PMEGP Loan योजना एप्लीकेशन फॉर्म : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना या प्रधानमंत्री Loan योजना 2024 बद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, अनुदान किती, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, लाभ, अर्ज कुठे करायचा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला ही PMEGP लोन योजनेमार्फत लोन घेयचे असेल, तर हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
Pradhan Mantri Loan Yojana 2024
या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वत: चा रोजगार सुरू करण्यासाठी 10-25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने पीएमईजीपी योजना सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना PMEGP लोन योजनेचा लाभ घेता येणार आहे.पीएमईजीपी योजना 2024 अंतर्गत अधिकाधिक बेरोजगार तरुणांना कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून देणे याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे.
पीएमईजीपी योजना अनुदान रक्कम –
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी – शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या १५%, ग्रामीण क्षत्रासाठी खर्चाच्या २५% , तर एकूण प्रकल्प खर्चाच्या १० % किंमती स्वतःचे योगदान असणार आहे.
- SC,ST,OBC,अल्पसंख्याक, महिला, शारीरिक अपंग, भूतपूर्व सैनिक, इ. – शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्पांच्या २५% खर्च, ग्रामीण क्षत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५%, एकूण प्रकल्प खर्चाच्या ५% स्वतःचे योगदान असणार आहे.
PMEGP योजना 2024 चे फायदे –
- देशातील बेरोजगार तरुणांना या योजनेंतर्गत स्वतःचा उद्योग, रोजगार सुरू करण्यासाठी १० लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
- या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांची जात व ग्रामीण, शहरी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते.
- शहरी भागातील पीएमईजीपीसाठी नोडल एजन्सी जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) आहे, तर ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योग मंडळाला (केव्हीसी) संपर्क साधता येईल.
- लोन अशाच बेरोजगार तरुणांना देण्यात येईल, ज्यांना स्वत: चा रोजगार सुरू करायचा आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2024 Form
PMEGP योजना 2024 द्वारे कोणत्या प्रकारचे उद्योग स्थापित केले जाऊ शकतात?
- कृषी आधारित
- वन आधारित उद्योग
- अपारंपरिक ऊर्जा
- रासायनिक आधारित उद्योग
- खाद्य क्षेत्र
- अभियांत्रिकी
- खनिज आधारित उद्योग
- वस्त्रोद्योग (खादी वगळता)
- सेवा उद्योग
PMEGP लोन योजना 2024 अर्ज करून लाभ कोण घेऊ शकतात ?
- अनुसूचित जाती (SC )
- माजी सैनिक
- अनुसूचित जमाती (ST )
- दिव्यांग
- महिला
- इतर मागासवर्ग (OBC )
- पूर्वोत्तर राज्यातील लोक
- अल्पसंख्याक
- सीमावर्ती भागात आणि डोंगरावर राहणारे लोक
नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी। Online Apply। Loan Application Form
पीएमईजीपी योजना 2024 ची पात्रता –
- अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे किमान ८वी पास असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे.
- जर अर्जदारास आधीपासूनच अन्य अनुदान योजनेचा लाभ मिळत असेल, तर अशा परिस्थितीतही तो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजना २०२१ घेण्यास पात्र राहणार नाही.
- या योजनेअंतर्गत हे कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील देण्यात येईल, हे कर्ज जुन्या व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी दिले जात नाही.
- कोणत्याही सरकारी संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीस या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्थांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएमईजीपी कर्ज योजना 2024 साठी कागदपत्रे –
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
PMEGP लोन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कुठे करावा ?
PMEGP लोन साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.kviconline.gov.in/ ला भेट द्या.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना