नमस्कार मित्रांनो, आज आपण समाज कल्याण विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या शासकीय निवासी शाळा, अनुदानित आश्रम शाळा, केंद्रीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह तसेच अनुदानित वसतिगृह हे सुरू करण्याबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाचा मंत्रिमंडळातील शासन निर्णयची माहिती आज या लेखात पहाणार आहोत.
समाज कल्याण हॉस्टेल योजना
सध्या महाराष्ट्र राज्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, अनुदानित वसतिगृह, अनुदानित आश्रम शाळा, केंद्रीय निवासी शाळा तसेच शासकीय निवासी शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. जिल्हाधिकारी तसेच सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरणासाठी विभागाअंतर्गत वसतीगृहे ताब्यात घेण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे ब्रेक द चैन अंतर्गत टप्प्याटप्प्याने विविध आस्थापना सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजीच्या व शासन निर्णय दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय वसतिगृह,अनुदानित आश्रम शाळा, केंद्रीय निवासी शाळा, शासकीय निवासी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने समाज कल्याण हॉस्टेल सुरु करण्याचा खालील शासन निर्णय ७ ऑक्टोबर २०२१ च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
समाज कल्याण हॉस्टेल योजना महाराष्ट्र GR शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक १० ऑगस्ट २०२१ व दिनांक २४ सप्टेंबर २०२१ या शासन निर्णयानुसार देण्यात आल्या होत्या. त्या देण्यात आलेल्या सूचनांसह खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अधीन राहून सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय निवासी शाळा, अनुदानित आश्रम शाळा, केंद्रीय निवासी शाळांमधील पाचवी ते बारावी तसेच शहरी विभागातील आठवी ते बारावी वर्ग आणि शासकीय वसतिगृह व अनुदानित वसतिगृह सुरू करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना खालील प्रमाणे असतील.
महाराष्ट्र हॉस्टेल योजना
समाज कल्याण हॉस्टेल योजना मार्गदर्शक सूचना
- विद्यार्थी जेव्हा वसतिगृह प्रवेश करतील, त्यावेळी त्यांना बाहेरील नळावर हात पाय स्वच्छ धुऊन तोंडाला मास्क लावून व हात सॅनीटाइज करूनच वस्तीगृहात प्रवेश देण्यात येईल.
- वसतिगृहाची इमारत, ग्रंथालय, भोजन कक्ष, स्नानगृह व स्वच्छतागृह, संगणक कक्ष, यासह खोल्या, कॉट, गादी, उशी, चादर, बेडशीट, ब्लॅंकेट, पंखे, टेबल-खुर्ची ,कपाटे इत्यादी निर्जंतुक करने आवश्यक असणार आहे.
- स्थानिक प्रशासनाकडून पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात मिळालेली वसतिगृहे व बंद असलेली वसतिगृहे हे परत सुरू होण्यापूर्वी वसतिगृहांचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक करने आवश्यक असणार आहे.
- पाणी पिण्याची जागा, जेवण्याची जागा, झोपण्याची जागा, बाथरूम, टॉयलेट दररोज निर्जंतुक करने आवश्यक असणार आहे.
- वसतिगृह किंवा शाळा सुरु करण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग साठी लागणारे साहित्य, थर्मामीटर, साबण, पल्स ऑक्सीमीटर, हँडवॉश, सॅनीटायझर इत्यादी गोष्टी उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी.
- शाळा किंवा वस्तीग्रह सुरू करण्यापूर्वी वसतिगृहाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 ची rt-pcr चाचणी करणे आवश्यक आहे. चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सहाय्यक आयुक्त समाज कल्याण किंवा मुख्याध्यापक यांना सादर करण्यात सादर करणे आवश्यक असणार आहे.