Soyabin Papus Anudan e KYC: नमस्कार मित्रांनो,राज्यातील सोयाबीन सह कापूस अनुदान योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून KYC (Know Your Customer) प्रक्रिया करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण स्वतः मोबाईलवरून कसे KYC पूर्ण करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
Soyabin Papus Anudan
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 साठी हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत राज्यातील जवळजवळ 96 लाख शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या आधार आणि सामायिक क्षेत्र यासाठी सहमतीपत्र मागवण्यात आले होते, ज्यात 68 लाख शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे कृषी विभागाकडे जमा केली आहेत.
46 लाख शेतकऱ्यांना KYCची गरज नाही
सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 46 लाख शेतकरी हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना KYC करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी अनुदानाची रक्कम 29 सप्टेंबरला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
21 लाख शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक
उर्वरित जवळजवळ 21 लाख शेतकऱ्यांना KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. यातील 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु उर्वरित 19 ते 20 लाख शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया करावी लागेल. ही KYC प्रक्रिया शेतकरी स्वतः आपल्या मोबाईलवरून पूर्ण करू शकतात किंवा जवळच्या कॉम्प्युटर सेंटर, सीएससी सेंटर, आपल्या सरकार सेवा केंद्र, किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा पूर्ण करू शकतात.
स्वतः मोबाईलवर सोयाबीन कापूस अनुदान KYC कशी करावी? Soyabin Papus Anudan e KYC
- पायरी 1: सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम किंवा अन्य कोणत्याही ब्राउजरचा वापर करून एससी ऍग्री डीबीटी (SC Agri DBT) ही वेबसाईट शोधा. याची लिंक https://scagridbt.mahait.org/आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण वेबसाईटवर पोहोचाल.
- पायरी 2: वेबसाईट उघडल्यानंतर, आपल्याला दोन ऑप्शन दिसतील – “लॉगिन” आणि “डिसबर्समेंट स्टेटस”. KYC प्रक्रियेसाठी आपण “डिसबर्समेंट स्टेटस” ऑप्शन निवडावा.
- पायरी 3: त्यानंतर आपला आधार क्रमांक विचारला जाईल. आपला आधार क्रमांक योग्य प्रकारे टाइप करा आणि खाली दिलेला कॅप्चा कोड भरून सबमिट करा.
- पायरी 4: यानंतर, आपल्याला ओटीपी (One Time Password) सिलेक्ट करावा लागेल. बायोमेट्रिक अद्याप सक्षम करण्यात आलेले नाही, त्यामुळे ओटीपीचाच वापर करावा लागेल. आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल तरच आपल्याला ओटीपी प्राप्त होईल.
- पायरी 5: ओटीपी जनरेट केल्यानंतर, आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी संबंधित बॉक्समध्ये भरावा आणि “गेट डाटा” वर क्लिक करा.
- पायरी 6: ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर आपली सर्व शेतकऱ्याची माहिती त्या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी आपली KYC प्रक्रिया पूर्ण होईल. प्रिंट किंवा स्क्रीनशॉट घेऊन आपली माहिती सुरक्षित ठेवा.
KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय होईल?
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 29 सप्टेंबर 2023 पासून अनुदानाचे वितरण सुरू होईल. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.
शेवटची तारिख आणि इतर माहिती
राज्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात. शासनाकडून याबद्दल नियमित अपडेट्स दिल्या जातील.
आपण KYC कशी करायची याबद्दल आजच्या लेखातून माहिती घेतली आहे. याशिवाय, अजून काही प्रश्न असतील तर खालील कमेंट्समध्ये जरूर विचारावेत.
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana