प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना २०२१ या योजनेची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही योजना, या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे, यामध्ये प्रक्रियेसाठी कोणते उत्पादन घेऊ शकतो, अनुदान किती मिळणार, अनुदान कोणाला मिळणार या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखात पहाणार आहोत. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही सन २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी पाच वर्षात १० हजार कोटींची तरतूद आहे.