PM Kisan Yojana Maharashtra New Document: नमस्कार मित्रांनो, पीएम किसान नोंदणीसाठी आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. यासाठी कागदपत्रे महत्त्वपूर्ण लागणार आहेत, तरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. आता काय काय कागदपत्रे लागणार आहेत, हे पाहूया.
सरकारने नवीन प्रसिद्ध पत्रक काढलेले आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. या post मध्ये आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.
स्वयं नोंदणी प्रक्रिया
आपणास सांगतो की, पीएम किसान योजने अंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात आले आहे की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. सर्व कागदपत्रे 200 KB फाईल मर्यादित अपलोड करावीत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 GR, अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे संपूर्ण माहिती
PM Kisan Yojana Maharashtra New Document | आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा
मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा सातबारा उतारा लागणार आहे. फॉर्म भरताना जे काही पहिलं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे डिजिटल सातबारा. जर डिजिटल सातबारा नसेल तर तलाठी सहीचा सातबारा लागेल, पण तो मागील तीन महिन्याच्या आत मधला असावा लागेल.
- जमीन नोंदणीचा फेरफार
लाभार्थ्यांना फेरफार द्यावा लागणार आहे. लाभार्थ्यांच्या नावे जमीन धारणा 1/2/2019 पूर्वीची असणे आवश्यक आहे. अपवाद म्हणून वारसा हक्काने झालेली जमीन हस्तांतरण अपवाद असेल.
- वारस नोंद
जर वारस नोंद लागलेली असेल आणि 1/2/2029 नंतरची जमीन नावावरती झाली असेल, तर वारसाने जमीन आलेल्याचा फेरफार सोबत जोडणं गरजेचं आहे.
- आधार कार्ड
पती, पत्नी व 18 वर्षाखालील अपत्याचे आधार कार्ड सर्व एका पानावर स्कॅन करावे लागेल.
कागदपत्रांची पडताळणी
वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थींना मान्यता मिळेल.
अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती
जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल, तर तुम्हाला अपात्रता मागे घेण्यासाठी एक संधी दिली जाईल. तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत.
आवश्यक कागदपत्रे | PM Kisan Yojana Maharashtra New Document
- अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज
- लाभार्थीच पोर्टलवर स्टेटस प्रिंट
- आधार कार्ड
- पती-पत्नी व 18 वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड
- नवीन सातबारा व आठ अ उतारा
- वारस नोंदणीचा फेरफार
- वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावीत.
अधिक माहिती
तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा.
- Pran Card Kya Hota Hai | Pran Number और Pan Number Difference
- Har Ghar Tiranga Certificate 2024: सेल्फी अपलोड और सर्टिफिकेट डाउनलोड कैसे करें
- बीएसएनएल ने लॉन्च किया नया 4G/5G U-सिम और ₹107 का शानदार प्लान पूरी जानकारी देखें
- लाडकी बहीण योजना: अर्ज करण्याची तारीख वाढवली पटकन इथं अर्ज करा
- Pradhan Mantri Suraksha Bima Yojana in Marathi (PMSBY) संपूर्ण माहिती मराठी Form