नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण सरसकट पिक विमा नुकसान भरपाई रब्बी हंगाम 2023-24 साठीच्या जो पीक विमा हप्ता आहे त्या संबंधित अनुदान वितरित करण्यासंबंधीचा जीआर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
प्रधानमंत्री पिक विमा योजना नुकसान भरपाई 2025
राज्यामध्ये सरसकट पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी त्याचप्रमाणे इतर नऊ कंपन्यांना हा शासन निर्णय लागू करण्यात येत आहे.

या शासन निर्णयामध्ये रब्बी हंगाम 2023 करिता पिक विमा हप्तापोटी राज्य हिस्सा हप्ता अग्रीम 60 कोटी 76 लाख 20 हजार 714 व सरसकट पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा ही रक्कम रुपये 391 कोटी 24 लाख 41 हजार 993 एवढी रक्कम विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे.
खुशखबर! खरीप सरसकट पीक विमा नुकसान भरपाई योजना साठी 303 कोटी वितरित !! पहा GR
भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात भीमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023-24 अंतर्गत विमा कंपन्यांच्या देयाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली होती. त्याला अनुसरून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 साठी विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्यहिता अनुदान 733 कोटी 57 लाख 73 हजार 871 एवढी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम नुकसान भरपाई 2025 शासन निर्णय जीआर
भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्त याची शिफारस यांचा विचार करता सरसकट विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपन्यांमार्फत पिक विमा हप्तापोटी उर्वरित राज्यहिस्सा रक्कम अनुदान 733 कोटी सत्तावन्न लाख 73 हजार 871 एवढी रक्कम वितरित करण्यात करण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. हा जीआर पाहण्यासाठी तुम्ही खालील जीआर पहा बटनावर क्लिक करून तो सविस्तरपणे पाहू शकता. त्याची सत्यप्रतता जाणून घेऊ शकता.
- Crop Insurance Maharashtra 2025: 23 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर!! बाधित शेतकऱ्यांना दिलासा!! नेमका पीक विमा कधी दिला जातो?
- एक शेतकरी एक डीपी योजना 2025 ऑनलाइन अर्ज
- Rojgar Sangam Yojana Maharashtra: खरंच सरकार बेरोगारांना महिन्याला 5000/- देतंय का ?
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार अनुदान यादी
- Gay Gotha Yojana 2025 PDF: गाय गोठा अनुदान महाराष्ट्र Form