Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu
Poultry Farming Business Subsidy Apply Online

Poultry Farming Business Subsidy Apply Online: ₹22.5 लाख अनुदान कुक्कुटपालन पशुधन उद्योजकता योजना

Posted on March 24,March 24, by Mahasarkari Yojana

Poultry Farming Business Subsidy Apply Online: राज्यस्तरीय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजकता योजना अंतर्गत येणारी कुक्कुटपालन पशुधन उद्योजकता योजना 2026. ही ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे.

या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की

  • तुम्हाला किती अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप केले जाणार आहेत,
  • अर्ज कोण करू शकतो,
  • त्याची निवड प्रक्रिया कशी असते,
  • गटाची एकूण किंमत किती आहे,
  • अनुदान किती मिळतं ,
  • कोणती कागदपत्रे लागतात,
  • अर्ज कुठे करायचा (Online Apply Process),
  • GR PDF आणि अटी व शर्ती काय आहेत.

— ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत.

Contents hide
1 लाभाचे स्वरूप
1.1 Poultry Farming Business Subsidy लाभार्थी कोण
1.2 लाभार्थी निवड
1.3 पात्रता काय? (Poultry Farming Business Subsidy Eligibility)
1.4 प्रकल्पाची किंमत (Project Cost)
1.5 अनुदान किती मिळतं? (Poultry Farming Business Subsidy)
2 कोणती कागदपत्रे लागतात? (Documents)
2.1 अटी व शर्ती
2.2 Online अर्ज आणि लाभार्थी निवड (Poultry Farming Business Subsidy Online Apply Process)–
2.3 Related

लाभाचे स्वरूप

अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप:

किमान २०० अंडी उत्पादन देणारे ५००० एक दिवसीय पक्षी, १ महिन्याच्या खाद्यावरिल खर्च, अंडीबिंधित / पिंजरा / गादी पद्धती रोह बांधकाम, खाद्य, पाणी पुरवठा, मांडणी, अंडी ठेवण्यासाठी ट्रे, एग नेस्ट, ऑटोमेशन प्रणाली, इत्यादी आवश्यक साहित्य, सोलर (३ kw)

Poultry Farming Business Subsidy लाभार्थी कोण

सर्व प्रवर्गातील लाभार्थी

लाभार्थी निवड

सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.

  • अ) अत्यल्प भूधारक,
  • ब) अल्प भूधारक,
  • क) वनहक्क धारक
  • ड) सुशिक्षित बेरोजगार,
  • इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)

१) वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील.
२) आरक्षणानुसार पुरेसे महिला पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

Kisan Credit Card योजना महाराष्ट्र 2026 : फायदे, नुकसान, कागदपत्रे, मराठी माहिती

पात्रता काय? (Poultry Farming Business Subsidy Eligibility)

१) किमान २० गुंठे स्वत:ची किंवा किमान ५ वर्षे नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन, मात्र वनहक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही.

२) कुक्कुटपालन व्यवसायातील किमान २ वर्षांचा अनुभव
किंवा
कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन / शासमान्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र
(कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक)

प्रकल्पाची किंमत (Project Cost)

  • १) किमान २०० अंडी उत्पादन देणारे ५००० एक दिवसीय पक्षी (रु. ५०/- प्रति पक्षी प्रमाणे) – रु. २,५०,०००/-
  • २) १ महिन्याच्या खाद्यावरिल खर्च (३ कि. ग्रॅ. प्रति पक्षी x ५००० पक्षी x रु. ३०/- प्रति कि. ग्रॅ. प्रमाणे) – रु. ४,५०,०००/-
  • ३) अंडीबिंधित / पिंजरा / गादी पद्धती रोह बांधकाम रु. १५,००,०००/- च्या मर्यादेत
  • ४) खाद्य, पाणी पुरवठा, मांडणी, अंडी ठेवण्यासाठी ट्रे, एग नेस्ट, ऑटोमेशन, इत्यादी आवश्यक साहित्य – रु. ६,६८,०००/-
  • ५) सोलर (३ kw) – रु. १,३२,०००/-
  • ६) प्रकल्प एकूण किंमत – रु. ३०,००,०००/-

Gaay Mhais Yojana: दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

अनुदान किती मिळतं? (Poultry Farming Business Subsidy)

  • १) सर्वसाधारण लाभार्थी (Open) – ५० टक्के (रु. १५,००,०००/-)
  • २) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी(SC,ST) – ७५ टक्के (रु. २२,५०,०००/-)
  • ३) अनुदान २ टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या ५० टक्के इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी रोह निर्मिती केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे ५० टक्के अनुदान साधनसामग्री खरेदी व पक्षी खरेदीनंतर देण्यात येईल.

कोणती कागदपत्रे लागतात? (Documents)

१) कुक्कुटपालन व्यवसायातील किमान २ वर्षांचा अनुभव असल्याबाबतचे स्थानिक पशुवैद्यक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
किंवा
कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन / शासमान्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र
(कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र)
२) वनहक्क जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अनुसूचित “जम” प्रमाणपत्र,
३) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
४) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
५) प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी सहमती

PMEGP Loan योजना एप्लीकेशन फॉर्म 2026: कागदपत्रे, पात्रता, लाभ

अटी व शर्ती

  • १) या योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणारे कुक्कुटपक्षी हे वार्षिक किमान २०० अंडी उत्पादन देणारे असावेत.
  • २) देशी पक्षी खरेदी करताना प्राधान्याने शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र / सघन कुक्कुट गट / सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरील प्रकल्प / राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प / स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प यांच्याकडून घ्यावेत.
  • ३) पात्र लाभार्थ्यांची त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे दोन महिन्याच्या आत लाभार्थ्यांनी कुक्कुट पालनासाठी रोहची उभारणी करावी.
  • ४) तद्नंतरच्या एक महिन्याच्या कालावधीत पक्षी, खाद्य/पाण्याचे भांडे तसेच इतर मूलभूत सुविधा पूर्ण करून प्रत्यक्ष कुक्कुट पालन सुरु करावे.

Mudra Loan Scheme in Marathi: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती | Apply Online Mudra Bank Loan

  • ५) लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन, पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.
  • ६) प्रकल्प सुरु झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील संस्था प्रमुखासह संयुक्तपणे तपासणी करून तपासणी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्यांचे बँकेचे तपशील) जिल्हा उपयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना १५ दिवसात सादर करावा.
  • ७) अनुदानाच्या ५० टक्के अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करताना बँकेचे कर्ज मंजुरी आदेश
  • ८) योजनेंतर्गत निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे.
  • ९) योजनेंच्या अटी/शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे.

Poultry Farming Business Subsidy Government GR PDF

कुक्कुटपालन पशुधन उद्योजकता योजना GR PDF

Online अर्ज आणि लाभार्थी निवड (Poultry Farming Business Subsidy Online Apply Process)–

१) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत.
२) प्राप्त सर्व झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
३) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी, यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करावे
४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, असे लाभार्थी प्रतीक्षाधीन ठेवण्यात येतील.
५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविण्यात येतील. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • अर्ज सुरु मधमाशी पालन योजना Online फॉर्म ५०% अनुदान मिळणार!! हि आहे शेवटची तारीख!!

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme