गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ८ मार्च २०२१ रोजीचा शासन निर्णय माहिती पाहणार आहोत. हि योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वीकारावे लागते. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल.