2023 | पहा अर्ज करण्याची अंतिम मुदत
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023
महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर् यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि. पिक विमा योजना ही. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकर् यांना फायदाची ठरते.
पिक विमा या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? आणि अंतिम मुदत (लास्ट डेट) काय?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही. बँक शाखा किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन. शेवटच्या दिनांकाच्या आधी गर्दी टाळण्यासाठी तुमच्या पिकांचा विमा हा अंतिम मुदतीच्या पूर्वीच भरून घेण्याचा प्रयत्न करा. प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 असणार आहे. त्यामुळे या योजनेचा अर्ज तुम्ही लवकरात लवकर करून घ्या.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे?
- सातबारा उतारा.
- आधार कार्ड.
- बॅंक पासबुक.
- पेरणी घोषणापत्र.
- आणि विम्याची रक्कम ₹1.
PIK Nuksan Bharpai Form 2023 | पीक नुकसान भरपाई अर्ज PDF
पिक विमा क्लेम कसा करायचा?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकर् याने नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट, भूस्खलन, संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास किंवा ढगफुटी किंवा वीज कोसळन. त्याचप्रमाणे काढणी पश्चात नुकसान भरपाईमध्ये. गारपीट, चक्रीवादळ, बिगरमोसमी पाऊस या बाबी अंतर्गत सुकविण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या पिकाचे काढणीनंतर 14 दिवसांपर्यंत झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना नुकसान झाल्याच्या 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक किंवा बॅंक किंवा कृषी विभाग यांना द्यावी. आणि सदरची जोखीम केवळ आधीसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकाना लागू होईल.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना