नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समिती गठीत करण्याबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाचा दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महाराष्ट्र राज्य शासन निर्णयाची माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये आपण महाराष्ट्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव GR, आजादी का अमृत महोत्सव pdf, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Logo GR, नेमण्यात आलेल्या समित्यांचे उद्दिष्ट्य, आजादी का अमृत महोत्सव ऑफिसिअल वेबसाइट,संपर्क इत्यादी गोष्टींची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी माहिती आज या लेखात पाहणार आहोत.
आझादी का अमृत महोत्सव मराठी माहिती –
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे.
१२ मार्च २०२१ पासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजादी का अमृत महोत्सव’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध मंत्रालयीन मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांच्यासमवेत बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमांचे आयोजन देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र शासनाने सुचित केल्यानुसार १५ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यभर जनसामान्यांना सामावून घेऊन करण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी आजादी का अमृत महोत्सव याच्या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या समितीच्या धर्तीवर राज्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध क्षेत्रातील समितीला गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांसाठी खालील शासन निर्णय दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी बैठकीत घेतलेला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महाराष्ट्र राज्य शासन निर्णय –
आजादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या समित्या तयार करण्यासाठी दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी च्या बैठकीत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समित्या आणि मान्यवर –
या समित्यांमध्ये मान्यवर खालील प्रमाणे असतील –
- माजी मुख्यमंत्री
- न्यायसंस्था
- कलाकार/चित्रपट/मालिका
- शैक्षणिक
- संगीतकार/गायक/पार्श्वगायिका/गझल गायक
- निवेदक
- लोककला
- लेखक/लेखिका/कवियत्री/साहित्य
- पत्रकार
- पर्यटन
- अध्यात्मिक/कीर्तनकार
- उद्योजक
- क्रीडा
- सामाजिक शास्त्रज्ञ/विज्ञान तंत्रज्ञान
- अर्थशास्त्र/मानवी इतिहास संशोधक/इतिहासकार
- चित्रपट/नाट्य दिग्दर्शक
- कला दिग्दर्शक
- कृषी व्यवस्थापन
- आरोग्य
- फोटोग्राफी
- इलेक्ट्रॉनिक
- मीडिया
- जाहिरात क्षेत्र
- विधी
- कोअर समिती
विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्माननीय व्यक्तिंचा समावेश या समित्यांमध्ये समावेश असणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समित्या आणि उद्दिष्ट्ये –
विविध क्षेत्रामध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणार्या उपक्रमांसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
1. धोरण समितीचे उद्दिष्ट्य –
या धोरण समितीचे उद्दिष्ट समिती तयार करून सन २०२३ पर्यंत कार्यक्रमांमध्ये सामाविष्ट करायचे विषय सुचवणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे व त्या अंतिम करणे असे असणार आहे.
2. कोअर समितीचे उद्दिष्ट –
आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे राज्यस्तरावर आयोजन होणार असल्याने धोरण समितीने शिफारस केलेल्या कार्यक्रमांच्या आयोजनाची रूपरेषा ठरवणे तसेच निधीबाबतच्या नियोजनाची कार्यवाही करणे याबाबत शिफारस करणे हे कोअर समितीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
3. अंमलबजावणी समितीचे उद्दिष्ट –
कोअर समितीने निश्चित केलेले कार्यक्रम त्या-त्या विभागाने ठरवलेल्या कालावधीमध्ये आयोजन करणे, याबाबतची देखरेख आणि आढावा घेणे हे अंमलबजावणी समितीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
4. जिल्हास्तरीय समिती –
जिल्हा समितीचे अध्यक्ष हे माननीय पालकमंत्री असणार आहेत. जिल्हास्तरीय समिती मध्ये जिल्ह्यातील सर्व विधिमंडळ व संसद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील महानगरपालिकेचे महापौर, नगरपालिका किंवा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्माननीय व्यक्तिंचा समावेश असेल. तर समित्यांमध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सदस्य सचिव राहतील.
- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीच्या धर्तीवर महानगरपालिका किंवा महानगरपालिकास्तरीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय समित्या तयार करण्यात येतील.
- या समित्यांचा कालावधी ऑगस्ट २०२३ आजादी का अमृत महोत्सवाचे शेवटचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर समाप्त होईल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Logo –
‘आजादी का अमृत महोत्सव’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या योजनेअंतर्गत शासनाच्या सर्व शासकीय पत्रव्यवहार तसेच इतर ठिकाणी किंवा विविध माध्यमांवर परिशिष्ट अ मध्ये सुनिश्चित केलेल्या लोगोचा वापर करण्यात येणार आहे.
सदर चिन्हांचा लोगो शासकीय पत्र व्यवहारासाठी वापर करण्याचे कटाक्षाने पालन करावे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रदर्शित करण्यात यावेत. सर्व प्रशासकीय विभागांनी किंवा मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांना ही बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना प्रसारित कराव्यात. असा महाराष्ट्र शासनाचा ३० सप्टेंबर २०२१ रोजी चा शासन निर्णय GR.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपर्क –
- नोडल ऑफिस
- मिनिस्ट्री ऑफ कल्चर
- रूम नंबर ५०१, ‘C ‘ विंग,
- शास्त्री भवन,
- न्यू दिल्ली – ११०००१
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑफिसिअल वेबसाइट – https://amritmahotsav.nic.in/
Azadi ka Amrut Mohotsav Questions and Answers –
आझादीचा अमृत महोत्सव महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमापासून १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांसाठी सुरू झाला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होणाऱ्या ‘आजादी का अमृत महोत्सवात’ लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत सुरु केलेला आहे. यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मालिका तयार केली आहे. हा अमृत महोत्सव ‘जन भागीदारी’ आणि ‘जनआंदोलन’ च्या भावनेने साजरा केला पाहिजे.
७५ आठवडे पूर्ण झाल्यानंतरही देशात कुठेही अमृत महोत्सव साजरा झाला नाही. पण यावेळी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वी जयंती अमृत महोत्सव म्हणून साजरी केली जात आहे. जरी स्वातंत्र्याची ७५ वी जयंती २०२२ मध्ये असेल, परंतु त्याचे कार्यक्रम २०२३ पर्यंत चालतील. अर्थात पुढील दोन वर्षे देश अमृत महोत्सव साजरा करत राहील.
स्वाभिमान आणि स्वातंत्र्यानंतर आता देश सातत्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेला ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे भारत सरकारने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती